State Socialism of Dr. Ambedkar
डॉ. आंबेडकरांचा राज्य समाजवाद
समाजवाद हा
आधुनिक सिध्दांत
असून त्याची
निर्मिती ही
पाश्चात्य देशामध्ये
झालेली आहे.
काही लेखकांच्या
मते समाजवाद
हया संकल्पनेचे
मुळे हे
ओल्ड टेस्टामेंट
मध्ये आहे.
तर काहींच्या
मते प्लेटोचा
रिपब्लीक हा
ग्रंथ प्राचीन
समाजवादाचे उत्कृष्ट
उदाहरण आहे.
समाजवाद ही
संकल्पना 1827
मध्ये इंग्लंडमध्ये
वापरण्यात आली.
त्याचे अनेक
प्रकार आहेत.
ते पुढील
प्रमाणे फबियन
समाजवाद, सिंडीकॅलिस्ट
समाजवाद, मार्क्ससियन
समाजवाद, युटोपियन
समाजवाद, गिल्ड
समाजवाद, गांधीयन
समाजवाद आणि
राज्य समाजवाद.
19 व्या
शतकामध्ये एकात्मवादाच्या विरोधात
उमटलेली तीव्र
प्रतिक्रीया म्हणून
समाजवादाकडे बघितले
जाते. समाजवादी
सिध्दांताचे तत्वे
जगातील अनेक
विचारवंतांच्या तत्त्वज्ञानामध्ये पाहायला
मिळतील त्यामध्ये
जर्मनीमधिल एडवर्ड
बर्नस्टेन, बेल्जीयम
मधील एडॉर्ड,
स्विडनमधिल कार्ल
ब्रँटींग आणि
भारतामधिल डॉ.
बाबासाहेब आंबेडकर.
कार्ल मार्क्सच्या
मते राज्य
(राज्य हा
शब्द याठीकाणी
देश या
अर्थाने घेतलेला
आहे.) हे
शोषणाचे साधन
असल्याने ते
नष्ट करायला
हवे. तर
डॉ. आंबेडकरांच्या
राज्य समाजवादाचा
हेतू भांडवलदारांची
शोषणकारी, असमानतेची
वाईट प्रवृत्ती
नष्ट करणे
हा आहे.
कल्याणकारी राज्याच्या
स्थापनेसाठी राज्य
समाजवाद महत्त्वाची
भूमिका बजावते.
राज्य समाजवादयांच्या मते
केवळ राज्य
हेच शोषणकारी
व्यवस्था थांबवू
शकते आणि
सामान्यांचे कल्याण
करू शकते.
उत्पादनाच्या साधनांचे
राष्ट्रीयकरण करणे,
कामगारांना समान
कामासाठी समान
वेतन देणे.
त्यामुळे कामगार
आणि मागासवर्गीयांना राजकीय
आणि आर्थिक
क्षेत्रामध्ये स्वातंत्र्य
आणि समतेची
संधी मिळेल.
भारतामध्ये राज्य
समाजवादाचा सिध्दांत
डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांनी विकसित
केला. 1946
मध्ये ऑल
इंडिया शेडुल्ड
कास्ट फेडरेशनच्या
वतीने निवेदनाद्वारे
राज्य आणि
अल्पसंख्यांक या
नावाने कान्स्टीटयुशन
असेंब्ली समोर मांडला. त्यामध्ये
अनेक महत्त्वपूर्ण
मुदयांचा समावेश
करण्यात आला
होता. जन्माने
आणि नैसर्गिकरीत्या नागरिकत्व
प्राप्त झालेल्या
प्रत्येक नागरिकांना
समानतेची वागणूक
देणे. जात,
धर्म, पंथ,
चालीरीती, जन्म
याच्या आधारे
काहींना देण्यात
आलेले जास्तीचे
अधिकार राज्याने
नष्ट करावे.
सर्वांसाठी समान
कायदा आणि
कायदयाने सर्वाना
समान संरक्षण
देण्यात यावे.
राज्याने भारतीय
नागरिकांच्या मुलभूत
अधिकारांचे संरक्षण
करावे. राज्याचा
कोणताही अधिकृत
धर्म नसावा.
