Anand Teltumbade & UAPA Act 2019 आनंद तेलतुंबडे आणि बेकायदेशीर प्रतिबंध हालचाल कायदा 2019


Anand Teltumbade & UAPA Act 2019

आनंद तेलतुंबडे आणि बेकायदेशीर प्रतिबंध हालचाल कायदा 2019

    या देशामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे योगदान आहे. एकेकाळी याच देशामध्ये पशूपेक्षाही माणसाला अपवित्र मानले जात होते. त्यांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता, पानवठयावरून पाणी भरू दिल्या जात नव्हते. नाव्ही केस कापत नव्हता. पडीत जमीन कसू दिल्या जात नव्हती, सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मज्जाव केल्या जात असे. त्याच समाजामध्ये जन्म घेतलेल्या बाबासाहेबांनी या देशातील समस्त विषमतावादी व्यवस्था बदलून टाकली. हजारो वर्षाच्या बेडया एका दणक्यात तोडून टाकल्या आणि या देशाला लोकशाही बहाल केली. रक्ताचा एकही थेंब सांडवता व्यक्तीच्या जीवनात अमुलाग्र परिवर्तन घडवून आणणाऱ्या लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली.

     डॉ. आंबेडकरांच्या पश्चात देशातील परिवर्तनाची चळवळ त्यांच्या लोकांनी सुरूच ठेवली. ही चळवळ चालवत असतांना शोषितांच्या बाजूने उभे राहणे, नागरी हक्कांचे संरक्षण करणे, भारतीय संविधानाचे संरक्षण, प्रचार आणि प्रसार करणे हयासारखी कामे कार्यकर्ते करीत असतात. मात्र सत्तेत बसलेल्यांना या कार्यकर्त्यांचे काम म्हणजे त्यांनी दिलेले आव्हान वाटायला लागते आणि ते आंबेडकरी कार्यकर्त्यांचा बदला घ्यायला लागतात. असाच प्रकार घडला तो प्रा. आंनद तेलतुंबडे सोबत. 31 डीसेंबर 2017 ला पुण्यातील शनिवार वाडयामध्ये एल्गार परिषद भरली होती. वास्तविक या परिषदेसी त्यांचा कोणताही संबंध नव्हता. कारण त्या परिषदेमध्ये ते सहभागी झालेले नव्हते. त्यानंतर 1 जानेवारी 2018 ला कोरेगाव भिमा येथे शौर्यदिन साजरा करायला गेलेल्या भिमसैनिकांवर दगडफेक झाली आणि हिंसाचार उसळला. या प्रकरणातील खरे आरोपी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे मोकाट फिरत आहेत. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई होता.

या प्रकरणासी दुरयान्वये संबंध नसलेल्या प्रा.आनंद तेलतुंबडेंचा नक्षली चळवळीसी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी त्यांना अटक करून कारवाई केल्याने आंनद तेलतुंबडे चर्चेत आले. आनंद तेलतुंबडे सध्या जेलमध्ये असून त्यांच्यावर UAPA म्हणजे बेकायदेशीर प्रतिंबंध हालचाल कायदा 2019 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात येवून त्यांना अटक करण्यात आलेली आहे.

  कोण आहे आनंद तेलतुंबडे:

      प्रा. आनंद तेलतुंबडे हे एक लेखक, प्राध्यापक मानवी हक्कांच्या सरंक्षणासाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत. आपल्या लिखानाच्या माध्यमातून त्यांनी सामान्यांचे प्रश्न वेळोवेळी मांडलेले आहेत. राईट टु एज्युकेशन हा कायदा लागू करण्याचा आग्रह धरल्याने शेवटी सरकारला तो कायदा लागू करावा लागला. या कायदयामुळे शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही म्हणून त्यांनी अथक परिश्रम घेतलेले आहेत.

