How to overcome on fear? भितीवर विजय कसा मिळवाल?How to overcome on fear?

भितीवर विजय कसा मिळवाल?

   प्रत्येकाला कशाची ना कशाची भिती (Fear) वाटतेच. पृथ्वीवर असा एकही माणूस सापडणार नाही की त्याला कशाचीच भिती वाटत नाही. जर एखादा व्यक्ती म्हणत असेल की त्याला कशाचीही भिती (Fear) वाटत नाही. तर तो खोट बोलत असतो. माणसाचा जन्म झाल्यानंतर त्याला कुटूंब, शाळा आणि समाज याद्वारे शिक्षण मिळत असते. ज्यावेळेस शिक्षण मिळते त्याच वेळेस सोबत भितीयुक्त विचारही पेरल्या जात असतात.

व्यक्तीमध्ये भितीयुक्त विचार वाढत जावून त्याचा परिणाम व्यक्तिमत्त्वावर होत असतो. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला भितीने व्यापून टाकले आहे.
   भितीशिवाय एकही क्षेत्र शिल्लक नाही. भितीमुळे व्यक्तीला अनेक मर्यादा येतात. त्याने निर्माण केलेल्या कंम्फर्टझोनमधून तो बाहेर पडायला तयार नसतो. त्यामुळे व्यक्ती जिथे आहे तिथेच चिपकून राहते आणि जीवनात आहे त्यापेक्षा जास्त काही करू शकत नाही.

    मात्र ज्या लोकांनी भितीवर विजय मिळविला आहे. ते जिवनात यशस्वी झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. कारण ते त्यांच्या कंम्फर्टझोनमधून बाहेर पडून त्यांनी नवीन सुरूवात केलेली होती. म्हणजेच नवीन निर्माण करण्याचे धाडस दाखविले. त्यामध्ये अनेक वेळा अपयश आले मात्र त्या अपयशाला घाबरून जाता ते सतत त्यावर काम करीत राहिले आणि त्यातून त्यांना यश मिळाले.

 भिती (Fear) निर्माण होण्याची कारणे:

 1. मुलांना परीक्षेमध्ये नापास होण्याची भिती:

    अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेची भिती वाटते आणि चांगला अभ्यास झाला नाही तर नापास होण्याची भिती वाटत असते. त्यामुळे विद्यार्थी भितीपोटी परीक्षेला सामोरे जात नाही. आणि परीक्षा दिली त्यामध्ये नापास झाले तर भितीपोटी काहीजणं आत्महत्त्या करतात. त्यामुळे भितीचा व्यक्तीमत्त्वावर भयंकर वाईट परिणाम होतो.

 2. युवकांना नोकरीची चिंता आणि त्यातून निर्माण होणारी भिती:

     अनेक युवक अहोरात्र अभ्यास करून डिग्री मिळवितात. डिग्री मिळाल्यानंतर मात्र ताबडतोब नोकरी मिळत नाही. अनेक इंटरव्हयुमध्ये अपयश येते. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये नोकरी मिळेल की नाही याची भिती निर्माण होते. ही भिती वाढत गेली की युवक नकारात्मकतेकडे वळतो. त्याचा परिणाम म्हणजे व्यसन जडते.

 3. पालकांना आपल्या मुलांच्या करिअरची भिती:

     पालकांना आपल्या मुलांच्या करिअरची चिंता सतत भेडसावत असते. या अगोदर मुलांच्या शिक्षणावर त्यांनी बराच खर्च केलेला असतो. आणि त्या खर्चाच चीज व्हाव असे पालकांना वाटते मात्र आजच्या जीवघेण्या स्पर्धेमध्ये नोकऱ्यांचा प्रश्न बिकट झाल्याने पाल्याला नोकरी मिळेल की नाही या भितीपोटी पालक चिंताग्रस्त असतात.

 4. अनेकांना आपला अपमान होईल याची भिती (Fear):

     अनेक लोक भितीपोटी स्वत: ला व्यक्त करू शकत नाही. आपण जर मोठया माणसांसोबत बोललो आणि आपले काही चुकले तर आपला अपमान होईल या भितीपोटी अनेक जण इतरांना बोलत नाहीत किंवा कार्यक्रमामध्ये भाग घेत नाहीत.

 5. ऑफिसमध्ये अनेकांना बॉसची भिती (Fear):

    अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या बॉसची अनावश्यक भिती वाटत असते. बॉसने एखादे काम करायला सांगितले तर ते केल्यानंतरही त्यांना केलेल काम बरोबर आहे का नाही, त्यामध्ये काही चुका तर नाही ना, बॉसला ते आवडेल की नाही. यासारख्या काल्पनिक विचारांनी भिती वाटायला लागते. त्यामुळे भितीपोटी कर्मचारी क्षमतेनिशी काम करू शकत नाही.

