बैंडिट क्वीन फूलन देवी


बैंडिट क्वीन फूलन देवी

    एका 10 वर्षाच्या मुलीचा आपल्या बापाची जमिन चुलत भावाने हडपल्यामुळे त्याच्या सोबत झगडा झाला आणि त्या झगडयात पोलिसांनी तीला पकडून नेले. तीन दिवस लॉकपमध्ये ठेवून तीच्या सोबत कुकर्म केले. एक बालिका वधू जीचा तीच्या वृध्द पतीने रेप केला. त्यांनतर श्रीराम गँगने रेप केला त्या गँगच्या 22 लोकांना रांगेत उभे करून ठार केल. सुरूवातीपासून डाकूंच्या गँगमध्ये सामिल होण्याच स्वप्न पाहणारी आणि त्याद्वारे अन्याय, शोषण करणाऱ्या लोकांचा बदला घेवू पाहणारी महिला. जीने दोन वेळा निवडनूका लढल्या आणि जिंकली. नागपंचमीच्या दिवसी भेटायला आलेला फॅन शेर सिंह राणा हा आपली हत्त्या करेल याची कोणतीही पूर्व कल्पना नसतांना त्याला नागपंचमीच्या दिवसी खीर खायाला दिली. अशी जाबाज महिला म्हणून फूलन देवीला ओळखले जाते.

कधीकाळी डोक्यावरचा घुंगट पडू देणाऱ्या महिलाही शस्त्र उचलू शकतात आणि अत्याचाराच्या विरोधात लढू शकतात हा आत्मविश्वास फूलन देवीमुळे मागासवर्गीय समाजातून आलेल्या महिलामध्ये निर्माण झाला. 25 जुलै रोजी फूलनदेवीची पुण्यतीथी असल्याने पुन्हा इतिहासाला उजाळा मिळाला.

     अनेक वर्षे स्त्रीयांना आणि दलितांना मुनस्मृतिने बंधनात अडकून ठेवले होते. पुरूषसत्ताक समाजामध्ये स्त्रीला दासी म्हणून वागणूक दिली जात होती. तीने केवळ आपल्या कुटूंबाची काळजी घेणे आणि पतीच्या आदेशाचे पालन करणे ऐवढेच तीच्यासाठी विश्व होते. त्यामुळे उच्चवर्णीयांनी कितीही छळ केला, रेप केला तरी कोणताही विरोध करता मुकाटयाने सहन करण्याची ही अमानुष परंपरा फूलन देवीने उखडून टाकली. मनुस्मृतिने क्षत्रियाशिवाय कोणालाही शस्त्र धारण करण्याचा अधिकार दिला नाही. त्याच मनुस्मृतिच्या नाकावर टिचून डाकूच्या गँगमध्ये सहभागी होवून प्रत्यक्ष शस्त्रधारण करून फूलन देवीने तीच्यावर अत्याचार करणाऱ्या गुंडांना एका रांगेत उभे करून ठार केले. ही काही त्याकाळी सोपी गोष्ट नव्हती. पण फूलन देवीने तीच्या या कृत्यातून मनुस्मृतिच्या समर्थकांना धडा शिकवला.

    भारताच्या इतिहासातील एक डाकू ते खासदार असा आगळावेगळा प्रवास करणारी भारतीय महिला चंबळ घाटीची शेरणी म्हणून प्रसिध्द असलेली फुलन देवी हीचा जन्म इ.स. 10 ऑगस्ट 1963 मध्ये उत्तर प्रदेशातील एक छोटे गाव गोरहा मध्ये मल्लाह जातीमध्ये झाला. मल्लाह समाज हा कोळी समाज असून त्यांचा व्यवसाय मासेमारी आणि होडया चालवणे आहे. चुलत भावासोबत झगडा झाल्यानंतर फूलनचे वयोवृध्द व्यक्तीसोबत लग्न लावून देण्यात आले. मात्र वय कमी आणि पतीच्या सतत मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून तीने घर सोडले आणि ती चंबळ डाकूंच्या गँगमध्ये भर्ती झाली. काही दिवसानंतर फूलनचे दोन डाकू सोबत प्रेमसंबंध जळले त्यापैकी एक म्हणजे सरदार बाबू गुज्जर आणि दुसरा विक्रम मल्लाह. नंतर बाबू गुज्जर आणि विक्रम मल्लाह यांच्यामध्ये भांडणे झाली त्यात बाबू गुज्जरचा मृत्यु झाला त्यांनतर फूलन विक्रम मल्लाह सोबत राहू लागली. एक दिवस फूलन आपल्या गँगला घेवून जुन्या पतीच्या गावाला गेली. आणि तिचा पती आणि त्याची दुसरी बायको यांना चांगल कुटून काढल.

