कामातील कंटाळा घालवण्याचे प्रभावी तंत्र


कामातील कंटाळा घालवण्याचे प्रभावी तंत्र 
     प्रत्येक व्यक्तीला काम करतांना कंटाळा येतोच. काहींना काम करण्याचा विचारच त्रासदायक वाटतो. जसे ऑफिसमधील कर्मचा-यांना वरिष्ठांनी सांगीतलेल्या कामाचा कंटाळा येतो, त्यांना विचारले की काम का करू वाटत नाहीत तर म्हणतात पगार कमी काम जास्त. त्यामुळे कामात मन लागत नाही. विद्यार्थी म्हणतात की, रोज रोज अभ्यास करून कंटाळा येतो. अभ्यास करू वाटत नाही. अभ्यासाच्या विचाराने ताण वाढतो. त्यासोबत रोजचे होमवर्क वेगळे आणि परीक्षा यामुळे फस्ट्रेशन येते. महिलांना तर भांडेधुणे म्हणजे फारच कंटाळवाणे काम वाटते. भांडेधुण्याचे कामच करू वाटत नाही. आणि ज्या महिला नोकरी करतात त्यांना तर ऑफिस आणि घरी आल्यानंतर घरची कामे त्यामुळे त्यांना खुपच कंटाळा येतो. 
     मात्र यशस्वी व्यक्ती आपल्या कामाबददल कसा विचार करतात. त्यांना कामाचा कंटाळा येतो का?  कंटाळा आल्यास ते कोणता उपाय करतात. याबाबत सामान्य लोकांमध्ये नेहमीच कुतूहल असते. आणि आपल्याला त्यांच्याकडून काही शिकता येईल काय याचा विचार ते करीत असतात. कामातील कंटाळा घालवण्यासाठी काही यशस्वी व्यक्तींनी सांगितलेला उपदेश आपण पुढे बघू आणि जर हा उपदेश आपण आपल्या जिवनामध्ये वापरला तर आपल्यालाही काम कंटाळवाणे वाटणार नाही आणि त्याचा थकवा येणार नाही. जगामध्ये जे लोक यशस्वी झाले आणि होत आहेत त्यांनी आपला मुड चांगला असण्याची कधीच वाट बघितली नाही. तर ते कामाप्रमाणे आपला मुड  बदलतात. पुढील दोन प्रयोग करून पहा कामाप्रती आपला मुड नक्की बदलेल. 
1. छोटे परंतु कष्टदायक काम करण्यासाठी मशिनी तंत्राचा वापर करा. 
     याचा अर्थ त्याकामाबददल कंटाळवाणा विचार करण्याऐवजी काम सुरू करा. ज्याप्रमाणे बटण दाबल्यानंतर मशिन काम सुरू करते. त्याप्रमाणे कोणत्याही कामाबददल नकारात्मक विचार न करता काम सुरू करा. महिलांनी भांडेघासण्याचा विचार न करता मशिनी तंत्राचा वापर केला तर काम लवकर निपटेल आणि त्यांना त्यांच्या आवडीच्या कामामध्ये शिल्लक राहिलेला वेळ घालवता येईल. 
     आज हे काम करून पहा, एक असे काम निवडा ज्यामध्ये तुम्हाला बिलकुल आवड नाही. आता त्या कामाबाबात कोणताही विचार न करता, न घाबरता कामाला लागा. लगेच काही वेळात ते कार्म पूर्ण होईल. छोटी छोटी कंटाळवाने कामे करण्याचे हेच ते मशिनी तंत्र आत्मसात केल्यास जीवनात कोणत्याही कामाबददल कंटाळा वाटणार नाही.
2. काम करण्याची योजना बनवा आणि टप्प्या टप्प्याने त्याची मशिनी तंत्राने अंमलबजावणी करा.
     स्वतः च्या मुडवर अवलंबुन राहू नका. हे काम मी उदयावर सोपवल्यापेक्षा त्या कामाची आत्ताच सुरूवात करा. या दोन्ही प्रकारे आपण आपले काम प्रभावीपणे करू शकतो. मात्र गरज आहे ती मशिनी तंत्राचा वापर करण्याची. कोणत्याही कामाबददल नकारात्मक विचार न करता मशिनी तंत्राच्या सहाय्याने ते काम आपण पूर्ण करू शकतो. यातुनच आपल्यामध्ये कामाबददल असलेला निरसपणा व कंटाळा निघून जाईल. आणि कोणतेही काम आपण वेळेत पूर्ण करू शकाल.
References:
1. The Magic of Thinking big- Dr. David Schwartz
2. The power of your subconscious mind - Joseph Murphy
3. How to live 365 days a year - Dr. Shindler
Post a Comment

0 Comments