      त्यांचा जन्म यवतमाळ जिल्हयातील वणी तालुक्यातील राजूर या गावी झाला. लहानपणीच बाबासाहेबांच्या विचाराने भारून गेलेल्या आनंदला शाळेतील भेदभाव सहन होत नसे. शाळेमध्ये संघाच्या शाखेतील काही मुल डोक्यात काळी टोपी घालून येत तेंव्हा आनंदने आपल्या सर्व मित्रांना निळया टोप्या वाटल्या शाळेत घालून गेल्याचा किस्सा आहे. त्यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण हे विश्वेश्वरैया नॅशनल इंस्टिटयुट ऑफ टेक्नोेलाजी, नागपूर येथे झाले. त्यांनतर त्यांनी काही काळ नोकरी केली आणि अहमदाबाद येथील IIM ला प्रवेश घेतला. तीथे त्यांनी अनेक विषयावर संशोधन केले. नंतर कार्पोरेट क्षेत्रामध्ये नोकरी केली. आता ते गोवा इंस्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट मध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.

     त्यांचा विवाह हा रमाबाई आंबेडकर यांच्याशी झालेला आहे. रमाबाई हया यशवंत आंबेडकरांची कन्या असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नात आहे. ॲङ प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर हे त्यांचे मेव्हणे आहेत. त्यांना दोन मुली असून त्यांची नावे प्राची आणि रश्मी अशी आहेत. त्यांचा भाउ मिलिंद तेलतुंबडे हा प्रतिबंध केलेल्या माओवादी भारतीय कम्युनिष्ट पार्टीचा वरिष्ट सदस्य आहे. डॉ. आंबेडकरांच्या कुटूंबासी संबंध असल्याने आंबेडकरी चळवळीतील लोकांच्या आस्तेचा विषय आहे.

 आनंद तेलतुंबडेवर आरोप:

     आनंद तेलतुंबडे हे आंबेडकरवादी विचारवंत आहेत. ते आपल्या व्याख्यानातून, पुस्तकातून शोषित समाजाच्या व्यथा मांडत असतात. मात्र आनंद तेलतुंबडेचा प्रतिबंधित भारतीय कम्युनिष्ट पार्टी (माओवादी) यांच्या सोबत संबंध आहे. असे तपासणी अधिकाऱ्याने न्यायालयाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्याच बरोबर पुरावा म्हणून एक पत्र न्यायालयासमोर ठेवण्यात आले आहे. त्या पत्रात पुढील बाबी सांगण्यात आल्या आहेत.

प्रकाश कडून आंनदला पत्र:

     प्रकाश नावाच्या व्यक्तीने आनंद नावाच्या व्यक्तीला 6 एप्रिल 2018 ला पत्र लिहिले ज्यामध्ये 9 10 एप्रिल 2018 रोजी पॅरिसमध्ये होणाऱ्या महिला परिषदेला हजर राहण्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर आग पेटती ठेवण्याचे बोलले आहे.

दिनांक 8 जून 2017 कॉम्रेड  सुरेंद्रच्या वतीने कॉम्रेंड एम ला पत्र:

     या पत्रामध्ये ऑक्टोबर महिण्यात आयोजित एजीएम मिटींग बाबत स्पष्ट करण्यात आले आहे. नक्षलबाडी आंदोलनाला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासंदर्भात कॉम्रेड आनंदने सूचना दिली आहे.

एस. जी. च्या वतीने सुदर्शनला पत्र:

    एस. जी. हे सुरेंद्र गडलिंगला उद्देशून म्हटले आहे. या प्रकरणात सुरेंद्र गडलिंग हा सहआरोपी आहे. या पत्रात सुरक्षा यंत्रणा हया शत्रू असल्याचे म्हटले आहे. या पत्रामध्ये आनंद नावाच्या व्यक्तीचा संबंध आहे. जो विद्यार्थ्यांसी संबंधित आहे. अभ्यासवर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीविषयी तिरस्कार निर्माण करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

     तपासणी अधिकाऱ्याने न्यायालयाला पुरवलेल्या पत्रामध्ये अशाप्रकारचे आरोप करण्य्यात आले आहे. पण आनंद म्हणजे नेमका कोण आनंद तेलतुंबडे की दुसरा आनंद याचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे तथाकथीत पत्रांच्या सहाय्याने आनंद तेलतुंबडे माओवादी चळवळीसी संबंधीत असल्याचे म्हटले आहे.

