गरीबांना वैक्सीन मिळेल का? ऑक्सफोर्ड युनिव्हर्रसिटीमध्ये कोरोना वैक्सीनला यश

गरीबांना वैक्सीन मिळेल का?

ऑक्सफोर्ड युनिव्हर्रसिटीमध्ये कोरोना वैक्सीनला यश

     कोरोना व्हायरसने जगात कहर केला आहे. अनेक लोकांना लागण होत आहे. याच्याही पलिकडे जावून आता भारतामध्ये कम्युनिटी टॉसंमिशनला सुरूवात झाली आहे. त्यामुळे धोका वाढला आहे. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर ही मोठी शहरे आहेत. इथली संख्या प्रचंड आहे. या शहरामध्ये उद्योगधंदयाचे प्रमाण जास्त असल्याने संपूर्ण देशातून लोक नोकरी, कामधंदयासाठी या शहरात येत असतात. त्यामुळे लोकसंख्येचे प्रचंड बर्डन या शहरावर पडलेले आहे. कोरोनामुळे अनेक उद्योगधंदे बंद झाले त्यामुळे लोक आपल्या गावाकडे निघून गेले.

तरीही या शहरांची लोकसंख्या अजून कमी झालेली नाही. त्यामुळे कोरोनाचे मोठया प्रमात संक्रमण होत आहे. कोरोना रूग्णांना दवाखाण्यामध्ये बेड मिळणे मुस्किल झाले आहे. ऐवढे रोजचे प्रमाण वाढत आहे. यावर नियंत्रण करतांना सरकारची दमछाक होत आहे. मात्र कोरोनाचे संकट अटोक्यात येणे सध्या तरी अशक्य आहे. जर कोरोनावर नियंत्रण प्रस्तापित करायचे असेल तर कोरोनाची लस उपलब्ध होणे गरजेचे आहे. प्रभावी औषध निर्माण होणे आवश्यक आहे.

     ऑक्सफोर्ड विद्यापीठाला कोरोना लसीच्या शोधामध्ये यश आल्याचे कळाले. ही लस फेज 3 च्या अतिंम टप्प्यात आहे ती मानवी ट्रायलमध्ये यशस्वी झाली असून 1077 लोकांवर या लसीचा प्रयोग करण्यात आला होता. त्यानंतर ज्या व्यक्तींना लस टोचली होती त्यांचे परिक्षण करण्यात आले. परिक्षणांती कळाले की त्यांच्या शरीरामध्ये एंटीबॉडी निर्माण झाल्या. एंटीबॉडी आणि पांढऱ्या पेशी एकत्र येवून कोरोना व्हायरसला नष्ट करतात असे परिक्षणातून दिसून आले. ही लस पुर्णपणे सुरक्षित आणि प्रतिकारक्षम असल्याचे इंग्लंडमधील मेडीकल जर्नल लाँन्सेट च्या संपादकाने म्हटले आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या लसीकडे लागले आहे. प्रत्येक देशाला वाटते ही लस आपल्याला लवकर मिळावी जेणेकरून कोरोना संकट लवकर थांबवता येईल.

    ज्या व्यक्तींवर या लसीचा वापर करण्यात आला होता. त्यांच्यामध्ये सकारात्मक रिझल्ट आल्याचा दावा ऑक्सफोर्ड विद्यापीठाने केला आहे. ही लस टोचल्यानंतर शरीरामध्ये रोगप्रतिकारक क्षमता निर्माण होते. एंन्टीबॉडी आणि पांढऱ्या पेशी मिळून कोरोना विषाणूवर हल्ला करून ठार मारतात असेही सांगण्यात येत आहे. मात्र हे पण समजून घेणे गरजेचे आहे की ही लस मानवासाठी किती सुरक्षित आहे. आणि त्याचा वाईट परिणाम तर होणार नाही ना यासाठी मोठया प्रमाणात त्याचे परिक्षण सुरू आहे. येत्या काही दिवसामध्ये आपल्याला त्यातील पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी कळतीलच.

     ऑक्सफोर्ड विद्यापीठाद्वारे तयार करण्यात आलेल्या लसीचे 10 कोटी डोस तयार करण्यासाठी विद्यापीठाने एस्ट्राजेनेको या कंपनी सोबत करार केला आहे. या लसीच्या संशोधनासाठी ब्रिटिश सरकारने ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि इंपेरिअल कॉलेज, लंडण यांना करोडो रूपयाची मदत केली आहे. सदर लस ही फेज 3 च्या शेवटच्या टप्प्यात असून ती लवकरात लवकर बाजारात येईल. मात्र इंग्लड सरकारने ही लस सर्वप्रथम इंग्लडमधील लोकांना देण्यात येईल त्यानंतर इतरांचा विचार केला जाईल असे म्हटले आहे. त्यामुळे भारतात ती केंव्हा येइल हे सांगता येत नाही. मात्र भारतातील सिरम इस्टिटयुट त्या संशोधनात असल्याने भारतालाही लवकर लस उपलब्ध होईल असा अंदाज करायला काही हरकत नाही. मात्र कोरोना व्हायरस विरूध्द लस शोधनाऱ्या इतर भारतीय कंपन्या पहिला टप्पाच पार करू शकल्या नाहीत. त्यामुळे सरकारमधील अनेकांनी 15 ऑगस्ट पर्यंत लस उपलब्ध होईल असे जे भाकित केले होते. ते स्वप्नच राहील असे वाटते.

