How to develop Will PowerHow to develop Will Power

इच्छाशक्ती कशी वाढवाल

     व्यक्तीच्या जीवनामध्ये इच्छाशक्तीला (Will Power) महत्त्वाचे स्थान आहे. इच्छाशक्तीच्या जोरावर व्यक्तीने जगामध्ये मोठमोठया समस्यांवर मात केलेली आहे. इच्छाशक्ती (Will Power) व्यक्तीला कोणतेही काम करण्याची प्रेरणा देते. इच्छाशक्ती असणाऱ्या व्यक्ती समस्या सोडून देत नाही तर ती समस्या का निर्माण झाली आणि ती सोडवण्यासाठी उत्तर शोधल्याशिवाय शांत बसत नाही.

इच्छाशक्ती ज्या व्यक्तीमध्ये प्रबळ असते त्याच्या पुढे समस्या केवढीही असली तरी तो तीला पाहून गर्भगळीत होत नाही. तर त्या समस्येला धैर्याने तोंड देतो कारण त्याला माहित असते ही समस्या सुटल्याने माझा नक्की फायदा होणार आहे. समस्या सोडून दिल्याने सुटते असे अनेक जन म्हणतात. परंतु ते तितके खरे नाही. समस्या सोडवल्याने त्या सुटतात. समस्या सोडवण्यासाठी असावी लागते ती जबरदस्त इच्छाशक्ती (Will Power).

   अनेक व्यक्ती संकल्प करतात की त्यांना हे काम पूर्ण करावयाचे आहे. मात्र इच्छाशक्तीचा (Will Power) अभाव असल्याने ते ठरविलेले काम पुर्ण करू शकत नाही. काम हाती घेतल्यानंतर त्यांना लगेच आळस येतो,  काम करू वाटत नाही. आणि ते काम मधातच सोडून देतात. पण ज्या व्यक्तीकडे इच्छाशक्ती असते तो ते काम पूर्ण होईपर्यंत थांबत नाही. ते पूर्ण केल्यानंतरच दुसऱ्या कामाकडे वळतो. अशी ही इच्छाशक्ती वाढवण्यासाठी काय करावे लागेल? इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्याला यशस्वी होता येते का? अशा अनेक प्रश्नांचा वेध या लेखात घेण्यात आला आहे.

 इच्छाशक्तीच्या (Will Power) जोरावर यशस्वी होता येते का?

   जर व्यक्तीमध्ये जबरदस्त इच्छाशक्ती असेल तर तो अपेक्षित यश मिळवू शकतो जीवनामध्ये यशस्वी होवू शकतो. इच्छाशक्तीच्या जोरावर अनेकांनी यश संपादन केले आहे त्यापैकी बिलगेट्स अतिशय साधारण कुटूंबामधून आलेला व्यक्ती मात्र आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर जगातील दुसऱ्या क्रमांचा श्रीमंत व्यक्ती म्हणून गणल्या गेला. शालये जीवनामध्ये बिलगेट्सला जास्त रूची नव्हती. मात्र त्याला कॅम्पुटर कसे काम करते. याबाबत कुतूहल होते. त्याच्या शाळेमध्ये एकच कँम्पुटर होता. त्याचा मित्र ॲलन आणि तो फावल्या वेळेत कॅम्पुटरवर पडलेले असायचे. कॅम्पुटर शिकत असतांना कँम्पुटरच्या सॉफटवेअर सोबत छेडछाड केल्याने अनेक वेळा त्यांना लॅब मधून हाकलून देण्यात आले. मात्र बिलगेटस त्याचा मित्र थांबले नाही. सॉफटवेअर मधील कोणत्या त्रुटीमुळे कँम्पुटर बंद पडतो. कँम्पुटर बंद पडू नये म्हणून आपल्याला एखादे सॉफटवेअर बनवता येईल का? या प्रश्नाने त्याला पुरते पछाडले. पण कँम्पुटरची उपलब्धता नसल्याने त्याने हार मानली नाही. लेबोरटरी सहाय्यकाची मदत घेवून रात्री कँम्पुटरवर काम केले प्रोग्रॅमिंग तयार केले. नंतर Microsoft नावाची प्रोग्रॅम पुरवणारी कंपनी स्थापन केली. आणि त्यामाध्यमातून संपूर्ण जगाला Microsoft चे सॉफटवेअर उपलब्ध करून दिले. यावरून हे स्पष्ट होते की, समस्या कितीही मोठी असो जर तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही समस्येवर तोडगा काढता येईल अणि जीवनामध्ये यशस्वी होता येईल.

 इच्छाशक्ती वाढवण्यासाठी काय करावे?

