Covid19 Control Dharavi Model


Covid19 Control Dharavi Model

कोव्हिड 19 वर नियंत्रण मिळविणारे धारावी मॉडेल

     संपूर्ण जगामध्ये कोरोणाने थैमान घातला आहे. लाखो लोकांना कोरोणाची लागण झालेली आहे. आणि अनेकांना संपर्कात आल्यामुळे पटकन लागण होत आहे. भारतामध्ये आज कोरोणाचे 8,22,603 रूग्ण असून महाराष्ट्रामध्ये 2,46,600 रूग्ण आहेत. कोरोणा हा संपूर्ण विश्वासाठी मोठी डोके दु:खी ठरली आहे. अनेक देशातील वैद्यकशास्त्रातील संशोधक अहोरात्र काम करीत आहेत मात्र लसीच्या संशोधनाचे काम पूर्ण होण्यासाठी साधारणत: जुलै 2021 उजाडणार आहे.

जगातील ज्या ज्या देशामधील लसीबाबतचे संशोधन शेवटच्या टप्प्यात आहेत. त्यापैकी चीनची एक कंपनी Sinophorm ही फेज थ्री मध्ये असून त्या कंपनीने जुलै 2021 मध्ये लस बाजारात येईल असे म्हटले आहे. त्यामुळे भारतामध्ये 15 ऑगस्ट पर्यंतचा दावा भारतीय संशोधक राजकारण्यांनी केला तो कितपत खरा आहे हे येणारा काळ ठरवेल.

     भारतामध्ये या बिमारीने उग्ररूप धारण केलेले आहे. या बिमारीचा सगळयात जास्त फटका बसला तो महाराष्ट्राला कारण महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर अशी देशातील सर्वात मोठी लोकसंख्या असणारी शहरे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये या बिमारीवर नियंत्रण प्रस्तापित करतांना अवघड जात आहे.  त्यात मुबंईमधील धारावी झोपडपटटीमधील लोकसंख्या प्रचंड आणि कोणत्याही सोयी सुविधा नाही आणि लोक अतिशय दाटीवाटीने राहतात. त्यामुळे सगळयांनाच भिती होती की, जर धाराविमध्ये कोरोणाने प्रवेश केला तर तेथे सगळयात जास्त बळी जातील. धारावीमध्ये साधारणत: एप्रिलमध्ये कोरोणाचा पहिला रूग्ण सापडला आणि खळबळ माजली.

     आशियामधील सर्वात मोठी झोपडपटटी म्हणून धारावी प्रचलित आहे. याच धारावीमधील गरीबीच वास्तव पाहण्यासाठी देश विदेशातील अनेक लोक भेटी देतात. स्लॅमडॉग मिलेनियर हा चित्रपट धारावीवर निघाल्याने धारावी अधिकच फेमस झाली आणि आता तर दररोज विदेशातील लोक भेट देण्यासाठी यायचे मात्र कोरोणामुळे ते सर्व बंद  झाले. अशाया धारावीची लोकसंख्या 8 ते 10 लाख असून इथल्या एका एका घरात 7 ते 8 लोक राहतात. आणि सर्वात वाईट म्हणजे इथे घरामध्ये संडासबाथरूमची अजिबात सोय नाही. सार्वजनिक सौच्छालयाचा वापर करावा लागतो. त्यामुळे धारावीतील जवळपास 80% लोक हे सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात. सार्वजनिक शौचालयामध्ये धारावीतील कोरोणा रूग्णांची संख्या प्रचंड वाढू शकते असे अनेक तज्ज्ञांनी भाकित केले होते. त्यामुळे इथे मोठया प्रमाणात लोकांचा बळी जावू शकतो असे म्हटल्या जात होते. परंतु तसे काही झाले नाही. तीथल्या डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक, पोलिस, सफाई कर्मचारी यांनी धारावीमध्ये एक आदर्श मॉडल तयार केले. आणि त्यातुन अनेक लोकांचा जीव वाचला. आणि धारावी मॉडेल समोर आले. लाखो लोकांचे जीव वाचवणाऱ्या या मॉडलचे WHO ने सुध्दा स्तुती केली. WHO चे डायरेक्टर एडहानम गेब्रेयेसेस ने म्हटले की, महामारी कितीही घातक असली तरी त्यावर नियंत्रण प्रस्तापित करता येते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्पेन, इटली, दक्षिण कोरिया, आणि भारतातील धारावी. WHO च्या प्रमुखांनी पुढे म्हटले की फिजीकल डिस्टंसिग, टेस्टिंग, ट्रेसींग आणि संक्रमित रूग्णाचा त्वरीत विलाज करून इथल्या लोकांनी कोरोणावर विजय मिळविला.

