RSS, BJP च्या 5 ऑगस्ट तारखेच सत्य
RSS, BJP च्या 5 ऑगस्ट तारखेच सत्य

    भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. ज्याला त्याला आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार आहे. मात्र कोरोनासारख्या महामारीच्या काळामध्ये अनेक लोक संक्रमित झाले आहेत, अनेकांचा मृत्यु होत आहे. हेल्थसेक्टर पूर्णपणे कोलमडून पडले आहे. दवाखाण्यात लोकांना बेड नाहीत. अशा अवस्थेमध्ये एखादया राष्ट्राचा प्रमुख जर मंदिराच्या भूमिपुजनाचे कार्यक्रम राबवित असेल तर विचार करायला लावणारी गोष्ट आहे. आर.एस.एस. ही भाजपाची मदर ऑरर्गनाइझेशन आहे. आ.एस.एस. ने सांगितलेल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी भाजपा करीत असते. तोच प्रकार 5 ऑगस्ट या तारखेबाबत झालेला आहे. ही तारीख अयोध्येमधील राम मंदिराच्या भूमिपुजनासाठी निश्चित करण्यात आली आहे.  राम मंदिर भूमिपुजनासाठी 3 ऑगस्ट आणि 5 ऑगस्ट या दोन तारखेबाबत प्रधानमंत्र्याला विचारण्यात आले होते. प्रधानमंत्र्याने यासाठी 5 ऑगस्ट ही तारीख निश्चित केली. प्रधानमंत्री हे संघाचे स्वयंसेवक असल्याने संघाने दिलेल्या अजेंडयानुसार ते अनेक कार्यक्रम राबवित असतात. त्यापैकीच एक अजेंडा म्हणून राम मंदिराच्या भूमिपुजनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. टी.व्ही मेडीयामधून या तारखेचामोठा गवगवा करण्यात येत आहे.

5 ऑगस्टला शनिवार दिवस येत आहे. शनिवार हा आजपर्यंत संघ, भाजपा आणि तत्सम संघटनासाठी अशुभ दिवस मानल्या जातो. मग असा अशुभ दिवस राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी का निवडण्यात आला. याच्या पाठीमागे काय कारण असावे. याबाबत संघ आणि भाजपा स्पष्ट करत नाही.
  संघाने या देशामध्ये नेहमीच षडयंत्राचा वापर केला आहे. त्याचाच प्रकार म्हणजे तारखेच समिकरण आहे. की जे सर्वसामान्यांच्या लक्षात येत नाही. आपल्या विषारी कृत्यातून भूतकाळ आपले लोक विसरणार नाही याची पुरेपूर काळजी संघ घेत असतो.

5 ऑगस्ट 2019 कलम 370 निष्प्रभ:

     अनेक लोकांच मत आहे की, 5 ऑगस्ट 2019 मध्ये भाजपाने संविधानातील 370 वे कलम हटवले त्याचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी 5 ऑगस्ट ही तारीख राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी निश्चित करण्यात आली. कलम 370 हटवणे हा संघाच्या अजेंडयाचा भाग होता आणि त्यांनी तो पूर्ण केला म्हणून त्याचा विजय उत्सव साजरा करण्यासाठी 5 ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली. हे सुध्दा त्यापाठीमागे एक कारण असू शकते. पंरतु संघ या कामासाठी राम मंदिरासी साहचर्य प्रस्तापित करणार नाही. त्यासाठी इतिहासातील काही गोष्टींचा संदर्भ घ्यावा लागेल. इतिहासातील संदर्भ बघितल्यास सघांच षडयंत्र समजण्यास मदत होते. काय होता 5 ऑगस्ट चा इतिहास ते एकदा समजून घेवू.

