Discrimination in Education is distressful शिक्षणातील भेदभाव संतापजनक


Discrimination in Education is distressful

शिक्षणातील भेदभाव संतापजनक

     भेदभावाची मानसिकता अजूनही भारतीय समाजातून जायाला तयार नाही. कधी जातीयतेवरून, कधी धर्मावरून, तर कधी शिक्षणावरून भेदभाव सतत सुरू असतो. असाच एक संतापजनक प्रकार घडला तो पुण्यातील एका शाळेत.

नुकतेच एका शाळेने आपल्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले. मार्क्ससिटवर कोरोणा बॅच (Corona Batch) म्हणून छापण्यात आले. त्यामुळे अनेक लोकांनी या शाळेविषयी संताप व्यक्त केला आणि या शाळेवर त्वरीत कार्यवाही व्हावी म्हणून व्हाटस्‌ॲप च्या माध्यमातून मोहिम राबविली गेली. एस.सी.,एस.टी. साठी असा भेदभाव काही नवीन नाही मात्र आता सगळयाच मुलांच्या मार्क्ससिटवर कोरोणा बॅच 2020 असे प्रिंट केले असल्याने पालकांची पंचायत झाली.
    आणि मुलांना भविष्यामध्ये शिक्षणाच्या पात्रतेमध्ये अडचण येवू नये म्हणून सर्व स्तरातील पालकांनी आवाज उठवला. आज कोरोणाच्या काळात सर्वांना भेदभावाची झळ पोचली. तसी झळ हजारो वर्षापासून एस.सी., एस.टी. समाजाच्या लोकांना बसत आहे. मात्र इतर समाजातील लोकांनी सतत दुर्लक्ष केल्यामुळे व्यवस्थेमधील काही लोकांचे फावले आणि ते जाणीवपूर्वक अशा गोष्टी निर्माण करून समाजामध्ये असंतोष निर्माण करू लागले. आणि आजही त्यांचा उद्योग सतत सुरू असतो. रोहित वेमुल्लाचे प्रकरण आपण अजून विसरलेलो नाही. तोच आता कोरोणाच्या काळात शिक्षणामध्ये भेदभाव सुरू    झाला हे अतिशय वेदनिय आणि खेदजनक आहे.

  देशातील कोरोणाचे वाढते उग्ररूप:

     देशामध्ये कोरोणाचे प्रमाण दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. त्यामुळे पृथ्वीवरील समस्थ मानवाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. यातुन मार्ग काढण्यासाठी हजारो डॉक्टरर्स, नर्सेस, हेल्थवर्कर, पोलिस सतत झटत आहेत. हे काम करतांना अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. जीवाची पर्वा करता समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांनी स्वत: ला वाहून घेतले. आज भारतामध्ये 9,06,752 आणि महाराष्ट्रात 2,60,924 कोरोणाबाधित रूग्ण आहेत. दिवसेंदिवस त्याचे प्रमाण वाढत आहे. भारतामध्ये आता कम्युनिटी स्प्रेडला सुरूवात झाली आहे. जुलै पासून कोरोणा प्रकरण गडद होत चालले आहे. समाजातील एक घटक हा समस्त मानवतेच्या कल्याणासाठी लढत असतांना एक वर्ग असा आहे तो समाजामध्ये भेदभाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आणि त्याचेच उदाहरण म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांच्या मार्क्ससिटवर कोरोणा (Corona Batch)बॅचचे लेबल लावणे होय.

  विद्यार्थ्यांना लागण होण्याची भिती:

   दरवर्षी विद्यार्थी अभ्यास करून परीक्षा देतात. याहीवर्षी त्यांनी अभ्यास करून परीक्षा दिली असती. मात्र कोरोणाच्या वाढत्या संक्रमणामुळे शासनाने सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवली. कमी वयोगटानुसार विद्यार्थ्यांना त्याची लागण लवकर होईल आणि तसे झाल्यास शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड असल्याने एखादा विद्यार्थी जरी बाधित झाला तरी त्याची लागण सर्व विद्यार्थ्यांना होवू शकते. या भितीपोटी शासनाने शाळा आणि महाविद्यालये लॉकडाउनच्या काळात बंद ठेवली आहे.

