Why Difficult Boycott on Chinese Product? चीनी वस्तूवर बहिष्कार घालणे का अवघड आहे?

   
     चीनी वस्तूवर बहिष्कार घालणे का अवघड आहे?
     गालवान घाटीमध्ये झालेल्या विवादात 20 भारतीय जवान शहिद झाले. आज संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. आणि प्रत्येक जन वाटटेल त्या मार्गाने चीनचा निषेध करीत आहे. कुणी चीनी सामान जाळून, कुणी कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू जाळून निषेध नोंदवत आहेत. चीनला वठणीवर आणण्यासाठी चीनी वस्तूवर बहिष्कार घालण्याची मागणी लोक भारत सरकारकडे करीत आहेत.. चीन विरोधात मोठे आंदोलन निर्माण झालेले आहे. ज्या ज्या वेळी चीन सोबत वादविवाद निर्माण होतो, सिमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होते त्या वेळेस भारतीय माणूस चिनी वस्तूवर बहिष्कार घालण्यासाठी आंदोलन करतात आणि काही दिवसानंतर दुःखाची तिव्रता कमी झाली की परत चायनीज वस्तू मोठया प्रमाणात विकत घेतल्या जातात. आज भारतातमध्ये असलेल्या सेल फोन पैकी 60 टक्के सेल फोन हे चायनिज कंपन्याचे आहेत आणि ते स्वस्त असल्यामुळे आपण खरेदी करतो. भारतातील कोणत्याही कंपनीने अजून चीनच्या तोडीच्या वस्तू त्यांच्या बरोबरीच्या किंमतीमध्ये बाजारात आणल्या नसल्याने लोकांकडे पर्याय नाही. लोकांना पर्याय निर्माण करून देणे गरजेचे आहे. 
1. चीनच्या वस्तू स्वस्त का असतात:
     चीनच्या वस्तू स्वस्त असण्यामागचे कारण म्हणजे. कामगार आणि कच्चे मटेरिअल चीनमध्ये स्वस्त असल्याने व त्यातून निर्माण होणारे उत्पादन मोठयाप्रमाणात होत असल्याने निर्मिती खर्च कमी येतो. त्याचबरोबर प्रत्येक वस्तूची मार्केटिंग, त्याचा ग्राहकापर्यंतचा पुरवठा ही चैन चीनने प्रत्येक देशामध्ये निर्माण केली असल्याने त्यांना आपला माल सामान्य ग्राहकापर्यंत पोहोचवण्यात यश आले आहे. भारतामध्ये चीनी वस्तू लोकप्रीय होण्याचे दुसरे कारण म्हणजे वस्तूंच्या किंमती फारच कमी आहे. चीनच्या वस्तू अतिशय आकर्षक असून  मोठे दुकाणदार आणि छोटेमोठे व्यापारी यांना त्यातून मोठा नफामिळतो. भारतामध्ये चीनी वस्तू विकत घेण्यासाठी कोणीही जबरदस्ती करीत नाही मात्र वस्तूची गुणवत्ता आणि कमी किंमत यामुळे चीनी वस्तूंनी भारतीय मार्केट काबीज केले आहे. 
2. भारत हा चीनचा सगळयात मोठा गि-हाईक देश. 
     भारतामध्ये 20 मिलियन डॉलर्स इलेक्टॉनिक्स वस्तूची आयात केली जाते, 10.5 मिलियन डॉलर्स न्युक्लियर रिअॅक्टर आणि मशिनरीजची आयात केली जाते त्याच बरोबर केमिकल 6 बिलियन डॉलर्स आणि स्टिल 2.3 बिलियन डॉलर्स ची आयात केली जाते.  भारताने 2019 मये 19.97 बिलियन डॉलर्स चे इलेक्ट्रॉनिक उपकरणे विकत घेतली. यावरून आपल्याला कल्पना येईल की भारत किती मोठया प्रमाणात चीनचा ग्राहक आहे. शावमी, व्हिवा, रेडमी, रिअलमी यासारख्या मोबाईल कंपन्यांनी 60 टक्के मार्केट काबिज केले आहे. 
3. भारतातील कंपन्यात चीनची गुंतवणूक
     भारतातील अनेक कंपन्या ज्यामध्ये बीग बास्केट, बायजू, फिल्पकार्ट, हाईक, ओला, ओयो, पेटीयम, पॉलिसी बाजार, स्नॅपडिल, स्वीगी, झोमेटो, उडान इ. मध्ये चीनने गुंतवणूक केली आहे. 50 टक्के टॉप अॅपमध्ये चीनने गुंतवणूक केलेली आहे. 
4. चीनी कंपन्याची मक्तेदारी:
     टीकटॉक या व्हिडीयो अॅपचे 200 मिलियन सबस्क्रायबर भारतीय आहेत आणि भारतामध्ये टिकटॉकने युटूबलाही मागे टाकले आहे. मोबाईल कंपन्या, इलेक्ट्रानिक्स उपकरण निर्माण करणा-या कंपन्यांनी भारतामध्ये भारतीय कंपन्यांना मागे टाकले आहे. चीनी कंपन्या आणि त्यांचे उत्पादन हा भारतीय लोकांच्या जीवनाचा भाग झालेला आहे. त्यामुळे हया सर्व वस्तूवर बहिष्कार टाकण्यासाठी त्यांच्या तोडीची उत्पादने भारताला निर्माण करावे लागेल. त्यासाठी लागणा-या उद्योगधंदयाची निर्मिती करावी लागेल तरच आपण चीनच्या वस्तू भारतामधून कायमच्या हददपार करू शकू.
     भारतीय नागरिकांनी केवळ भावनिक होवून प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी चीनी वस्तूवर बहिष्कार घालणे गरजेचे आहे. चीनी वस्तूवर बहिष्कार घालणे अवघड आहे. मात्र भारत सरकारने चीन सोबत केलेले आर्थिक व्यवहार, चीनी कंपन्यांची सरकारी कंपन्यामधील गुंतवणूक थांबवण्यासाठी सरकारवर दबाव आणायला हवा. आर्थिक नाडया आवळल्यास चीन वठणीवर येवू शकतो . इथून पुढे भारत चीन सिमावादावून आपल्या एकाही सैनिकाला प्राण गमवावे लागणार नाही. यासाठी चीनचा कायमचा बंदोबस्त करायला हवा. 

Post a Comment

1 Comments