Inflame of Petrol पेट्रोलचा भडका


Inflame of Petrol पेट्रोलचा   भडका
     अन्न, वस्त्र आणि निवारा हया माणवाच्या मुलभूत गरजा आहे. याशिवाय माणूस जगू शकत नाही. मात्र त्याला त्याचे जीवन अधिक सुखकर करायचे असेल तर इतर साधनांची मदत घ्यावी लागते. अनेक कारणासाठी घरातून व्यक्तीला बाहेर पडावे लागते आणि बाहेर पडण्यासाठी मोटर बाईक, कार यांचा वापर करावा लागतो. आज सामान्यातील सामान्य माणसांकडे मोटर बाईक आहे. मोटर बाईक चालवण्यासाठी त्याला पेट्रोलची गरज पडते. पेट्रोलला अजून पर्यायी इंधन उपलब्ध झाल्यामुळे पेट्रोल ही सध्यातरी प्रत्येक व्यक्तीची एक महत्वपूर्ण गरज बनली आहे. अशा या पेट्रोलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असल्याने सामान्यांची चिंता वाढली आहे. अगोदरच कोरोणाच्या चिंतेने माणसं परेशान आहेत त्यात पेट्रोलच्या किंमतीने अजून भर घातली आहे. त्यामुळे सामान्यांच्या जीवनामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र ज्या कंपन्यांना पेट्रोल विकण्याची परवानगी सरकारने दिली आहे. त्यांचे मात्र उखळ पांढरे झाल्याचे पाहायला मिळते.
1. कच्च्या तेलाच्या किंमती:
    आज आपण सौदी अरेबिया, इराक, इरान, अमेरिका इ. देशाकडून कच्च्या तेलाची आयात करतो. 2019 मध्ये 91.24 मिलियन टन कच्च्या तेलाची आयात आपण वरील देशांकडून केली आहे. सौदी अरेबिया या देशाकडून  भारत कच्च्या तेलाची सर्वांत मोठया प्रमाणात आयात करतो. मागील तीन वर्षातील कच्च्या तेलाच्या किंमती बघीतल्या तर 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सगळयात मोठी घसरण झालेली दिसून येईल.
अ.क.
वर्ष
कच्च्या तेलाच्या किंमती (डॉलरमध्ये)
1
2018
$65.23
2
2019
$56.99
3
2020
$37.33
     वरील चार्ट वरून आपणास कल्पना येईल की, 2018 पासून कच्च्या तेलाच्या किंमती लगातार घटत गेलेल्या आहे. मात्र त्या प्रमाणात भारतातील पेटोलच्या किंमती कमी झालेल्या नाहित.
अ.क.
वर्ष
भारतातील पेट्रोलच्या किंमती (प्रती ली.)
1
2018
86.04
2
2019
76.94
3
2020
86.70
     वरील दोन्ही चार्टचे विश्लेषण केल्यास आपणास असे दिसते की, 2018 मध्ये कच्च्या तेलाच्या किंमती $65.23 असतांना आपल्याला प्रती/लिटर 86.04 रूपये मोजावे लागत होते. आज 2020 मध्ये कच्च्या तेलाच्या किंमती खुप कमी म्हणजे $37.33 झालेल्या असतांनाही आज आपण 86.70 रूपये प्रती/लिटर दराने पेट्रोल खरेदी करीत आहे. म्हणजे 2020 मध्ये कोरोणामुळे कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किंमती ऐवढया कमी  झाल्या असूनही सरकार चढया भावाने भारतीय लोकांना पेट्रोल विकत आहे. कोरोणामुळे सर्व उद्योग बंद आहे. सरकारचे उत्पन्न घटले आहे हे मान्य आहे. मात्र सर्वसामान्यांची गरज असलेल्या पेट्रोलवर जबरी कर लावणे योग्य ठरत नाही. त्यासाठी सरकारांनी इतर पर्याय शोधायला हवे.
3. भारत आशियातील इतर देशांमधिल पेट्रोलच्या किंमतीची तुलना:
अ.
देश
पेट्रोलच्या किंमती (प्रती ली.)
1
भारत
86.70
1
पाकिस्तान
74.52
2
चीन
83.23
3
बांग्लादेश
81.45
     शेजारी देशातील पेट्रोल किंमतीच्या बाबतीत भारतीय पेट्रोल किंमतीची तुलना केली असता जुन 2020 मध्ये भारतामध्ये वरील देशाच्या तुलनेने मोठया प्रमाणात पेट्रोलच्या किंमतीमध्ये वाढ झालेली आहे. कोरोणाच्या संकटकाळातही आंतरराट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती खुप कमी झालेल्या असतांना भारतामध्ये चढया भावाने पेट्रोल विकले जात आहे. त्यामुळे सामान्याचे कमरडे मोडले आहे.
4. सरकारांनी उत्पन्नाचे दुसरे साधने शोधावी:
     कोरोणामुळे पहिलेच लोक मेटाकुटीला आलेले आहेत. तीन- चार महिण्यापासून पगार नाहीत, शिल्लकचा पैसा राहिला नाही आणि वरून पेट्रोलचे भाव प्रचंड वाढले आहेत. पेट्रोलचे भाव एवढे कसे वाढले हे पाहिले तर केंद्र सरकार व राज्य सरकारांनी पेट्रोलवर प्रचंड प्रमाणात कर लावलेला आहे. त्यामुळे भारतामध्ये मुळ पेट्रोलच्या किंमतीपेक्षा करच जास्त लावून पेट्रोल विकले जात आहे. मात्र पेट्रोलसारख्या जीवनावश्यक पदार्थावर कर लावणे म्हणजे एकप्रकारचे शोषणच आहे. त्यामुळे सरकारांनी इतर उत्पन्नाची साधने शोधावी पेट्रोलवर लावलेला जबर कर कमी करावा.  
5. अनेक लोक बेरोजगार:
     कोरोणाकाळामध्ये अनेक लोक बेरोजगार झालेले आहेत. त्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन राहिले नाही. अशा अवस्थेमध्ये लोक वाट्टेल ती कामे करीत आहेत. मात्र त्यांना जाण्या - येण्यासाठी मोटर बाईकला पेट्रोलची गरज भासते. पेट्रोलच्या चढया भावामुळे लोक परेशान झालेले आहेत.
6. खाजगी कंपन्यांचा फायदा:
     सरकारने वाढवलेल्या पेट्रोलच्या किंमतीमुळे खाजगी कंपन्यांना मोठया प्रमाणात फायदा होत आहे. एरवी रिलायंस, यस्सार, टाटा यासारख्या कंपन्या पेट्रोलचे भाव 70 रूपये पेक्षा कमी झाले तर पेट्रोल विकत नाही. मात्र आता हया कंपन्या प्रचंड नफा कमवत आहेत. त्यामुळे यातून जास्तीचा फायदा हा खाजगी कंपन्यांनाही होत आहे. याकडे सरकारने लक्ष दयावे.
7. सरकारला आपल्याचे लोकांचे शोषण करून मोठे होता येणार नाही:
     सरकारने मोठया प्रमाणात कर आकारल्यामुळे पेट्रोलच्या किंमती वाढल्या आहेत. मात्र संकटकाळामध्ये आपल्याच लोकांचे शोषण करून सरकारांना पैसा कमवता येणार नाही. हे वर्तन भारतीय संविधानातील न्यायाच्या तत्त्वाच्या विरूध्द आहे. आज ना उदया सामान्यांना याची जाणीव होईल. आणि लोक सरकारला याबाबतीत जाब विचाल्याशिवाय राहणार नाहीत.

Post a Comment

1 Comments