5 ऑगस्ट 1948 चा इतिहास:

     30 जानेवारी 1948 रोजी भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधींची नथुराम गोडसेने हत्त्या केली. त्यानंतर म. गांधीच्या हत्तेमध्ये आर.एस.एस. चा हात असू शकतो यातून महादेव सदासिव गोळवळकर यांच्यासह 20,000 संघाच्या कार्यकर्त्यांना 4 फेब्रुवारीला अटक करण्यात आली. हिंसा भडकवल्या प्रकरणी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी संघावर बदी आणली. पण प्रश्न यामुळे सुटला नाही. नथूराम गोडसेने सांगितले की तो आर.एस.एस. या संघटनेचा सदस्य नाही. त्यामुळे अनेकांना वाटले होते की संघावरील बंदी सरकार उठवेल. मात्र नथुराम गोडसेचा भाउ गोपाल गोडसेने सांगितले की नथुरामने गांधी हत्त्या केली त्यावेळी तो संघाचा सदस्य होता. असे म्हटल्यानंतर परत संघावरील बंदी अजून कडक करण्यात आली. गांधी हत्तेमध्ये गोळवळकरचा हात असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नसल्याने 5 ऑगस्ट 1948 रोजी गोळवळकरांची 6 महिण्यानंतर सुटका झाली होती. त्यानंतर आर.एस.एस. वरील बंदी हटवावी म्हणून गोळवळकरने अनेक वेळा गृहमंत्री सरदार पटेल यांना पत्र लिहिले. तेंव्हा सरदार पटेलांनी गोळवळकरांना अट टाकली की, आर.एस.एस. वरील बंदी हटवण्यासाठी एक Undertaking लिहून दयावे लागेल. त्यानुसार गोळवळकरने सरदार पटेलांना Undertaking लिहून दिले त्यामध्ये वचन देण्यात आले होते की भारतीय संविधानाप्रती प्रामाणिक राहू आणि भारतीय ध्वजाचा सन्मान करू. असे प्रतिज्ञापत्र लिहून दिल्यानंतर 11 जुलै 1949 ला आर.एस.एस वरील बंदी हटवण्यात आली होती.

 कोण आहे एम.एस. गोळवळकर:

     गोळवळकरांना पुरोगामी लोक एक व्हिलन म्हणून मानतात. धर्मनिरपेक्ष देशाला हिंदूराष्ट्र बनवण्यासाठी गोळवळकरांनी आपल्या भाषणातून आणि लेखातून विषारी मते मांडली. अशा या एम.एस. गोळवळकरांचा जन्म महाराष्टाच्या नागपुर जिल्हयातील रामटेक येथे 19 फेब्रुवारी 1906 रोजी झाला.  ते आर.एस.एस. चे द्वितीय सरसंघचालक म्हणून ओळखले जातात. संघामध्ये त्यांना गुरूजी म्हणून ओळखले जाते. आर.एस.एस ची स्थापना 1925 मध्ये डॉ. केशव बळीराम हेडगेवारने केली होती. मात्र आर.एस.एस वर अध्यक्षा ऐवजी माधव गोळवळकरांचाच जास्त प्रभाव दिसून येतो. संघामध्ये हेडगेवारांना डॉक्टर तर गोळवळकरांना गुरूजी म्हणून ओळखल्या जाते. 1940 मध्ये हेडगेवारांचा मृत्यु झाला त्यानंतर सरसंघचालक म्हणून गोळवळकरांची निवड झाली आणि 1973 पर्यंत गोळवळकरने संघाचे कार्य संपूर्ण देशामध्ये पोचवले. गोळवळकर आणि आर.एस.एस. ने देशाच्या स्वातंत्र्य लढयामध्ये कधिही सहभाग नोंदविला नाही. त्याचप्रमाणे त्यांचा भारतीय संविधानाला विरोध असून त्यांना भारतीय संविधान बदलून मनुस्मृति लागू करायची आहे. गोळवळकरांची भाषणे आणि लेखांचा समावेश असलेले बंच ऑफ थॉट्स हे आर.एस.एस ची भगवद गीता आहे. यामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट यांचा जन्म या देशातील नसल्याने त्यांना या देशात रहायचे असेल तर त्यांना हिंदूइझम स्विकारावा लागेल. त्याचप्रमाणे मुस्लिम, ख्रिश्चन आणि कम्युनिष्ट हे देशासाठी घातक आहेत असे गोळवळकरांनी बंच ऑफ थॉट्समध्ये म्हटले आहे. संघ आणि भाजपा हे गोळवळकरांना आजही मुख्यस्थानी मानत असल्याने त्यांच्या विचारावर आधारित हिंदूराष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गोळवळकरांची महात्मा गांधीच्या खुणातून सुटका झाल्याचा दिवस 5 ऑगस्ट 1948 होता. त्यामुळे हा दिवस भाजपा संघ हे विजय दिवस म्हणून साजरा करू इच्छितात त्याचाच परिणाम म्हणून राम मंदिर भूमिपुजनासाठी हा दिवस निश्चित केला आहे.