प्रत्येक नागरिकाला
देशातील कोणत्याही
भागात जावून
राहण्याचे स्वातंत्र्य
असावे. राज्याने
प्रत्येक नागरिकाला
नागरिकत्वाचे प्रमाणपत्र
पुरवावे. प्रत्येक
नागरिकाला मतदान
करण्याचा अधिकार
मिळावा. राज्याने प्रत्येक
नागरिकाला स्वातंत्र्याची हमी
दयावी. एक
व्यक्ती एक
मूल्य हे
डॉ. आंबेडकरांच्या
राज्य समाजवादी
तत्त्वज्ञानाचे महत्त्वाचे
तत्त्व होते.
वंश आणि
जन्माच्या आधारावर
कोणत्याही नागरिकाला
अपात्र ठरविल्या
जावू नये.
कोणत्याही नागरिकाला
मतदान करण्याच्या
अधिकारापासून वंचित
ठेवण्यात येवू
नये. राज्याने
प्रत्येक नागरिकाला
धार्मिक स्वातंत्र्याची हमी
दयावी. राज्याचा
कोणताही अधिकृत
धर्म नसावा.
डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांनी त्यांच्या
निवेदनात स्पष्ट
केले होते
की, राज्याची
न्यायविषयक सत्ता
ही सर्वोच्च
न्यायालयालयाच्या हाथी
असावी. आणि
नागरिकांच्या मुलभूत
अधिकाराच्या संरक्षणाची
जबाबदारी ही
सर्वोच्च न्यायालयावर
असावी. कायदेमंडळ
आणि कार्यपालिका
यांच्या अन्यायापासून
नागरिकांचे संरक्षण
करणे ही
न्यायपालिकेची जबाबदारी
असावी. यासाठी
सर्वोच्च न्यायालय
व उच्च
न्यायालय यांना
राज्याच्या विरोधात
रिट दाखल
करण्याचा अधिकार
असावा.
संसदीय लोकशाहीच्या
माध्यमातून हुकूमशाही
प्रवृत्ती नष्ट
करून व्यक्ती
स्वातंत्र्य अबाधित
ठेवायला हवे.
राज्य समाजवाद
हा संसदीय
लोकशाहीवर आधारलेला
आहे. राज्य
समाजवाद प्रस्तापित
करण्यासाठी अन्याय,
हुकूमशाही आणि
निरंकुश सत्ता
मोडीत काढायला
हवी. इतरावर
राज्य करण्याचा
अधिकार राज्याने
कोणत्याही विशिष्ट
व्यक्तीकडे देवू
नये.
संसदीय लोकशाहीचे
अपयश म्हणजे
बंड, गोंधळ
आणि साम्यवादाला
आमंत्रण होय.
जर या
देशामध्ये संसदिय
लोकशाही अपयशी
ठरली तर
बंडाळी, गोंधळ
आणि साम्यवाद
आल्याशिवाय राहणार
नाही. प्रत्येक
पुरूष आणि
स्त्रीला शास्त्राच्या
मानसिक गुलामगिरीतून
मुक्त करायला
हवे. तरच
खऱ्या अर्थाने
संसदीय लोकशाहीमध्ये
राज्य समाजवाद
निर्माण करता
येईल.
भारतीय समाज
हा जाती
व उपजाती
यावर आधारलेला
आहे. गरिबी
ही भारतीय
समाजातील अतिशय
वाईट व्यवस्था
आहे. डॉ.
आंबेडकरांचा राज्य
समाजवाद हा
गरिबीवर जोराचा
हल्ला करतो.
कारण गरिबीमुळे
माणसे आजारावर
उपचार करू
शकत नाही.
गरिबीमुळे व्यक्तीच्या
जीवनात नैराश्य
येते. गरिबी
आणि समाजवाद
एक त्र
राहू शकत
नाही. त्यामुळेच
त्यांनी राज्य
आणि अल्पसंख्यांक
या आपल्या
निवेदनात म्हटले
होते की,
अनु. जातींना
कायदेपालिका, कार्यपालिका,
म्युनसिपालटी, केंद्रिय
सेवांमध्ये प्रतिनिधीत्व
देण्यात यावे.
राज्याने सगळयांना
पुरेस प्रतिनिधीत्व
दयायला हव.
