How to achieve the goal लक्ष साध्य कसे करावे?


How to achieve the goal

लक्ष साध्य कसे करावे?

     जीवनामध्ये लक्ष (Goal) निश्चित करणे आणि ते साध्य करणे गरजेचे आहे. बिना लक्ष निश्चित केलेला व्यक्ती जीवनामध्ये 

कुठेही, कसाही भरकटत जातो. आणि भरकटलेला व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होवू शकत नाही.

   यशस्वी होण्यासाठी लक्ष निश्चित करणे आवश्यक आहे. समुद्रामध्ये दिपस्तंभ ज्याप्रमाणे जहाजांना मार्गदर्शक ठरतो त्याप्रमाणे व्यक्तीला लक्ष हे दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरते.
     लक्ष निश्चित केलेला व्यक्ती म्हण्जे बसमध्ये बसलेला प्रवासी त्याला कुठे उतरायचे हेच माहित नसेल तर बस जिथे नेईल तीथे तो पोचतो. आणि त्यांनतर त्याची जी अवस्था होते अगदी तसीच अवस्था लक्ष निश्चित करणाऱ्या व्यक्तीची होते. म्हणून जीवनामध्ये लक्ष निश्चित करणे आवश्यक आहे. लक्ष निश्चत करतांना खालील बाबींचा वापर करावा. त्यामुळे लवकरात लवकर लक्ष साध्य करण्यास मदत होईल.

 1. लक्ष हे स्पष्ट असावे:

     यशस्वी होण्यासाठी लक्ष निश्चित करतांना ते स्पष्ट असावे. संदिग्ध लक्षामुळे व्यक्तीमध्ये संशय निर्माण होतो आणि त्यातून नकारात्मक भावना निर्माण होते. परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवणे हा गोल विद्यार्थी निश्चित करतात परंतु त्यामध्ये संदिग्धता असल्याने पाहिजे ते यश संपादन करू शकत नाही. लक्ष हे स्पष्ट असावे त्याचबरोबर ते कुवतीनुसार असावे म्हणजे 80% मार्क्स मिळवायचे, 95% मार्कस मिळवायचे यापध्दतीने लक्ष निश्चित करायचे आणि ते मिळवण्यासाठी जी मेहनत घ्यायची ती घ्यायची नाही. यातून अनेक विद्यार्थी अयशस्वी होतात. आणि ते आपल्या नशिबाला दोष देतात.

     बरेच लोक म्हणतात मला यशस्वी व्यक्ती व्हायचय। यशस्वी व्हायचय पण नेमके कसे आणि किती हेच जर स्पष्ट नसेल तर तुमचा सबकॉन्सिअस माईंड तुम्हाला याबाबतीत मदत करू शकणार नाही. त्यासाठी लक्ष निश्चित करतांना ते स्पष्ट असावे.

2. लक्ष हे मोजण्याजोगे असावे:

     लक्ष नुसतेच निश्चित करून चालणार नाही तर ते मोजण्याजोगे असावे. विशिष्ट नंबर मध्ये किंवा नंबरचे साहचर्य लक्षामध्ये जोडलेले असावे. तरच ते साध्य करण्यास सोपे जाते. जसे बरेच लोक नेहमी म्हणतात मला वजन कमी करायचे आहे. पण नेमके किती वजन कमी करायचे हे निश्चित नसल्यामुळे तुमचा मेंदू आणि शरीर तुम्हाला साथ देत नाही. जेवढे वजन कमी करावयाचे आहे ते अगोदर आकडयात ठरवा आणि त्याप्रमाणे कामाला लागा. याचा सकारात्मक परिणाम होवून तुम्ही निश्चित केलेल लक्ष साध्य करणे सोपे जाईल.

3. लक्ष हे साध्य करण्याजोगे असावे.

     लक्ष निश्चित करतांना ते साध्य करण्याजोगे असावे. अवास्तव लक्ष निश्चित करू नये. कारण जे लक्ष तुम्ही साध्यच करू शकत नाही असे लक्ष निश्चित करणे योग्य होणार नाही. काही विद्यार्थी ठरवतात की यावर्षी परीक्षेमध्ये 90% मार्क्स मिळवायचे आहेत. परंतु मागील वर्षाचा इतिहास बघितला तर 60% च्या वर तुम्ही कधी मार्क्स मिळवले नाही अशा अवस्थेमध्ये 90% मिळवणे हे लक्ष तुम्हाला झेपणार आहे का? तर नाही. त्यासाठी मागील वर्षीपेक्षा थोडे मोठे लक्ष निश्चित करावे जसे 70% मिळवायचे, त्यांनतर थोडेथोडे वाढवत जाणे गरजेचे आहे. तरच ते शक्य होते. विनाकारण अवास्तव, अवाजवी लक्ष निश्चित करून जीवनाची ओढाताण करून घेवू नये.

4. लक्ष हे वास्तविक असावे:

     लक्ष निश्चित करतांना ते वास्तविक असावे. अनेक विद्यार्थी, लोक कल्पनेच्या भरात राहून लक्ष निश्चित करतात आणि ते साध्य होईल की नाही याची वास्तविक कल्पनाही त्यांना नसते. त्यामुळे ते अयशस्वी होतात. अवास्तव लक्षामुळे व्यक्तीच्या मनामध्ये शंका निर्माण होते. त्यामुळे सबकांन्सियस माईंड ते लक्ष साध्य करण्यास मदत करीत नाही. लक्ष निश्चित करतांना ते झेपावणारे असावे, वास्तविक असावे. तरच ते साध्य करण्यास सोपे जाते.

5. वेळेची मर्यादा:

     कोणतेही लक्ष साध्य करण्यासाठी त्याला वेळेची मर्यादा ठरवणे गरजेचे असते. नाहीतर लक्ष ठरवायचे आणि ते कधी साध्य करायचे याचा काहीच ताळमेळ नसेल तर ते साध्य होवू शकणार नाही. उदा. अनेक लोक नेहमी म्हणतात की मला बिझनेस सुरू करायचा आहे. परंतु तो नेमका कधी सुरू करायचा आहे याची कोणतीही कालमर्यादा नसल्यामुळे त्यांचा बिझनेस सुरू होवू शकत नाही. तर जे लोक ठरवतात की या वर्षाच्या या महिण्यामध्ये मला माझा बिझनेस सुरू करायचा आहे. ते स्वत: वेळेची मर्यादा ठरवून घेतात. त्यामुळे त्यांना लक्ष साध्य करण्यास सोपे जाते.

5. वेळ घालवता काम सुरू करणे:

     जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी लक्ष निश्चित करणे गरजेचे असते. लक्ष निश्चित केल्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी वेळ घालवता त्यावर तातडीने काम सुरू करावे. तरच ते साध्य होवू शकते. जर लक्ष निश्चित केले मात्र त्यावर काम करणे सुरू केले नाही तर ते कधीच साध्य होवू शकणार नाही. लक्ष साध्य करण्यासाठी मशिनी वर्क करावे लागेल. म्हणजे रोबोटप्रमाणे थांबता, थकता ते काम सतत सुरू ठेवावे लागेल तरच लक्ष साध्य होईल.

Read & Share, you also like: 

1. Time Management

2. Failure to Success

Post a Comment

1 Comments