भारताची चिंता वाढली:

     ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेली वैक्सीन भारताला मिळेल का नाही. कारण भारताची लोकसख्या 131 कोटी असून ऐवढया मोठया लोकसंख्येला कोरोना आजारापासून वाचवण्यासाठी लस उपलब्ध होणे आवश्यक आहे. भारतामध्ये आता कम्युनिटी ट्रांन्समिशन सुरू झालेले आहे. त्यामुळे दररोज हजारो लोकांना कोरोनाची लागण होत आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने शोधलेली वैक्सीन भारतासाठी आशेचा किरण आहे. मात्र ती लस इतर देशाबरोबर भारतालाही मिळावी असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. कारण वैक्सीन मिळण्यास उशिर झाला तर भारताला खुप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे.

     वैज्ञानिक औद्योगिक संशोधन परिषदेचे महानिर्देशक डॉक्टर शेखर सी. मांडे म्हणाले की, चिंता स्वाभाविक आहे. मात्र भारतासाठी ही चिंता मोठी नाही. ऑक्सफोर्ड विद्यापीठासोबत भारतातील सिरम इस्टिटयुटने अगोदरच करार केला आहे. त्यामुळे भारताला वैक्सीन मिळण्यात अडचण येणार नाही. त्याचबरोबर अमेरिकेतील मोडेरना वैक्सीनसाठी भारतातील अनेक कंपन्या लवकरच करार करू शकतात. कोणतीही वैक्सीन करोनावर कारगीर ठरल्यास त्याचे करोडो डोस भारतासाठी आवश्यक आहे. मात्र संपूर्ण जगातून मोठया प्रमाणात मागणी वाढल्यास वैक्सीनची कमतरता येवू शकते. मात्र भारतामधील सिरम इंस्टिटयुटची भागीदारी असल्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. भारताला मुबलक वैक्सीन मिळेल असे डॉ. शेखरने स्पष्ट केले.

 गरीबांना वैक्सीन मिळेल का?

     भारतामध्ये कोरोनाच्या काळामध्ये नफाखोरी आणि साठेबाजी करणाऱ्या अनेक महाभागांना पोलिसांनी नुकतेच पकडले आहे. त्यांनी कोरोनावर उपयोगी पडणाऱ्या डेक्सामेथासोन, रेमडेसिव्हीर यासारख्या औषधाचा साठा करून अनेक लोकांना ते औषध महागात विकले. सरकारी दवाखान्यात ही औषधे कोरोना रूग्णांना फुकट मिळतात. मात्र कोरोना महामारीच्या काळामध्येही नफाखोरी आणि साठेबाजी करणाऱ्यांची भारतात कमी नाही. त्यामळे ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेली लस देशातील सर्वच लोकांना मग तो गरीब असो की श्रीमंत सगळयांना मोफत मिळायला हवी. वैक्सीन भारतात आल्यानंतर सुरूवातीला श्रीमंत लोक ही लस मिळवण्यासाठी कोणत्याही स्तराला जावू शकतात. त्याचबरोबर अनेक जण या वैक्सीनची साठेबाजी करू शकतात. त्यामुळे गरीबांपर्यंत ही वैक्सीन पोहोचवणे सरकारसाठी आव्हानात्मक काम आहे. मात्र सरकारने याकडे लक्ष ठेवून त्याचा काळाबाजार, नफेखोरी आणि साठेबाजी होणार नाही यासाठी सक्षम यंत्रणा सोबत उभारायला हवी. आणि काळाबाजार, नफेखोरी करणाऱ्यावर कडक कारवाई करायला हवी.

    गरीब, श्रीमंत असा भेदभाव करता सर्वांना सरकारी यंत्रणेमार्फत ही वैक्सीन कसी मिळेल याचा विचार सरकारने करायला हवा. कोरोनाची सगळयात जास्त झळ ही गरीबांना बसली आहे. कोरोनामुळे त्यांचा रोजगार गेला, उपासमारीची पाळी आली, आणि अनेक जण कोरोनाबाधित झाले. त्याप्रमाणात श्रीमंतांना ही झळ बसली नाही. त्यामुळे वैक्सीन पुरवण्याबाबत भेदभाव होणार नाही याची काळजी सरकारला घ्यावी लागणार आहे. खरेतर भारतामध्ये हा आजार श्रीमंतांनी आणला. इथल्या सामान्यांचा यामध्ये कोणताही दोष नाही. विदेशातून लागण होवून भारतामध्ये आल्यानंतर कोरोनंटाईन होता, विलाज करता अनेक लोक इतरत्र फिरत होते आणित्याचाच परिणाम इथला सामान्यवर्ग विनाकारण भोगत आहे. या लोकांमुळे इथले सामान्य लोक कोरोनाच्या तावडीत सापडले. सगळयांना वाचवणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे कोणताही भेदभाव करता सर्वांना वैक्सीन मिळावे आणि कोव्हिड 19 अटोक्यात यावा म्हणजे झाले.

   अनेक व्यापाऱ्यांनी कोरोना महामारीचा प्रचंड फायदा घेतला. किराणा माल इतर जीवनावश्यक वस्तू चढया भावाने विकल्या त्यामुळे सामान्य वर्गाचे प्रचंड हाल झाले. या काळामध्ये एकतर काम बंद होते आणि पैसा शिल्लक नव्हता. परिणामी उसनवारी करून अनेकांनी आपला प्रपंच चालवला आहे. बाजारात कोणत्याही वस्तूचे भाव प्रंचड वाढलेले असल्याने जीवन जगणे अवघड झाले आहे. सरकारने केलेली मदत अपुरी आहे. पंधरा किलो तांदळावर किती दिवस काढायचे. कामधंदा नाही आणि लॉकडाउनमुळे काही करता येत नाही. त्यामुळे या महामारीतून लवकर सुटका व्हावी यासाठी सरकारने कोरोनाचा बिमोड करण्यासाठी वाटटेल ती किंमत मोजून वैक्शीन आणावे आणि ते सर्वांपर्यंत पोचवावे ही अपेक्षा।

Post a Comment

1 Comments