  बेकायदेशीर प्रतिबंध हालचाली कायदा 2019 (UAPA):

       बेकायदेशीर प्रतिंबंध हालचाल कायदा 1967 मध्ये करण्यात आला. त्यालाच UAPA (Unlawful Activities Prevention Act) असे म्हटल्या जाते. 2019 मध्ये त्या कायदयात दुरूस्ती करण्यात आली. या कायदयाचा वापर देशाच्या सार्वभौमत्व अखंडतेला धोका निर्माण करणाऱ्या हालचालीवर प्रतिबंध निर्माण करण्यासाठी करण्यात आला. या कायदयानुसार कोणी आतंकवादी कृत्य करत असेल किंवा आंतकवादी कृत्याला सहाय्य करत असेल तर संशयावरून अशा व्यक्तीला आंतकवादी घोषीत करण्याचा अधिकार केंद्रसरकारला आहे त्यासाठी पुराव्याची आवश्यकता नाही. त्याचबरोबर आतंकवादी व्यक्तीची संपत्ती जप्त करण्याचा अधिकार हा NIA च्या महानिर्देशकाला मिळाला आहे. NIA या कायदयानुसार कोणत्याही राज्यात जावून बेकायदेशीर हालचाल करणाऱ्या व्यक्तीला पकडू शकते, त्याच्या घरावर रेड टाकू शकते. त्यासाठी NIA ला राज्याच्या पोलिसांची परवानगी घेण्याची गरज नाही.

  UAPA कायदयाबाबत विरोधकांनी व्यक्त केलेली चिंता:

       या कायदयाद्वारे कोणत्याही संघटनेला किंवा संघटनेच्यासदस्याला आतंकवादी ठरवता येवू शकते. या कायदयामुळे भारतीय संविधानातील कलम 19 मध्ये देण्यात आलेल्या मुलभूत स्वातंत्र्यावर निर्बंध आलेली आहे. सरकारच्या विरोधात लिहिणारे लेखक, साहितीक, सामाजिक कार्यकर्ते, विरोधक यांच्या विरोधात या कायदयाचा दुरूपयोग केला जावू शकतो. या कायदयाचा अल्पसंख्यांकाच्या विरोधात गैरवापर केला जाईल. यामुळे विरोधकांनी हया कायदयाला विरोध दर्शविला आहे. या कायदयामुळे सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या, आंदोलन करणाऱ्या लोकांची गळचेपी होईल आणि लोकशाही जिवंत राहणार नाही. असे अनेक तज्ज्ञांना वाटते.

       या कायदयामुळे मानवाधिकार कार्यकर्ते आंनद तेलतुंबडे, गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, वरवरा राव, अरूण फरेरा, वरनन गोंनसाल्विस यांना न्यायालयाने जामिन नाकारला आहे. वरील सर्व कार्यकर्ते हे 75 वर्षाच्या वरचे असुनही केवळ संशयावरून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले आहे. त्यातील काहीजणांना कोरोणाची लागण झाली आहे. आनंद तेलतुंबडेचे वय आज 80 वर्षाचे आहे. त्यांच्या केस संदर्भात न्यायालयाचा निकाल कधी येईल सांगता येत नाही. प्रकरण हे न्यायप्रविष्ट असल्याने त्याची वाट बघण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. लोकशाहीला बळकट करण्यासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायावर आधारीत राज्य प्रस्तापित करणे गरजेचे आहे. याअगोदर लोकशाहीला मारक ठरणारे कायदे रद्द करण्यात आले आहेत. UAPA सारखे कायदे देशातील लोकाच्या स्वातंत्र्याची गळचेपी करीत असेल तर असे कायदे रद्द करणे किंवा त्यामध्ये बदल करणे आवश्यक आहे. विनाकारण या कायदयाचा दुरूपयोग होत असेल तर आपण नक्कीच हुकूमशाहीकडे मार्गक्रमण तर करीत नाहीना असे सुज्ञ व्यक्तीला वाटल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी समविचारी चळवळीच्या लोकांनी एकत्र येवून असे जुलमी कायदे रद्द करणे किंवा त्यामध्ये बदल करण्यास भाग पाडायला हवे.

Post a Comment

0 Comments