    नंतर फूलन देवीच्या गँगची श्रीराम ठाकुर गँगसोबत लढाई झाली. बाबू गुज्जरला मारण्यात फूलनचा हात असल्याचे श्रीराम ठाकूर गँगचे म्हणणे होते. आणि बाबू गुज्जर हा श्रीराम ठाकूर गँगच्या जवळचा होता त्यामुळे बदला घेण्यासाठी श्रीराम ठाकूर गँगने फूलन देवीच्या गँगवर हल्ला केला. त्यात विक्रम मल्लाह मारला गेला. श्रीराम ठाकूर गँगने फूलन देवीला बंदी बनवून बेहमई गावामध्ये 3 हप्ते आळीपाळीने बलात्कार केले. मात्र फूलनवर लिहिलेल्या पुस्तकामध्ये यासंदर्भातील उल्लेख नाही. इथून सुटल्यानंतर फूलन पुन्हा आपल्या गँगमध्ये सामिल        झाली. मात्र आता ती सुडाच्या भावनेने पेटून उठली होती. पुन्हा आपल्या गँगसह 1981 मध्ये बेहमई गावामध्ये आली. तिथे तीच्यावर अत्याचार केलेल्या दोन व्यक्तीला ओळखले. बाकींच्या लोकांबद्दल विचारले मात्र कोणीही त्यांची माहिती दिली नाही. त्यानंतर फूलनने अत्याचार करणाऱ्या आणि त्याचे समर्थन करणाऱ्या गावातील 22 ठाकुरांना ठार केले.

   ठाकुरांच्या हत्त्याकांडानंतर मात्र फूलन देवीची प्रतिमा अजून मलिन झाली. ठाकूर ही उत्तरप्रदेशातील प्रतिष्टीत उच्चवर्णीय जमात असल्याने सरकार फूलनच्या मागे लागले. कोणत्याही परिस्थितीमध्ये फूलनला पकडण्यासाठी पोलिसांनी ऑपरेशन सुरू केले. फूलनला पकडण्यासाठी तीची माहिती देणाऱ्यांना इनाम देण्याचे जाहिर केले. मेडीयाने तीला बँडीट क्वीन नाव देवून फूलनच्या विरोधात जनआक्रोश निर्माण करण्याचे काम केले. बेहमई हत्त्याकांडामुळे वाढता जनआक्रोश लक्षात घेता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व्ही.पी.सिंग यांना राजीनामा दयावा लागला. दोन वर्षानंतर भिंड चे एस.पी. राजेंद्र चतुर्वेदी यांच्या सांगण्यावरून फूलन देवीने आत्मसमर्पन करण्याचे ठरवले पण उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यावर विश्वास नाही म्हणून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री अर्जुन सिंग यांच्या समोर आत्मसमर्पन करण्यासाठी एस.पी. समोर काही अटी टाकल्या. त्या अटी पुढीलप्रमाणे होत्या. तीच्या सोबत आत्मसमर्पन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला मृत्युदंडाची शिक्षा देवू नये, शिक्षेचा काळ हा आठ वर्षापेक्षा जास्त असता कामा नये. एक जमिनीचा प्लॉट तीला दिला जावा. त्या अटी लगेच मान्य झाल्या आणि फूलन देवीने मुख्यमंत्री अर्जुन सिंग, 10,000 लोक 300 पोलिस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पन केले. त्यानंतर तिच्यावर 22 हत्त्या, 18 अपहरण आणि 30 डाके ऐवढे चार्जेस लावण्यात आली. त्यामुळे फूलन देवीला 11 वर्षे तुरूंगात रहावे लागले. 1993 मध्ये उत्तर प्रदेशात मुलायम सिंह चे सरकार आले. त्या सरकारने फूलनवरील सर्व आरोप वापस घेतले. सर्व उच्चवर्णीय अवाक झाले. 1994 मध्ये फूलनची तुरूंगातून सुटका झाली. त्यानंतर फूलन देवीने उम्मेद सिंह सोबत लग्न केले.