   याचा अर्थ आजाराची लागण होवून रूग्ण वाढू नये यासाठी शासन काळजी घेत आहे. याचा अर्थ असा होत नाही की विद्यार्थी परीक्षा देवू शकणार नव्हते. कोरोणाचा आजार नसता तर विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी परीक्षा दिलीच असती. त्यामुळे विद्यार्थ्यांची यामध्ये चुक असू शकत नाही. असे असतांना यावर्षीची बॅच ही परीक्षेविना पास झालेली बॅच म्हणून गुणवत्ता असणार नाही अशा प्रकारचा जो तर्क लावल्या जातो. तो निराधार आहे. त्याबाबत शाळा चालवणारे कोणत्या भ्रमात आहेत माहित नाही. जाणीवपूर्वक मार्कसिटवर कोरोणा बॅचचे (Corona Batch) लेबल लावून भेदभावाला खतपाणी घालणे कीती संयुक्तिक आहे.

  परीक्षा आणि विद्यार्थ्यांचा वयोगट:

   साधारणत: 10 ते 50 वयोगटातील व्यक्तीला कोरोणा आजार झाला तर त्यामध्ये बरे होणाचे चँन्सेस जास्त आहे. मात्र 10 वर्षाच्या आतिल बालकांना याचा जास्त धोका आहे. आणि 50 सी नंतरच्या वयोवृध्द व्यक्तींना या आजाराचा जास्त धोका आहे. अनेक शाळेमध्ये युकेजी, केजी, फस्ट स्टँडर्ड ते फिप्त स्टँडर्ड पर्यंतचे आणि त्याहून मोठया वयोगटातील विद्यार्थी शिकत असतात. जर शाळेतील एखादया विद्यार्थ्याला कोरोणा आजार झाला तर त्याचे संक्रमण इतर सर्व विद्यार्थ्यांना ताबडतोब होवू शकते त्यामुळे त्यांची परीक्षा घेता येणार नाही.

    जर परीक्षा घ्यायची असे ठरविले तर परीक्षा कंडक्ट करण्यासाठी आवश्यक असणारे साधने, इफ्रस्ट्रकचर शाळेकडे आहे का ते बघणे गरजेचे आहे. आणि डब्लु एच च्या गाईडलाईनचा वापर करून परीक्षा घ्याव्या लागल्या असत्या परंतु ते शक्य नाही. म्हणून शासनाने सर्व शाळांच्या परीक्षा रद्द करून टाकल्या.

  विद्यापीठ परीक्षा आणि गोंधळ:

   महाराष्ट्र शासनाने कोरोणा व्हायरसच्या उद्रेकामुळे सर्व परीक्षा रद्द केल्या. महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षण घेणारे जवळपास 9 लाख 40 हजार विद्यार्थी असून शासनाने त्यांची परीक्षा रद्द केलेली आहे. मात्र यादरम्यान अनेक विद्यापीठाच्या कुलगुरू राज्यापाल यानी आक्षेप घेतल्यामुळे परीक्षेचे घोंगडे भिजत पडले. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने शिखर संस्थांना पत्र लिहून वाढत्या कोरोणाच्या उद्रेकामुळे परीक्षा घेण्यास शासन असमर्थ असल्याचे कळविले होते. मात्र तरीही युजीसीने कुरघोडी केली परीक्षा घेण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या. मात्र परत एकदा विद्यार्थ्यांचा जीव महत्वाचा आहे असे शिक्षणमंत्र्यांनी केंद्रसरकारला कळविले. अजून परीक्षेबाबत समाधानकारक प्रश्न सुटला नाही. विद्यार्थी परीक्षा दयायला समर्थ आहेत मात्र कोरोणामुळे परीक्षा घेणे आणि परीक्षा देणे शक्य होणार नाही.

   मात्र परीक्षा देण्यामुळे विद्यार्थ्यांच्या ॲकडमिक ॲचिव्हमेंटवर परिणाम होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. शाळेप्रमाणे एखादया विद्यापीठाने कोरोणा बॅच लेबल (Corona Batch) मार्क्ससिटवर लावले तर विद्यार्थ्यांच्या करीअर वर मोठा परिणाम होवू शकतो. कारण भविष्यात त्यांना जॉब पासून नाकारले जावू शकते किंवा इतर संधीपासून जाणीवपूर्णक दूर ठेवले जावू शकते. महाराष्ट्रातील कोणत्याही विद्यापीठाने अशा प्रकारचे कोरोणा बॅच लेबल लावून विद्यार्थ्यामध्ये भेदभाव करू नये म्हणजे झाले. यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या धोरणाकडे लक्ष देवून भेदभाव निर्माण करणाऱ्या व्यवस्थेवर अंकूश ठेवायला हवा.