   यशस्वी व्हायचे असेल तर इच्छाशक्ती वाढवणे गरजेचे आहे. ज्या व्यक्तीमध्ये इच्छाशक्ती आहे ते व्यक्ती जगामध्ये नावारूपाला येतात. परंतु ज्यांच्याकडे इच्छाशक्ती नाही आणि त्यांना ती वाढवायची आहे त्यांनी खालील बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

 1.  कॉन्सियस आणि सबकॉन्सियस माईंडचा वापर करावा:

   इच्छाशक्ती वाढवण्यासाठी सर्वात पॉवर फूल इलाज म्हणजे कॉन्सियस आणि सबकॉन्सियस माईडचा वापर करावा. आपल्या मेंदूमध्ये दोन भाग आहेत एक उजवा मेंदू आणि दुसरा डावा मेंदू. उजवा मेंदू शरीराच्या डाव्याभागावर नियंत्रण ठेवतो आणि डावा मेंदू शरीराच्या उजव्या भागावर नियंत्रण ठेवतो. डावा मेंदू म्हणजे कॉन्सियस माईंड आणि उजवा मेंदू म्हणजे सबकॉन्सियस माईंड या दोन्हीचा वापर कसा करावा.

    या दोन्ही मेंदूचा सक्रियपणे वापर करायचा असेल तर शरीराच्या दोंन्ही साईडच्या अवयवांना कामाला लावणे आवश्यक आहे. दररोज आपण उजव्या हाताने लिहून काढतो, अधूनमधून डाव्याहाताने लिहून काढण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे उजव्या मेंदूच्या सेल्स कार्यान्वित होतात आणि त्या चांगल्या प्रकारे काम करू लागतात. त्यामुळे प्रत्येक उजवा आणि डाव्या अवयवांचा दैनदिन वापर करून बघावा. त्यामुळे कॉन्सियस आणि सबकॉन्सियस मेदूंचे दोन्ही भाग सक्रिय होतील आणि त्यामुळे तुमची इच्छाशक्ती वाढण्यास मदत होईल.

 2. कल्पनाशक्तीचा इच्छाशक्ती वाढवण्यासाठी वापर करावा:

     इच्छाशक्ती वाढवण्यासाठी कल्पनाशक्ती महत्त्वाची भूमिका बजावते. कोणतेही काम करतांना ज्यावेळेस अपयश येते तेंव्हा व्यक्ती खचून जातो. आणि काम करू वाटत नाही. मात्र कल्पनेचा वापर इच्छाशक्ती वाढवण्यासाठी केला तर हाती घेतलेले काम त्वरीत पूर्ण करता येईल.

     कल्पना शक्तीचा वापर करतेवेळी जेंव्हा एखादे काम हाती घेतले आहे आणि ते पूर्ण झाल्यावर मला किती फायदा होणार आहे. याची कल्पना केली. तर त्या कल्पनेने तुम्हाला सुखद अनुभव मिळेल आणि काम करण्याची इच्छाशक्ती वाढेल. विद्यार्थ्यांनी कल्पनाशक्तीचा वापर अभ्यास करतांना करावा. कारण विद्यार्थ्यांना अभ्यास करतांना प्रचंड कंटाळा आणि थकवा येतो. कंटाळा आणि थकवा हया मानसिक अवस्था आहेत. चांगला अभ्यास केल्याने चांगले मार्क्स मिळतील आणि जीवनात यश मिळविणे सोपे होईल. यासाठी कल्पनाशक्तीचा वापर इच्छाशक्ती वाढवण्यासाठी करावा.

 3. कामाचा विचार करण्याऐवजी कामाला लागा:

    इच्छाशक्ती वाढवण्याचा एक महत्त्वाचा उपाय म्हणजे कोणत्याही कामाचा विचार करत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष कामाला लागा. म्हणजे तुमची इच्छाशक्ती वाढण्यास मदत होईल. यशस्वी होण्यामागे इच्छाशक्तीचा मोठा वाटा असतो. तुमच्या मध्ये एखादे काम करण्याची इच्छाच नसेल तर अपयश निश्चित येईल. मात्र यशस्वी होण्यासाठी कोणत्याही कामावर विचार करण्याऐवजी प्रत्यक्ष कामाला लागले तर इच्छाशक्ती वाढण्यास मदत होईल आणि आपण हे काम करू शकतो. असा आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होईल.

