शिवराज्यभिषेक सोहळा (Shivrajyabhishek Sohala)


शिवराज्यभिषेक सोहळा 

(Shivrajyabhishek Sohala)


      शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा संपूर्ण भारत भर मोठया उत्साहात साजरा केला जात आहे. प्रत्येक जण सोशल मेडीयावर सोहळयाच्या पोष्ट पाठवत आहेत मात्र महाराजांनी निर्माण केलेले राज्य पेशवाईच्या घशात घालण्याची परिस्थिती निर्माण होवू पाहत आहे. यावर फार जास्त कोणी चिंतन करतांना दिसत नाही. देशामध्ये प्रतिक्रांतीचा जोर सुरू आहे. हीच पेशवाई पुन्हा वर्तमान लोकशाही गिळंकृत करण्यास टपून बसली आहे. इतक्या दिवस चोरून चोरून लोकशाहीला आव्हान देणारी पेशवाई आता उघडपणे लोकशाहीला आव्हान देत आहे. आणि लोक मात्र आपला देव आणि धर्म यांना कवटाळून बसले आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये धर्माच्या नावावर कुठेही जुलूमजबरी झालेली दिसत नाही. आज मात्र हिंदू विरूध्द मुस्लिम आणि एस.सी, एस. टी अशी भांडणे लावून पेशवाईंने महाराजांच्या राज्याला सुरूंग लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
     शिवाजी महाराजांचे आजोबा आबासाहेब लखुजीराजे भोसले यांनी मनुस्मृती आणि इथल्या रूढी परंपरा योना फाटा देत राजमाता जिजाउ यांना शिक्षण आणि राजकारणाचे धडे दिले. त्याच बरोबर मुलगा - मुलगी असा भेद भाव न करता घोडयावर बसणे, दांडपटटा चालविणे यासारखे पुरूषी लष्करी शिक्षण दिले. याच अनुभवाच्या जोरावर राजमाता जिजाउंनी महाराजांना मराठी, उर्दू, फारशी, कन्नड हया भाषा शिकविल्या. समाजकारण, राजकारण, धर्मनिरपेक्षता, परधर्म आदर आणि सहिष्णुता इ. गुणांची रूजवणूक केली. 
     ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक करण्याचे ठरले त्यावेळेस महाराजांना तुम्ही क्षत्रिय नसून शुद्र आहात म्हणून राज्यभिषेकास विरोध केला. पण धर्माची मक्तेदारी स्वतः कडे ठेवून पाहणा-या धर्ममारर्तंडाना सुवर्ण मुद्रांचे अमिश दाखवल्याबरोबर राज्यभिषेक करण्याची मान्यता दिली. आणि 15 होन सुवर्ण मुद्रा घेउन क्षत्रिय कुलवंतांना डाव्या पायाच्या अंगठयाने तिलक लावला. हे शल्य आजही आम्ही विसरू शकत नाही.
     आज शिवाजी महाराजांच भव्य दिव्य स्मारक अरबी समुद्रात करोडो रूपये खर्च करून बांधल्या जात आहे. त्याचा आम्हाला अभिमानच आहे. मात्र ज्या लोकांना शिवाजी महाराजांचा इतिहास माहित नाही आणि जे नेहमी खोटा इतिहास सांगण्यात पटाईत आहेत ते महाराजांच कर्तृत्व बंदिस्त करून जगासमोर येउ नये म्हणून दैवतीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणजे रयतेने महाराजांच कर्तृत्व विसरून पुन्हा त्याच मुर्तीपुजेत गुरफटून रहाव. आणि तिथे दक्षिणा घेण्यासाठी टपून बसलेल्या ढेरपोटयांची पोट आणखी आयत खाउन फुगावी यासाठी ही तजवीज तर नाही ना.
     आज शेतक-यांच्या आत्महत्त्या पाहिल्या की महाराजांची आठवण होते. महाराजांना शेतक-यांची किती काळजी होती. युध्दाला निघालेल्या सैन्याने उभ्या पिकाची कसलीच नासधूस करू नये असा कडक हुकूम सैन्यास दिलेला असे. महाराजांनी पडीक जमिनी लागवडी खाली आणल्या, सावकारी बंद केली, तरूणांना सैन्यात नोक-या दिल्या. परस्त्रीला मातेसमान वागवले. व्यापा-यांसाठी कायदे कानून बनविले, आयात निर्यात धोरण ठरविले. अशी दुरद्रुष्टी महाराजांकडे होती नाहीतर आजचे सरकारे सर्व विकायला निघालीत. शेतक-यांच्या पिकाला रास्त भाव नाही. कुठे ओला तर कुठे कोरडा दुष्काळ पडत आहे. सावकाराच्या कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्त्या करीत आहे. त्याचा आज कुणीही वाली राहिला नाही. सर्व जातीधर्माच्या लोकांना सैन्यामध्ये स्थान देवून सामाजिक सलोख महाराजांनी निर्माण केला होता आज मात्र धार्मिक तेढ निर्माण करून एकमेकांना एकमेकांच्या विरोधात लढवल्या जात आहे. 
     आज शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिन सोहळयाच्या निमित्ताने सर्व बहुजन एकत्र येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो....शेवटी आपणा सर्वांना राज्यभिषेक दिन सोहळयाच्या हार्दिक शुभेच्छा.
संदर्भः
1.  महानायक न्युजपेपर - रवी घायवट यांचा लेख
2. www.googl.co.in

Post a Comment

0 Comments