बाबरी मस्जित विध्वंस 6 डीसेंबर 1992:

     संघाने अनेक वेळा जाणीवपूर्वक हया देशातील अनेक प्रकरणे हे ज्वलंत ठेवण्यासाठी तारखांचे समिकरण आखलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून 6 डीसेंबर 1992 ला बाबरी मस्जिद कारसेवकांमार्फत उध्वस्त करण्यात आली. यासाठी सुध्दा संघाने 6 डीसेंबर ही तारखी निश्चित केल्याचे दिसते. डॉ. आंबेडकरांचे महापरिणीर्वान 6 डीसेंबर 1956 ला झाले. देशातील समस्त बहुजनांची फारमोठी हानी झाली होती. ते दु:ख सहन करणेही बहुजनांसाठी अशक्य होते. डॉ. आंबेडकरांच्या जाण्याने देशातील अनेक संघटनांना आनंद झाला होता. कारण डॉ. आंबेडकर हयात असतांना त्यांच्यापुढे उभे राहण्याची कोणाचीही टाप नव्हती. तसेच संविधानाला हात लावण्याची कोणाची हिंम्मत नव्हती. बाबासाहेबांच्या मृत्युने त्यांच्या समोरील अडचण दुर झाली होती.  त्यामुळे 6 डीसेंबर हा दिवस संघ आणि तत्सम संघटनासाठी आनंदाचा होता. त्याचा विजय उत्सव साजरा करावा म्हणून तर 6 डीसेंबर 1992 मध्ये बाबरी मस्जित पाडली असावी असे अनेक आरोप त्यांच्यावर होतात.

देशातील अनेक सण, परंपरा यामागील षडयंत्र:

     देशामध्ये अनेक सण, उत्सव, परंपरा साजऱ्या केल्या जातात. परंतु अनेक सण आणि उत्सवामागील कारण म्हणजे ज्या ज्या वेळी बहुजनांवर दु:ख ओढवले, त्यांच्यावर अन्याय झाला. त्याचा विजय उत्सव संघ आणि तत्सम संघटनांनी सण, उत्सवाच्या माध्यमातून साजरा केल्याचे दिसते. उदा. दिवाळीच्या दिवसी पुश्यमित्रशुंगाने अनेक भिक्कुंची कत्तल केली होती. त्याचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी दिवाळी सारखा सण निर्माण करण्यात आला आणि विजय उत्सव म्हणून साजरा करण्यात आला. आज जवळपास सर्वच जण दिवाळी सण साजरा करतात मात्र त्यामागील षडयंत्र अनेकांना माहित नसते. मात्र या देशातील संघ तत्सम संघटना जाणीवपूर्वक तारखा, सण, उत्सव याबाबत सर्वसामान्यांमध्ये भ्रम निर्माण करीत असतात. त्याचाच हा प्रकार आहे.    

Post a Comment

0 Comments