राज्य समाजवादाचा
हेतू हा
असमानता आणि
जातीय व्यवस्था
नष्ट करणे
हा आहे.
राज्य समाजवाद
हा न्यायाच्या
तत्त्वावर आधारलेला
आहे. डॉ.
आंबेडकरांच्या मते,
माणसामध्ये जन्म,
मानसिक क्षमता,
अनुवंश आणि
सामाजिक वातावरण
यावरून भिन्नता
आढळते. मात्र
त्याना त्यांचा
विकास करण्यासाठी
समान संधी
दयायला हवी.
त्यासाठी व्यक्ती
व्यक्तीमध्ये आंतरजातीय
विवाह, रोटी
व्यवहार व्हायला
हवे. हिंदू
धर्मातील जाती
आणि उपजाती
हया लोकशाही
विरोधी आणि
मानवतेविरोधी आहेत.
म्हणून त्या
नष्ट करायला
हव्या.
कार्ल मार्क्सच्या
समाजवादाला वैज्ञानिक
समाजवाद म्हटले
जाते. त्याचा
आधार हा
वर्ग संघर्ष
आहे. परंतु
डॉ. आंबेडकरांचा
समाजवाद हा
शांतता, अहिंसा
आणि कायदयावर
आधारीत आहे.
त्यांचा वर्ग
संघर्षावर विश्वास
नाही. मार्क्सचा
समाजवाद हा
युरोपिय देशातील
मजुरवर्गासी संबंधी
आहे. तर
डॉ. आंबेडकरांचा
समाजवाद हा
पद दलित
वर्गासी सबंधित
आहे. त्यांना
त्यांच्या जीवनामध्ये
आलेल्या अनुभवावरून
जातीय व्यवस्था
हीच शोषणाची
व्यवस्था असल्याने
राज्याऐवजी जाती
व्यवस्था नष्ट
करावी असे
त्यांचे मत
होते. तर
मार्क्सच्या मते
राज्य हेच
शोषणाचे साधन
असल्याने तेच
नष्ट करायला
हवे. मात्र
दोन्ही तत्वज्ञानामध्ये एक
साम्य दिसते
ते म्हणजे
मानवतेच्या शोषणा
विरूध्द लढा.
डॉ. आंबेडकरांच्या
मते, महत्त्वाचे
उद्योग हे
राज्याच्या मालकीचे
असावे आणि
राज्याने ते
चालवावे. इंशुरंस
ही राज्याची
मक्तेदारी असावी.
इंशुरंस हा
खाजगी लोकांच्या
हाती देवू
नये. इंशुरंस
च्या माध्यमातून
नागरिकांना संरक्षण
दयावे. शेती
उद्योग हा
राज्याच्या मालकीचा
असावा. शेतीमध्ये
सामुहिक शेतीचा
प्रयोग करण्यात
यावा. गावातील
शेती ही
जात, पंथ
असा भेदभाव
न करता
सगळयांना समान
प्रमाणात वाटून
दयावी. त्यामुळे
कुणीही जमीनदार
राहणार नाही
आणि कुणीही
जमीन नसलेला
मजूर राहणार
नाही.
अशा प्रकारे
शोषणा विरूध्द
समतेचे तत्त्वज्ञान
डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांनी त्यांच्या
राज्य समाजवादामध्ये
मांडले. मार्क्सचा
हिंसावादी समाजवाद
या जगाला
कधी उध्वस्त
करेल हे
कधीच कळणार
नाही. मुळात
राज्य ही
संकल्पनाच मार्क्सला
मान्य नाही.
कारण राज्य
हे शोषणाचे
साधन आहे
असे मार्क्स
म्हणतो. मात्र
डॉ. आंबेडकरांनी
राज्याला महत्त्वाचे
स्थान दिले
आहे. मात्र
जोपर्यंत जातीवर
आधारीत शोषणकारी
व्यवस्था थांबणार
नाही तोपर्यंत
डॉ. आंबेडकरांचा
राज्य समाजवाद
भारतामध्ये बहरणार
नाही.
Reference:
1. State & Minorities - Dr. B. R. Ambedkar
2. Annihilation of Caste-Dr. B. R. Ambedkar
3. Dr. Ambedkars theory of S.S-Badal Sarkar
0 Comments