Assault on Rajgruha राजगृहावर हल्ला


Assault on Rajgruha राजगृहावर हल्ला

      भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील निवासस्थान असलेल्या राजगृहावर अज्ञात इसमांनी हल्ला करून खिडक्यांची काचे तोडली, कुडयांची तोडफोड केली. त्याचबरोबर CCTV कॅमेऱ्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळतात पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आबेंडकर कुटूंबियांनी CCTV चे सर्व फुटेज पोलिसांना दिले असून महाराष्ट्र शासनाने याची ताबडतोब दखल घेवून CCTV फुटेजच्या आधारे संबंधित व्यक्तींना तत्काळ अटक करावी तसेच त्यांचा बोलविता धनी कोण आहे यांचाही शोध घ्यावा. ही बातमी काल रात्री (Date: 07/07/2020) कळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड खळबळ उडाली आणि

बाबासाहेबावर प्रेम करणाऱ्या तमाम जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. याअगोदर अशा अनेक घटणा घडल्या आहेत. विनाकारण समाजामध्ये तेढ निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम काही तथाकथीत शक्ती करीत असतात. वेळोवेळी अशा अमानवी प्रवृत्तींना आंबेडकरी जनतेने चोपून काढले आहे. राजगृहावर भ्याड हल्ला करणाऱ्या नामर्द प्रवृत्तींना येत्या काळात आंबेडकरी जनता ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही.

  राजगृहाचा इतिहास:

     'राजगृह' हे मुंबईतील दादर एरियामधिल हिंदू कॉलनीच्या परीसरात असून ते जगामध्ये बाबासाहेबांचे निवासस्थान म्हणून परिचित आहे. ही एक पवित्र ऐतिहासिक वास्तू तीन मजल्याची असून संपूर्ण देशातील आंबेडकरी जनतेचे एक प्रमुख श्रध्दास्थान प्रेरणास्थान आहे. बाबासाहेबांनी वयाची 15 ते 20 वर्षे राजगृह या निवासस्थानी घालवले. त्यांमुळे आंबेडकरी अनुयायी डॉ. आंबेडकर जयंती महापरिनिर्वाण दिनी येथे श्रध्दांजली वाहण्यासाठी येत असतात. शिवाजीपार्कवर चैत्यभूमी होण्यापूर्वी 6 डीसेंबरला लाखो अनुयायी हे राजगृहाचे दर्शन घेण्यासाठी येत असत. राजगृहाला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची योजना होती मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे ते शक्य झाले नाही. राजगृहामध्ये बाबासाहेबांनी 50,000 पेक्षा जास्त दुर्मिळ ग्रंथाचा संग्रह केला होता. हे जगातील सर्वात मोठे वैयक्तिक ग्रंथालय आहे. 2013 मध्ये राजगृहाचा समावेश हेरिटेज म्हणून करण्यात आला.

     1930 मध्ये मुंबईमधील पोयबावाडी परिसरात बाबासाहेब जेंव्हा राहत होते. ते घर अतिशय छोटे असल्याने पुस्तके ठेवण्यासाठी व्यवस्था होत नव्हती. म्हणून त्यांनी पुस्तकांसाठी घर बांधण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये दोन प्लॉट खरेदी केले होते. सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेवून या ईमारतीचे बांधकाम पूर्ण केले. 1931 ते 1933 या दोन वर्षात बांधकाम पूर्ण झाले. दोन प्लॉटवरील बांधकामापैकी प्लॉट क्र. 99 वरील 'चार मिनार' नावाची इमारत त्यांनी ग्रंथ खरेदी कर्जाची फेड करण्यासाठी 9 मे 1941 रोजी विकली. उरलेला दुसरा प्लॉट क्र. 129 वरील 55 चौ. यार्ड या प्लॉटवर बांधलेले राजगृह त्यांनी पुस्तकांसाठी ठेवले तीथेच ते कुटूंबियांसह राहत असत.