धारावी मॉडेल नेमके आहे तरी कसे?

     या मॉडेलमध्ये चेस व्हायरस या थीमनुसार काम करण्यात आले. त्यामध्ये कॉन्टयाक ट्रेसिंग, फिवर कँम्प, लोकांना विलगीकीकरणात ठेवणे आणि टेस्ट करणे यावर जास्त भर देण्यात आलेला आहे. त्या एरियातील शाळा, महाविद्यालये यांचा कॉरंटाईन म्हणून वापर करण्यात आला. तीथे अनुभवी डॉक्टरर्स, नर्स आणि तीनवेळचे जेवण देण्यात आले. धारावीमध्ये मुस्लिम समुदाय मोठया संख्येने आहे. त्यामुळे मुस्लिम लोकांना कोरंटाईन सेंटरमधून नमाज पाडण्याची योग्य सोय करण्यात ली. याचा चांगला परिणाम झाला. त्यामध्ये 77% टक्के लोक बरे झाले. तर 23% लोक कोरोणा बाधीत असून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहे आणि लवकरच ते सर्वजण कोरोणावर मात करतील.

    कोरोणाचे संक्रमण रोकण्यासाठी बीएमसी आणि मेडिकलच्या टिमचे मोलाचे योगदान राहिले. धारावीला कोरोणापासून वाचवणे शक्य नव्हते. परंतु या आव्हानाला बीएमसीच्या 2450 लोकांनी पूर्ण क्षमतेने तोंड दिले त्यावर मात करून दाखाविली. यामध्ये सफाई कामगारांपासून ते पाणी पुरवठा करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांचा समावेश होता. 1250 लोकांची टिम कॉन्टयाकमध्ये जोडल्या गेली होती. यामध्ये अनेक डॉक्टर सहभागी झाले होते. धारावीमध्ये सार्वजनिक सौच्छालयाची समस्या भंयकर होती. त्यावर योग्य ते नियोजन करण्यात आले. 7 ते 8 लोकसंख्येसाठी केवळ 450 सौच्छालये होती त्यामुळे कोव्हिडचा प्रसार होणे स्वाभाविक होते. या सर्व सौच्छालयांना दिवसातून 5 ते 6 वेळा सैनिटाइज करण्यात आले. सौच्छालयाच्या बाहेर हॅन्डवॉश ठेवण्यात आले. त्यासाठी मोठया प्रमाणात हॅन्डवॉश लागत होत. अशावेळेस अनेक सामाजिक सस्था पुढे आल्या आणि त्यानी मोठया प्रमाणात सॅनिटाईझर, हँन्डवॉशसारख्या वस्तू पुरवल्या.

     मुंबईमधील धारावी मॉडेलने जगामध्ये एक उदाहरण प्रस्तुत केले. माणसाची इच्छाशक्ती आणि त्याच्या संघर्षापुढे महामारीलासूध्दा हतबल व्हावे लागले. आता धारावी मॉडेल नावारूपाला आले आहे. संपूर्ण देशामध्ये त्याचे कौतुक होवू लागले आहे. या मॉडलला देशातील अन्य भागामध्ये लागू करता येईल काय? होय निश्चित लागू करता येईल. देशातील ज्या ज्या शहरामध्ये कोरोणा रूग्णांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी याचा वापर करता येईल. धारावी मॉडेलमध्ये काम करणाऱ्या सर्व डॉक्टरर्स, नर्स, स्वच्छता कर्मचारी, पोलिस बीएमसीचे कर्मचारी यांनी अहोरात्र घेतलेली मेहनत आणि दिलेले योगदान कामाला आले. त्याचबरोबर धारावीतील लोकांनी दाखविलेला संयम हा सुध्दा वाखानण्याजोगा आहे. देण्यात आलेल्या सूचनांचे त्यांनी काटेकोरपणे पालन केले आणि आज धारावी मॉडेल कोरोणावर नियंत्रण मिळवण्यात कामयाब असणारे मॉडेल म्हणून नावारूपाला आले. आज धारावीतील 77% लोक या आजारातून बरे झाले आहेत. आणि 27% लोकांवर उपचार सुरू आहेत. म्हणजेच धारावीची खुप मोठी लोकसंख्या आज कोरोणामुक्त झाली आहे. या मॉडलचा वापर इतर शहरातील प्रशासकीय यंत्रणेने करावी हीच अपेक्षा।

Post a Comment

0 Comments