देशाचे कल्याण ज्यांना करावयाचे आहे त्यांनी सर्वप्रथम शेतीकडे लक्ष दयावे.

   

देशाचे कल्याण ज्यांना करावयाचे आहे
 त्यांनी सर्वप्रथम शेतीकडे लक्ष दयावे.

     भारत हा शेतीप्रधान देश आहे. येथील 70 टक्के जनता शेतीवर अवलंबुन आहे. आज आपण सर्वस्वी अनेक उत्पादनाबाबत चिन, अमेरिका इ. देशावर कायमचे अवलंबुन आहोत. मात्र कोरोणा काळामध्ये लोकांना कळाले की अन्न, वस्त्र आणि निवारा याच जीवनावश्यक बाबी आहेत. आणि बाकीच्या गोष्टी गौण आहे. अन्नाशिवाय माणूस जगू शकत नाही. परिणामी अन्न मिळविण्यासाठी व्यक्तीला शेतीवरच अवलंबुन रहावे लागते. कोरोणाकाळामध्ये केवळ एकाच उत्पादनाची मागणी देशात मोठया प्रमाणात होती. आणि ती म्हणजे शेतमालाची. फॅक्टरीमधून उत्पादन होणा-या मालासाठी कुणीही विचारपुस याकाळामध्ये केल्याचे ऐकीवात नाही. देशाला आत्मनिर्भर बनविण्याची गरज आहे. याची जाणीव सरकारला झाली ही मोठी गोष्ट आहे. मात्र अनेक वर्षापूर्वी छ. शाहू महाराजांनी देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी काय केले पाहिजे याबाबत त्यांनी अनेक उपाययोजना सांगितल्या होत्या. मात्र या देशाचे दुर्भाग्य असे की या देशात कुणी पुरोगामी विचार मांडले तर त्याला विरोध होतो. नाहीतर त्यावर बहिष्कार टाकल्या जातोे. असेच काही छ. शाहू महाराजांच्या बाबतीत झाले असावे असे वाटते.
     छ. शाहू महाराजांच्या मते, देशाची उन्नती उद्योगधंदयाच्या वाढीवर अवलंबून आहे. हे तत्त्व सर्वमान्य आहे. अशाप्रकारे उद्योगधंदयास उत्तेजन मिळावे याविषयी मला मोठी आवड असून त्या दिशेने माझे प्रयत्न आपणास माहितच आहेत. भारतासारख्या कृषीप्रधान देशात कोणते उद्योगधंदे उभारता येतील याचा अंदाज घेतांना राजर्षी म्हणतात. भारत हा मुख्यत्वे करून शेतीचा देश आहे. पाश्चात्य राष्ट्रात भांडवलवाले आणि मजूर यांच्यात मोठी स्पर्धा चालू आहे. शेतीच्या प्रगतीअभावी लोक शहराकडे धाव घेत आहेत. परिणामी खेडी ओस पडत आहेत परंतु त्यामुळे शहरे व यांचे आरोग्यही बिघडून गेले आहे. या करिता देशाचे कल्याण ज्यांना करावयाचे आहे, त्यांनी प्रथमतः आपल्या शेतीच्या सुधारणेकडे आवश्यक लक्ष दिले पाहिजे. नांगर व विहिरींचे पाणी काढण्याची मोट यांची सुधारणा ही आजच्या प्रत्येक शेतक-याचे हित करणारी आहे. सुधारलेले तंत्र विज्ञान शिकण्याच्या दृष्टीने कारागीर व शेतक-यांनी पुढे आले पाहिजे. देशाच्या उद्योगधंदयाच्या वाढीवर आपली प्रगती अवलंबून आहे. शेतीवर चालणारे कारागिरीचे उद्योगधंदे हेच या दृष्टीने उपयुक्त साधन आहे. सहकारी कारखाने, सहकारी संस्था व सहकारी दुकाने काढा. त्यास हवी ती मदत देईन असे आश्वासन देउन राजर्षीनी सहकारी तत्त्वावरील औद्योगिकरणाच्या तत्त्वाचा उच्चार आणि कृतीने प्रचार केला आहे. 
     छ. शाहू महाराजांनी त्यांच्या करविर नगरीमध्ये अनेक शेतीपुरक उदयोगधंदयांची निर्मिती केली तसेच इतरांना उद्योगधंदे उभारण्यासाठी मदतही केली होती. अशा या पुरोगाी राजाचे विचार देशाला आत्मनिर्भर बनविण्यास मदत करतील.
संदर्भः 
क्रांतीसुक्ते राजेर्षी छत्रपती शाहू - डाॅ. एस. एस. भोसले

Post a Comment

0 Comments