   भितीचे परिणाम:

 1. आत्मविश्वास कमी होतो.

 2. व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाते.

 3. खोटे बोलण्याची सवय लागते.

 4. आत्महत्तेचा विचार मनात येतो.

 5. स्वत:मधील हुशारी दाखवू शकत नाही.

 6. नकारात्मक अभिवृत्तीची वाढ होते.

भितीवर विजय कसा मिळवाल:

 1. तयारीचा नियम:

    कोणत्याही कामाची भितीवाटण्यामागे जे कारण आहेत त्यामध्ये त्या विषयाची कमी तयारी, किंवा त्या कामाची योग्य माहिती नसणे. त्यामुळे ज्या कामाची भिती वाटते त्याची माहिती गोळा करा. त्याची चांगली तयारी करा म्हणजे तुमची भिती नाहिसी होईल. उदा. नोकरीच्या इंटरव्हयुसाठी जाण्यापूर्वी इंटरव्हयुची चांगली तयारी करा. त्यासंदर्भातील पुस्तके वाचा. इतरांचा अनुभव समजून घ्या आणि त्यानुसार तयारी करा म्हणजे भिती वाटणार नाही.

 2. नेहमी सकारात्मक विचार करा:

     नेहमी सकारात्मक विचार ठेवा. जुण्या विचारांना थारा देवू नका. भूतकाळातील अपयशाच्या भितीची आठवण करू नका. सतत होकारात्मक विचार करा.  जे काम हाती घेतले आहे. ते पूर्ण करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. आणि ते मी पूर्ण करणार आहे. यासाठी कितीही अपयश आले तरी मी थांबणार नाही. असा सकारात्मक विचार करा. त्यामुळे भिती पार निघून जाईल.

3. भविष्याचा विचार करणे सोडून दया:

   बऱ्याचदा आपल्याला भविष्याच्या चिंतेने भिती वाटायला लागते. जसे नोकरी मिळेल की नाही, लग्न जुळेल की नाही. शेतात पिकपानी येईल की नाही. मुलीच लग्न जुळेल की नाही. भविष्याच्या चिंतेने अनेकांना भिती वाटायला लागते. त्यामुळे भविष्याबद्दल चिंता करणे सोडून दयावे वर्तमानात जगावे. भविष्यात जे होईल ते होईल, पाहून घेवू मात्र वर्तमान खराब करायचे नाही. ही भूमिका ठेवून वागा म्हणजे भविष्याबाबत निर्माण होणारी भिती नाहिसी होईल.

 4. ज्या कामाची भिती वाटते ते काम पुन्हा पुन्हा करा:

   अनेकांना एखादया कामाची भिती वाटते म्हणून ते काम करणे सोडून देतात. परंतु त्यामुळे त्यांची भिती वाढत जाते. जसे एखादया व्यक्तीला फोन करायचा आहे. मात्र फोन करू की नाही याचाच विचार अनेक वेळा आपण करीत राहतो. तेंव्हा त्या व्यक्तीला एकदाचा फोन करून टाका. जे व्हायचे ते होईल. पण भितीपोटी फोनच केला नाही तर मात्र भिती वाढत जाते. ज्या कामाची भिती वाटते ते पुन्हा पुन्हा करा म्हणजे भिती निघून जाईल.

5. प्रेरणादायक पुस्तके वाचा:

   भितीने कुडकुडत बसण्यापेक्षा प्रेरणादायक पुस्तके वाचा त्यातून तुमची भिती नाहिसी होईल. पुस्तकांच्या माध्यमातून लोकांनी भितीवर कशी मात केली. जीवनामध्ये अपयश कसे पचविले आणि यशस्वी कसे झाले. याचे ज्ञान मिळेल आणि त्याचा वापर आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये करता येईल. उदा. बडी सोच का बडा जादू, यु कॅन विन, प्रकाशवाटा, चिंता छोडो जीवन जीओ इ.

 6. भितीदायक विचारांचा स्विकार करू नका:

   दिवसभरामध्ये 60,000 राहून अधिक विचार डोक्यात येत असतात. त्यामधील अनेक विचार भिती निर्माण करणारे असतात. त्या विचारांना कोणताही थारा देवू नका. त्यांना जर प्रतिसाद दिला तर मनामध्ये भिती वाढत जाईल. यासाठी विचारावर सतत नियंत्रण ठेवा भितीच्या विचारांना आनंददायक विचारामध्ये परावर्तीत करा.