  6. युजीसीची गाईडलाईन:

    युजीसीने 6 जुलै 2020 ला परीक्षेसंदर्भात गाईडलाईन प्रसिध्द केली त्यामध्ये सप्टेंबर 2020 च्या शेवटी परीक्षा घ्याव्या असे सूचवण्यात आले आहे. मात्र महाराष्ट्र शासनाने असमर्थता दर्शविली आहे. या परिस्थितीमध्ये परीक्षा घेणे शक्य नाही पण विद्यार्थ्यांच्या भविष्यातील करीयरला धोका निर्माण होणार नाही याबाबतची ग्वाही शासनाने दयावी. अगोदरच महाराष्ट्र शासन आणि केंद्रशासन यांच्यामध्ये परीक्षेवरून कुरघोडी सुरू आहे. त्यात विद्यार्थ्यांचा बळी जाणार नाही. याची दक्षता घ्यायला हवी.

  कोरोणा बॅच लेबल 2020:

   महाराष्ट्रातील शालेय शिक्षण आणि उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक कोणी कोरोणा बॅच लेबल 2020 लावणार नाही याची शासनाला काळजी घ्यावी लागणार आहे. कारण विद्यार्थी परीक्षा दयायला तयार आहेत. मात्र प्राप्त परिस्थितीमध्ये परीक्षा घेणे आणि देणे शक्य नाही. परीक्षा दिल्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना कोरोणा बॅच म्हणून कोणी नोकरी तत्सम संधी नाकारू नये म्हणजे झाले. कारण या देशामध्ये जाणीवपूर्वक दोन जातीमध्ये, दोन धर्मामध्ये भांडणे लावणाऱ्यांची कमी नाही. आणि आता कोरोणा आणि कोरोणाच्या अगोदर पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये भांडणे लावून त्याचा राजकीय फायदा कसा घेता येईल हे पाहणारे बरेच जण आहेत.

  भुतकाळामध्ये घडलेल्या घटना:

   भुतकाळामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत ज्यामध्ये विद्यार्थ्यांसोबत भेदभाव करण्यात आलेला आहे. त्यापैकी  गाजलेले उदाहरण: एकेकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादमधील विद्यार्थ्यांना इतर विद्यापीठांनी गुणवत्तेचे कारण पुढे करून उच्च शिक्षणासाठी प्रवेश नाकारला होता. त्याचप्रमाणे अनेक कंपन्यांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना नोकरी नाकारली होती. भविष्यात असे होवू नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण अश्याप्रकारची भेदभावपूर्ण वागणूक कायदयाने गुन्हा ठरवते हे जरी सत्य असले तरी काही लोक कायदा डावलून आपली भूमिका रेटतात.

  संविधानातील अनुच्छेद 16:

   भारतीय संविधानातील अनुच्छेद 16 नुसार नोकरीमध्ये संधीची समानता हे तत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार सर्वांना नोकरीमध्ये जात, धर्म, पंथ, जन्मस्थळ या आधारे भेदभाव करता येणार नाही असे म्हटले आहे. म्हणून कोणत्याही संस्था, कंपनीने भविष्यामध्ये याकाळातील विद्यार्थ्यांना परीक्षा दिल्याचे कारण सांगत कोरोणा बॅच म्हणून डावलू नये. यासाठी विद्यार्थां आणि पालकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

   अशाप्रकारे कोणत्याही शाळा, महाविद्यालयाने, विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या मार्क्ससिटवर कोरोणा बॅच 2020 असे लेबल लावून विद्यार्थ्यांमध्ये भेदभावपूर्ण वातावरण निर्माण करू नये. जेणे करून भविष्यामध्ये विद्यार्थ्यांच्या करीअरला समस्या निर्माण होईल.

Post a Comment

1 Comments