     पुस्तकांसाठी घर बांधणारे बाबासाहेब हे जगातील एकमेव महापुरूष असतील. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये पुस्तकांवर जीवापाड प्रेम केले. राजगृहामध्ये राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, कायदा, मानववंशशास्त्र, साहित्य, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान, कुराण, बायबल, विज्ञान, उद्यानशास्त्र त्याच बरोबर बायबलचा नवा आणि जुना करार, संत कबीर, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम यांच्या गाथा. अशी अनेक दुर्मिळ ग्रंथ आणि पुस्तके ú उपलब्ध आहेत. यावरून आपल्याला बाबासाहेबांच्या वाचनाचा व्यासंग आणि विदवत्तेची कल्पना येईल. ü 1950 मध्ये मिलिंद महाविद्यालयाचे बांधकाम सुरू होते. तेंव्हा बाबासाहेब दिल्ली, मुंबईवरून औरंगाबादला येतांना सोबत अनेक दुर्मिळ ग्रंथ आणत असत. बाबासाहेबांनी मिलिंद महाविद्यालयाच्या ग्रंथालयासाठी 1100 पुस्तके दिली होती. ती आजही मिलिंदच्या ग्रंथालयात लोकांना पाहण्यासाठी वाचनासाठी उपलब्ध आहेत.

     पुस्तकांचे साम्राज्य राजगृहाच्या निमित्ताने निर्माण करून जणूकाही बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना एक संदेश दिला आहे की, माझ्या लोकांनी उच्च शिक्षण घ्याव, पुस्तके वाचावी आणि ज्ञानाचा संग्रह करून आपल्या लोकांच्या कल्याणासाठी त्याचा वापर करावा. बाबाहेबांनी निर्माण केलेल्या क्रांतीच्या केंद्रापैकी राजगृह हे क्रांतीचे केंद्रस्तान आहे. राजगृहामध्ये बाबासाहेब 15 ते 20 वर्षे वास्तव्यास होते याच काळामध्ये भारत देशाचे भवितव्य कसे असेल याचे स्वप्न या महामानवाने इथे पाहिले. जातीयता, अस्पृश्यता नष्ट करणारे लिखान येथूनच लिहिल्या गेले. भारतीय संविधानाचे प्रारूप याच वास्तुत लिहिल्या गेले. माणवमुक्तीसाठी ज्या ज्या चळवळी, संघर्ष केले गेले त्याचे प्रारूप इथेच तयार झाले होते. हिंदूधर्मातील विषमतेला कंटाळून शेवटी बौध्द धम्म स्विकार करण्याचा विचार आणि त्यासाठी बुध्द आणि त्यांचा धम्म हया ग्रंथाची निर्मिती याच वास्तुमध्ये झाली. त्यामुळे राजगृह हे आंबेडकरी जनतेला आपल्या प्राणाहून प्रिय आहे.  आणि प्रत्येक जण त्याला आपली प्रेरणा मानतो. त्यामुळे प्रस्तापितांच्या डोक्यात ती उध्वस्त करण्यासाठी वळवळ सुरू असते. या अगोदर प्रस्तापितांनी अनेक वास्तुंना लक्ष केले आहे त्यापैकी भारतीय संविधान, कोरेगाव भिमा विजयस्तंभ, दिक्षाभूमि नागपूर आणि आता राजगृह इ. कटाचा एक भाग म्हणून त्यांनी राजगृहावर दगडफेक केली आणि नासधूस करण्याचा प्रयत्न केला.

     मात्र आंबेडकरी जनता हे खपवून घेणार नाही. अज्ञात अरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आणि गृहमंत्र्यांनी गुन्हेगारांवर कडक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. पोलिसांनी आंबेडकरी जनतेचा उद्रेक होण्याअगोदर या गुन्हेगारांना तत्काळ अटक करावी. अन्यथा कोरोणा काळामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही

Post a Comment

1 Comments