   अरूंधती रॉयने म्हटले की, जेलमध्ये असतांना फूलनला विचारता तीचे ऑपरेशन करून युटरस काढून टाकण्यात आले आणि डॉक्टरला विचारल्यावर त्याने सांगीतले की आता दुसरी फूलन जन्म घेवू शकणार नाही. एक महिलेचे एक अंग बिमार असतांना काढून टाकण्याबाबत तीला विचारल्या सुध्दा जात नाही. ही आहे भारतीय समाजाची समस्या.

   फूलन देवीसोबत दलित समुदायाचा खुप मोठा जनाधार निर्माण झाला होता. ती आता उत्तरप्रदेश मधील शोषित वंचितांचा आवाज बनली होती. तुरूंगातून सुटल्यानंतर फूलन देवीने बौध्द धर्माची दिक्षा घेतली त्यानंतर 1996 मध्ये फूलन देवीने समाजवादी पार्टीतर्फे निवडनुक लढविली आणि मिर्झापूर येथून ती निवडूनही आली. कधीकाळी चंबळच्या घाटीत राहणारी महिला आता दिल्लीमधील अशोक रोडवरील सुंदर बंगल्यामध्ये राहू लागली. दोन वेळेस फूलन देवी खासदार म्हणून निवडून आली.

    25 जुलै 2001 मध्ये शेर सिंह राणा तीला भेटण्यासाठी आला. फूलनच्या एकलव्य सेना नावाच्या संघटनेमध्ये सामिल होण्याची इच्छा त्याने फूलन देवीकडे प्रगट केली. त्या दिवसी नागपंचमी होती फूलन देवीने त्याला खीर दिली त्याने ती खीर खाल्ली. फूलन आपले सर्व घरची कामे आटोपून संसदेकडे निघाली होती तेवढयात त्याने गेटजवळ पोचताक्षणी फूलनवर गोळया झाडून ठार केले. ताबडतोब शेर सिंहला पोलिसांनी पकडले त्यावेळी तो म्हणाला की बेहमई हत्त्याकांडाचा बदला घेतला. शेर सिहं राणाला दिल्लीमधील न्यायालयाने 14 ऑगस्ट 2014 रोजी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. त्याला तिहार जेलमध्ये ठेवण्यात आले होते. काही दिवसाने तो तिहार जेलमधून फरार झाला. त्यानंतर शेर सिहं राणाने एक व्हिडीओ क्ल्पि व्हायरल केली की, अंतिम हिंदू हृदय सम्राट पृथ्वीराज चौव्हानची समाधी शोधून त्यांच्या अस्थि भारतात आणण्याचा दावा केला होता. मात्र दिल्ली पोलिसांनी त्याला पकडले. काही जण फूलन देवीची हत्त्या म्हणजे राजकीय षडयंत्रही मानतात. तर काहीजण तीच्या हत्तेमागे तीचा पती उम्मेद सिंग असल्याचे म्हटले जाते.

     फूलन देवीला केवळ 38 वर्षाच आयुष्य लाभले. ते आयुष्य अत्याचार, बलात्कार आणि जातीयता यांनी प्रचंड भरलेल होत. खालच्या जातीतील महिलांना कसही नागवता येत ही उच्चवर्णीयांची मानसिकता होती. त्यातून त्यांनी फूलन देवी सारख्या महिलेवर अमानुष अत्याचार केले. तिला डाकू होण्यास भाग पाडले. मात्र डाकूच्या गँगमध्ये सामिल झाल्यावर फूलनने अत्याचार करणाऱ्यांचा बदला घेतला. आणि शेवटी हिंसेने माणस मारता येतात पण माणसांना जिंकता येत नाही. हिंसेला अहिंसेनेच जिंकता येते. या बुध्दांच्या विचारसरणीचा स्विकार करून शस्त्रे टाकून बुध्दाच्या चरणी नतमस्तक झाली.

Ref: Wikipedia

Post a Comment

1 Comments