 7. ध्येय निश्चित करा:

    ध्येय निश्चित केल्यामुळे व्यक्ती भरकटत जाते. त्याच्या डोक्यामध्ये अनेक विचार यायला लागतात आणि हे करू की ते करू यामध्येच तो अडकून पडतो आणि जीवनामध्ये काहीही करू शकत नाही. त्यामुळे जीवनाचे ध्येय निश्चित करा. आणि ते प्राप्त करण्यासाठी सतत काम करत रहा, कामाचे छोटे छोटे भाग करून ते प्राप्त केल्याने ध्येयापर्यंत लवकर पोचता येते. त्यामुळे फालतू विचार करायला वेळ मिळणार नाही. आणि त्यातून भिती वाढणार नाही. पुढील उदाहरणावरून तुमची भिती निश्चित नाहिसी होईल.

    जॉन नावाचा युवक होता. तो एका सॉफटवेअर कंपनीमध्ये सॉफटवेअर इंजिनियर होता. नोकरी चांगल्या पध्दतीने सुरू होती. घरासाठी बँकेकडून लोन घेतलेले होते. त्याचे EMI तो दरमहिण्याला फेडत होता. बायको प्रेग्नंट होती. अचानक कंपनीने आर्थिक काटकसर करण्यासाठी नोकर कपात केली. नोकर कपातीच्या यादीत जॉनचे नाव होते. नाव बघितल्यावर जॉनच्या पायाखालची वाळू सरकली. त्याला भिती वाटू लागली की आता माझे कसे होईल. बँकेचे हप्ते कसे भरू म्हणून तो चिंतातूर अवस्थेमध्ये घरी आला. त्याने सर्व हकिकत आपल्या बायकोला सांगितली. बायकोही परेशान झाली. तीने जॉनला विचारले आता काय करणार. नोकरी गेल्याच्या भितीने जॉन पुरता कोलमडून पडला होता. तेवढयात त्याने कारची चाबी घेतली आणि बाहेर निघाला रस्त्याने जात असतांना रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली आणि एका चहाच्या टपरीवर थांबला. 12 वर्षाचा मुलगा चहाची टपरी चालवित होता. त्याला चहा बनवायला सांगितला. त्याने चहा उकळायला टाकला. चहा उकळत असतांना अचानक जॉनच्या मागून एक बंदूक धारी गुंड आला आणि त्याने जॉनला हूल नको, गाडीची चाबी, मोबाईल दे म्हटले. जॉनने त्याला देवून टाकले. जॉनला वाटले आता सगळच गेल आहे त्यामुळे कोणताही प्रतिकार करता त्याने चाबी मोबाईल देवून टाकला. गुंड गाडीमध्ये बसला तसा मुलाने त्याला आवाज दिला आहो हे बाकी आहे. असे म्हटल्यावर त्या गुंडाने गाडीचा दरवाजा खोलला तसा त्या मुलाने त्या गुंडाच्या चेहऱ्यावर उकळता चहा फेकला. त्यामुळे त्या गुंडाचे तोंड पूर्णपणे भाजले. तो तसाच पडून राहिला. त्या मुलाने जोरजोरात आवाज करून लोकांना मदतीसाठी बोलावले लोक आले आणि त्यांनी त्या गुंडाला पोलिसांच्या हवाली केले.

     त्यानंतर त्या मुलाने जॉनला म्हटले, साहेब, तुमच्यासाठी पुन्हा चहा बनवतो. त्याने चहा बनवला जॉनला दिला. जॉनने विचारले तुला त्या गुंडाची भिती नाही वाटली का. तो मुलगा म्हणाला, साहेब मला कशाचीच भिती वाटत नाही. कारण मी लहानपणापासून या फुटपातवरच असतो. इथेच राहतो, इथेच झोपतो याची मला कधी भिती वाटली नाही आणि त्या गुंडाची काय भिती वाटेल. जॉनला कळून चुकले की बाहेर असे अनेक लोक आहेत त्यांच्याकडे काहीच नाही. तरी ते कशालाही घाबरत नाही. आपल्याकडे चांगले शिक्षण आहे. यावर आपल्याला कुठेतरी जॉब मिळेल या अपेक्षेने तो घरी परतला. दुसऱ्या दिवसी एका छोटया कंपनीमध्ये नोकरीसाठी अर्ज केला आणि त्याला पहिल्यापेक्षा कमी पगाराची नोकरी मिळाली. जॉनने ठरविले की, जोपर्यंत दुसरी नोकरी मिळत नाही तोपर्यंत ही नोकरी करायचे आणि दुसरी नोकरी शोधत रहायचे. एका छोटयामुलाच्या साध्या प्रेरणेतून जॉनची भिती (Fear) नाहीसी झाली.

Post a Comment

0 Comments