    मात्र अनेक जण प्रत्यक्ष कामाला लागण्या अगोदर त्यावर विचार जास्त करतात. परिणामी ते काम त्यांना अवघड वाटायला लागते. व्यक्तीकडून यशापेक्षा अडचणीचाच शोध जास्त घेतल्या जात असल्याने तो त्या कामाप्रती निगेटिव्ह होतो आणि ते काम अर्धवट सोडून देतो. त्यामुळे त्याला यश मिळत नाही. जे कोणते काम निवडले आहे त्यामध्ये स्वत: ला झोकून दया. त्यातून तुमची इच्छाशक्ती वाढेल.

 4. स्वयंशिस्तीद्वारे इच्छाशक्ती (Will Power) वाढवता येते:

   व्यक्तीच्या जीवनामध्ये स्वयंशिस्त खुप महत्त्वाची आहे. स्वयंशिस्तीच्या आधारे व्यक्ती हिऱ्याप्रमाणे स्वत:ला तरासू शकतो. हिऱ्याचे महत्त्व आपल्याला माहित आहे. सोन्यापेक्षाही मौल्यवान धातू हिरा आहे. व्यक्तीला स्वत: ची किंमत हिऱ्याप्रमाणे निर्माण करायची असेल तर त्याने स्वयंशिस्तीने वागायला हवे. स्वयंशिस्तीमुळे कोणतेही काम करण्याची इच्छाशक्ती व्यक्तीमध्ये निर्माण होते. स्वयंशिस्तीमुळे व्यक्तीमधील आळस निघून जातो. आणि त्याला काम करण्याची सवय लागते.

 5. डेडलाईन निश्चित करा:

    कोणतेही काम वेळेत पूर्ण करणे गरजेचे असते. काम वेळेत पूर्ण झाले नाही तर तुमचा पैसा, वेळ आणि श्रम या मौल्यवान वस्तू वाया जातात. त्या वाया जावू नये म्हणून कामाची डेडलाईन निश्चित करा. हे काम या तारखेपर्यंत, या महिण्याच्या शेवटपर्यंत पूर्ण करावयाचे आहे. अशी स्वत: सी खुनगाठ बांधा. यामुळे वेळेत काम करण्याची सवय लागेल. आणि त्यातुन इच्छाशक्ती वाढीस लागेल.

   आम्ही एखादे काम हाती घेतो आणि ते करत राहतो मात्र त्यासाठी डेडलाईन निश्चित करीत नाही. याचा परिणाम असा होतो की ते काम करण्यासाठी खुप वेळ लागतो आणि मध्यंतरी अनेक अडथळे येतात. त्यातुन निराश्या निर्माण होते. मात्र डेडलाईन निश्चित केल्याने By hook or by crook या पध्दतीने काम केले जाते. आणि ठरविलेले ध्येय साध्य करता येते.

 6. मेडीटेशनने इच्छाशक्ती (Will Power) वाढवता येते:

   इच्छाशक्ती वाढवण्यासाठी मेडीटेशन हा सोपा आणि सहज उपाय आहे. आज मोठ - मोठाल्या आजार मेडीटेशनच्या माध्यमातून कंट्रोल केल्या जात आहे. मेडीटेशनमुळे रूणांची एकाग्रता आणि इच्छाशक्ती वाढते आणि त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनतो. दररोज कमीत कमी 20 मिनिटे तरी मेडीटेशन करणे आवश्यक आहे. मेडिटेशनमुळे चित्ताची एकाग्रता निर्माण होते. एकाग्रतेमुळे इच्छाशक्ती दृढ होण्यास मदत होते.

 7.  स्वत: चे मुल्यमापन करून इच्छाशक्ती (Will Power) वाढवता येते:

   स्वत: चे मुल्यमापन केल्याने इच्छाशक्ती वाढते हे सिध्द झाले आहे. एखादे काम करतांना आपली चुक कुठे    झाली, आपण काय करायला पाहिजे होते, काय करायला नको होते. इत्यादी प्रश्नांचा शोध घेणे म्हणजे स्वत: चे मुल्यमापन करणे होय. मुल्यमापन करून झालेल्या चुकांचे उत्तर शोधल्याने व्यक्तीची इच्छाशक्ती वाढते. आपण हे काम करू शकतो ही भावना त्याच्यामध्ये वाढीस लागते.

   अशाप्रकारे वरील सर्व बाबींचा वापर करून इच्छाशक्ती वाढवता येईल. इच्छाशक्तीशिवाय यश मिळू शकत नाही. त्यासाठी व्यक्तीला आपल्यामध्ये इच्छाशक्ती निर्माण करावी लागेल. तरच तो कोणत्याही कामामध्ये यशस्वी होवू शकेल. कोणत्याही आजारावर मात करू शकेल.

Post a Comment

0 Comments