When will come the Vaccine on Corona Virus? कोरोणावर लस केंव्हा येवू शकते ?

When will come the Vaccine on Corona Virus?

कोरोणावर लस केंव्हा येवू शकते ?

     बाबारामदेवने कोरोणावर आयुर्वेदिक औषण तयार केले आणि कोणत्याही सरकारी ऑथराईज बॉडीकडून मान्यता घेता सरळ मेडीयामधून जाहिरातबाजीला सुरूवात केली. अनेक लोक या जाहिरातीला बळी पडतील आणि औषध खरेदी करतीलही. अनेक राज्यातील सरकारांनी बाबा रामदेवच्या औषधावर बंदी आणली. आपल्याला माहित आहे की, आयुर्वेदिक औषधांचा आजारावर ताबडतोब परिणाम होत नाही. त्यासाठी साधारणत: सहा महिण्याचा अवधी लागतो या सहा महिण्यात रेग्युलर आयुर्वेदिक औषध घ्यावे लागते. मात्र बाबा रामदेव यांनी केलेला दावा किती खरा हे लवकरच कळेल. ॲलोपॅथी ही औषधोपचार पध्दती जगाने स्विकारल्या मागे कारण हे आहे की, त्यामुळे रोग्याला लवकर आराम पडतो आजार लवकर बरा होतो. कोरोणावर इतर आजारावरील औषधांचा वापर करून कोरोणाचे अनेक पेशंट बरे झालेले आहेत. त्यामुळे संशोधक कोरोणावर कायमचा उपाय शोधून काढण्यासाठी प्रयत्नरत आहेत.

     कोरोणा विषाणूने जगामध्ये प्रचंड थैमान घातले आहे. जगातील अनेक प्रगत देश सुध्दा या व्हायरस समोर हतबल झाले आहे. मात्र प्रत्येक देशातील वैद्यकशास्त्रातील संशोधक हे कोव्हीड 19 या आजारावर लस शोधण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. अमेरिका, जपान, इटली, फ्राँन्स, कोरीया, चिन आणि भारत यासारख्या देशातील अनेक फार्मसी कंपन्या कोव्हीड 19 चे नियंत्रण करण्यासाठी कोणी फेज वन मध्ये, कुणी फेज टु मध्ये आणि कुणी फेज थ्री मध्ये पोहोचल्या आहे. वरील अनेक देशांच्या प्रयत्नांमुळे कोव्हीड 19 वर एकुण 14 लसीचे संशोधन झाले असून त्यांचे माणवी परिक्षण करणे सुरू झाले आहे. लसीच्या संशोधन आणि परिक्षणासाठी साधारणत: सहा महिने लागतील असे संशोधकांनी सांगीतले आहे. कारण सुरक्षित आणि परिणामकारक लस शोधण्यावर संशोधकांचा भर आहे.

     साधारणत: पहिल्या लसीचे संशोधन हे जानेवारी मध्ये सुरू झाले. SARS-Cov2 genome या लसीची माणवावर ट्रायल मार्चमध्ये सुरू झाली. तसेच अनेक लसींचे कोरोणा व्हायरसवर नियंत्रण प्राप्त करण्यातील यश - अपयश हे अजून अनिश्चित आहे. काही ट्रायल यशस्वी होतील तर काहींमध्ये अपयश येईल परंतु काही लसी माणवी शरीरात प्रतिकार क्षमता वाढवण्यात अँण्टीबॉडी निर्माण करण्यात यशस्वी होतील असे वाटते.

पुढील काही लसींची यशस्वीतेकडे वाटचाल सुरू आहे:

1. Sinophorm या चीनी कंपनीची लस ही फेज 3 च्या ट्रायलसाठी पोचली आहे.

2. mRNA-based vaccine या दुसऱ्या चीनी कंपनीची लस ही फेज 1 च्या ट्रायलमध्ये आहे.

3. चायनिज कंपनी Anhai Zhifei Longeom ही सुध्दा फेज 1 च्या ट्रायलमध्ये आहे.

4. कोरीयन कंपनी Genexine हया कंपनीची लस ही फेज 1 च्या ट्रायलमध्ये आहे.

5. भारतातील सहा कंपन्या या लसीसंदर्भात संशोधन कार्य करीत आहेत.

लसींची चाचणी (Vaccine Testing):

     संशोधक या लसींचा सर्वप्रथम प्राण्यावर वापर करतात. उदा. उंदिर, माकड इ. या प्राण्याच्या शरीरामध्ये कोरोणा व्हायरसच्या विरोधात प्रतिकार क्षमता निर्माण होते का याचा शोध घेतात. त्यासाठी या लसीला अनेक फेज मधून जावे लागते.

1. फेज - 1:

     साधारणत: प्राण्यावर केलेल्या प्रयोगात यशस्वी झाल्यानंतर माणवाच्या छोटया ग्रुपवर हा प्रयोग केला जातो.  फेज - 1 मध्ये संशोधक लोकांच्या छोटया ग्रुपवर लसीचा प्रयोग करून शरीरामध्ये कोरोणा व्हायरस विरोधात प्रतिकारक्षमता विकसित होते का नाही याची तपासणी करतात.

2. फेज - 2:

     या फेजमध्ये संशोधक शंभर लोकांच्या वेगवेगळया वयोगटानुसार ट्रायल घेतात. त्यामध्ये छोटीमुले, मोठी माणसे इ. प्रत्येक गटावर लसीचा काय परिणाम होतो त्याची तपासणी करतात.

3. फेज - 3:

     या फेजमध्ये संशोधक हजारो लोकांच्या ग्रुपवर लसीची ट्रायल घेतात आणि यामध्ये फेज - 2 मध्ये केलेल्या लोंकांपेक्षा कितीजण इंन्फेक्टेड होतात याची तुलना करतात. आणि हीच ट्रायल ठरविते की, सदर लस ही व्हायरस पासून संरक्षण करेल की नाही.

लसीला मान्यता:

     प्रत्येक देशाची सरकारी आरोग्यविषयक यंत्रणा ही अशा प्रकारच्या लसींच्या ट्रायलचा अभ्यास करून त्या लसीला मान्यता दयायची की नाही ते ठरविते. भारतामध्ये कोणत्याही लसीच्या मान्यतेसाठी The Drug Controller General of India (DCGI), The Indian Council of Medical Research हया संस्थांची मान्यता घ्यावी लागते.

कोरोणावर लस कधीपर्यंत उपलब्ध होवू शकते:

     विदेशातील अनेक कंपन्यांनी असा दावा केला आहे की, साधारणत: 2021 मध्ये कोरोणावर प्रभावी लस येवू शकते. चीनी कंपनी Sinophorm ने म्हटले आहे की साधारण जुलै 2021 मध्ये प्रभावी लस बाजारात येवू शकेल. वरील सर्व कंपन्यांच्या संशोधनावरून असा निष्कर्ष निघतो की साधारणत: 2020 च्या शेवटी शेवटी कोव्हीड 19 या आजारावर प्रभावी लस येवू शकेल. त्योपर्यंत प्रत्येकाने WHO, IMRC यांच्या मार्गदर्शक सुचनेचे पालन करावे.

Post a Comment

1 Comments