Failure to Success अपयशाकडून - यशाकडे

Failure to Success अपयशाकडून - यशाकडे

     प्रत्येक व्यक्तीला यशस्वी व्हावेसे वाटते. त्यासाठी प्रत्येक जण आपल्या कुवतीप्रमाणे प्रयत्न करीत असतो. मात्र केवळ कुवतीप्रमाणे प्रयत्न करून यशस्वी होता आले असते तर जगातील अनेक लोक यशस्वी झाले असते. त्यासाठी यशस्वी लोकांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. यशस्वी व्यक्तीने नेमके काय केले होते म्हणून तो यशस्वी झाला. या प्रश्नाचे उत्तर आपण जेंव्हा शोधायला लागतो त्यावेळेस आपण यशाच्या दिशेने वाटचाल करीत असतो. यशस्वी व्यक्तीला जे यश मिळालेले असते ते एक-दोन दिवसात मिळालेले नसते. अनेक वर्षाची मेहनत, जीद्द, चिकाटी आणि कामातील सातत्य असते. यशस्वी व्यक्ती जावेळेस काम करत होता त्यावेळेस तो जगापासून अदृश्य होता. कारण त्याने संपूर्णपणे आपल्या कामामध्ये स्वत:ला झोकून दिले होते. आणि जेंव्हा त्याचे काम पूर्ण झाले त्यावेळेस तो यशस्वी म्हणून नावारूपाला आला. त्याच्या एका यशामागे हजारो हुंदक्याचां श्वास दडलेला असतो. ज्यावेळेस लोक काम करत होते त्यावेळेस तोपण काम करीत होता. मात्र ज्यावेळेस लोक आराम करीत होते त्यावेळेसही तो वेगाने काम करीत होता. हे त्याच्या यशाचे गमक होते. यशस्वी व्यक्तींनी आपल्या सामर्थ्याच्या जोरावर अनेक आव्हानांना यशामध्ये परावर्तीत केलेल आहे.

1. यशस्वी व्यक्ती अपयशाने खचून जात नाहीत:

     यशस्वी लोक सुध्दा सामान्याप्रमाणेच दिसतात त्यांच्यात आणि सामान्यात एक फरक असतो तो म्हणजे एखादया प्रसंगाने किंवा अपयशाने सामान्य माणूस खचून जातो. अपयश पचवण्याची ताकत त्याच्यामध्ये नसते. मात्र यशस्वी माणसांचा घेण्यासारखा गुण म्हणजे ते अपयशाने खचून जात नाही. ते सतत प्रयत्न करतात. अपयशाच्या विचारात गुरफटून जाता ते स्वत: ला सतत कामामध्ये गुंतवून घेतात. त्यामुळे ते अपयशाला यशामध्ये परावर्तीत करतात.

2. यशस्वी लोकांनी अनेक वेळा अपयश पचवलेले असते:

     यशस्वी लोकांकडून शिकण्यासारखा महत्त्वाचा गुण म्हणजे यशस्वी लोकांनी अनेक वेळा अपयश पचवलेले असते. कोणतेही काम करतांना अपयश येणारच हे लक्षात ठेवा. कारण अपयश ही पहिली पायरी आहे. त्यामुळे अपयशाला घाबरून जाता त्याला यशस्वी व्यक्तीप्रमाणे पचवायला शिका. अनेक वेळा अपयश पचवल्याने शेवटी यश मिळणे निश्चित आहे.

3. बिना अडचणीशिवाय यशस्वी होणे शक्य नाही:

     यशस्वी लोकांना जीवनामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. हे कायम लक्षात ठेवा की यशाची वाट ही संघर्षामधूनच जाते. त्यामुळे कोणतेही काम करतांना अडचणी येणार आहेत हे गृहित धरून कामाला लागा. तुमच्या अथक प्रयत्नासमोर हया अडचणी तग धरू शकणार नाहीत. 

4. प्रत्येक अपयशाकडून काहीना काही शिका:

     यशस्वी लोकांमध्ये एक वेगळेपण असे आहे की ते प्रत्येक अपयशाकडून काहीना काही शिकलेले असतात. कारण अनुभव म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून एखादे काम करतांना व्यक्तीला जे अपयश येते. त्यालाच व्यक्ती अनुभव असे नाव देतो.

5. हार ही मानसिक स्थिती आहे हे समजून घ्या:

     हार ही व्यक्तीच्या डोक्यामध्येच असते. कोणतेही काम करतांना सतत चिंता करणे, मी यशस्वी होईल नाही. मी अशा प्रकारचे काम अजून केले नाही त्यामुळे मला यश येईल की नाही सांगता येत नाही. असा नकारात्मक विचार जेंव्हा आपण करतो तेंव्हा आपल्या मनाने कोणतेही कामपूर्ण करण्या अगोदरच हार मानलेली असते. त्यामुळे कोणतेही काम करतांना मला फालतूचा विचार करता हे काम पूर्ण करावयाचे आहे. असाच विचार करा.

6. अपयशाचे अध्ययन करा:

     कोणतेही काम करतांना अपयश येणारच आहे याची जाणीव ठेवा. येणाऱ्या अपयशाचे अध्ययन, विश्लेषण करा. त्यासाठी इतरांची मदत घ्या. आणि या अपयशातून मार्ग कसा काढता येईल याचा प्रयत्न करा.  अपयश नेमके कशामुळे आले हे जर तुम्हाला कळाले तर त्यामध्ये दुरूस्ती केल्यास पुढच्या प्रयत्नात अपयश येणार नाही.

7. स्वत:चे आलोचक बना:

     दुसरा व्यक्ती तुमच्या बद्दल खरे बोलेल का नाही यात शंका आहे. कधीकधी भितीपोटी तो तुमची प्रत्येक कृती चांगली असल्याचे स्तुती करेल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मध्ये काय बदल करावयाचे आहेत हे कळणार नाही. त्यामुळे स्वत:चे आलोचक स्वत: बना. स्वत: च्या चुका लिहून काढा आणि त्या दुरूस्त करण्याचा प्रयत्न करा.

8. भविष्याला दोष देणे बंद करा:

     बरेच जण आपल्या अपयशाबद्दल भविष्याला दोष देत राहतात. माझ्या दैवातच नाही. माझे भविष्यच चांगले नाही म्हणून दोष देत बसू नका. तुमची मेहनत, तुमचे प्रयत्न हेच तुमचे भविष्य घडविणार आहे. त्यामुळे तुमचे यश हे तुम्ही कोणत्याही कामामध्ये किती मेहनत घेता यावर अवलंबून असते.

     अशाप्रकारे यशस्वी बनण्यासाठी होकारात्मक विचार ठेवणे, होकारात्मक साहित्याचा वापर करणे गरजेचे ठरते. अपयशाकडून - यशाकडे जातांना रस्त्यावर अनेक ठिकाणी अपयशाचे बॅरियर लावलेले आहेत. मात्र त्याला पार करून जाण्याची जो हिंम्मत दाखवेल तो निश्चित यशस्वी होईल यात काहीही शंका नाही.

Post a Comment

1 Comments