How
to
overcome
on
Anxiety?
चिंतेवर मात कशी कराल?
प्रत्येकाच्या जीवनात काहीना काही चिंता (Anxiety) असते. चिंतेशिवाय माणूस असू शकत नाही. चिंता ही काही प्रमाणात चांगली असते. व्यक्तीला स्वत: प्रगतीसाठी चिंता कधी चांगली ठरते तर कधी मारक ठरू शकते. उदया काय करायचे याची जर चिंता (Anxiety) असेल तर उदयाचे नियोजन करण्यासाठी चिंता आपल्याला मदत करत असते. विद्यार्थ्यांची परीक्षा महिण्यावर येवून ठेपल्यास विद्यार्थ्यांना अभ्यासाची चिंता निर्माण होते. त्यामुळे ते अभ्यासाला लागतात. आणिचांगल्या प्रकारे परीक्षेला सामोरे जातात. म्हणजेच चिंता (Anxiety) ही आपल्याला नियोजन करण्यासाठी, अलार्म ठरते. मात्र विनाकारण केलेली चिंता ही डोके दु:खी होउन बसते. विनाकारण चिंतेचे प्रमाण व्यक्तीमध्ये जास्त असल्याने चिंतेचा पॉझिटीव्ह वापर न होता निगेटिव्ह वापरच जास्त होतो. त्यामुळे अनेक व्यक्ती आजारी पडतात. त्यांचा बी.पी. वाढतो, त्यांना दवाखाण्यात भरती करावे लागते. अशी ही चिंता का निर्माण होते? चिंता करणे योग्य आहे का? चिंतेमुळे इतर आजार बळावतात का? चिंता सोडण्यासाठी काय करता येईल? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. हे प्रश्न कसे सोडवता येतील यावर टाकलेला प्रकाश.
चिंता (Anxiety) म्हणजे काय:
चिंतेला इंग्रजीमध्ये
Anxiety असे म्हटल्या जाते आणि त्याचा अर्थ भावनिक ताण असा होतो. विनाकारण एखादया गोष्टीची अनामिक परंतु निरंतर भिती म्हणजे चिंता होय. काल्पनिक गोष्टीमुळे व्यक्तीच्या मनामध्ये भिती निर्माण होते. कल्पनाचे मुख्य केंद्र हा मानवाचा मेंदू आहे. मेंदूमध्येच चिंता निर्माण होते आणि त्या चिंतेला व्यक्ती सतत प्रतिसाद देत असल्याने ती विक्राळ रूप धारण करते. अनेकांना काही तरी अघटित घडणार आहे, संकट कोसळणार आहे. आपल्यावर कोणीतरी पाळत ठेवत आहे, आपला फोन कोणीतरी टॅप करत आहे, कोणीतरी आपले फोटो इंटरनेटवर अपलोड करेल. अशा अनेक विचारांने व्यक्तीची चिंता वाढत असते. त्या विचारांना व्यक्ती जेवढया वेळेस प्रतिसाद देईल तेवढा तो मेंदूमध्ये घटट् होत जातो आणि त्याचा वाईट परिणाम शरीरावर व्हायला लागतो.
चिंतेमुळे (Anxiety) शरीरात काय बदल होतात:
अती चिंता ही वाईटच आहे. चिंतेमुळे हृदयाची धडधड वाढते. श्वासोच्छवास
घ्यायला अडचण निर्माण होते. शरीरामध्ये चमका निघायला लागतात. ब्लडप्रेशर वाढतो, सतत भिती वाटत राहते, झोप लागत नाहीे, काम करण्याची क्षमता कमी होते, अनावश्यक स्वप्न पडतात, यासारखे अनेक बदल शरीरात होतात. व्यक्तीने जर चिंतेचे योग्य नियोजन केले आणि अवास्तव विचारांना थारा दिला नाही तर चिंतेवर नियंत्रण प्रस्तापित करता येते. मात्र जर चिंतेवर नियंत्रण मिळविण्यास व्यक्ती अपयशी ठरला तर त्याला डॉक्टरकडे गेल्याशिवाय पर्याय नाही.
चिंतेवरील (Anxiety) उपाय:
अनेक व्यक्तींना चिंता वेळोवेळी सतावते. चिंतेमुळे झोप येत नाही. रात्रभर डोक्यात एकच विचार येतो आणि त्यामुळे भिती वाटायला लागते. चिंता ही बाहेरून लादल्या जात नाही तर ती मेंदूची काल्पनिक अवस्था आहे. त्यामुळे तीच्यावर विजय मिळविता येतो. त्यासाठी खालील उपायांचा वापर केला तर निश्चित चिंता दुर होवू शकते.
1. मेंदूवर नियंत्रण करायला शिका:
चिंतेवर विजय मिळविण्यासाठी मेंदूवर नियंत्रण मिळवायला शिकणे जास्त गरजेचे आहे. कोणत्याही चिंतेचे मुळ हे मेंदुमध्ये असते. मेंदूवर नियंत्रण मिळविले तर आपण चिंतेवर नियंत्रण मिळवू शकतो. त्यासाठी आपल्या डोक्यात सध्या कोणता विचार सुरू आहे. त्याचा विचार करावा आणि तो विचार जर होकारात्मक, आनंददायक असेल तर तो सुरू ठेवा आणि जर चिंता वाढवणारा असेल तर मेंदूला हा विचार थांबवण्याच्या सूचना दया. मेंदूला सूचना मिळाल्याबरोबर
तो चिंता वाढवणारा विचार थांबवतो. दररोज वाईट विचार आल्यास मेंदुला सूचना दया. हा प्रयोग तुम्ही काही दिवस केल्यास तुमच्या मेंदूला होकारात्मक, चांगला विचार करण्याची सवय लागेल आणि चिंतेवर नियंत्रण प्रस्तापित करता येईल.
2. चिंता (Anxiety) वाढवणाऱ्या विचारांना प्रतिसाद देणे थांबवा:
ज्याप्रमाणे भांडण होण्यासाठी सादाला प्रतिसाद मिळणे महत्त्वाचे असतेे. त्याचप्रमाणे चिंता वाढवण्यासाठी सादाला प्रतिसाद दिल्यामुळे चिंता वाढते. कोणताही चिंता वाढवणारा विचार डोक्यात आला तर त्याला प्रतिसाद देवू नका, म्हणजे त्यावर जास्त विचार करत न बसता. त्याऐवजी लगेच दुसरा चांगला विचार डोक्यात आणा म्हणजे तुम्हाला चिंतेवर नियंत्रण मिळविता येईल. उदा. एखादया व्यक्तीसोबत तुमचे ऑफिसमध्ये पटत नसेल आणि फावल्या वेळेत त्या व्यक्तीबद्दल विचार डोक्यात आला तर त्याला प्रतिसाद देवू नका.
3. इतरांसोबत चर्चा करा:
एखादया गोष्टीमुळे, विचारामुळे तुमची चिंता वाढत असेल तर जवळचा मित्र, मैत्रिन, आई - वडील, भाउ यांच्यासोबत त्याविषयावर चर्चा करा. त्यामुळे तुमचे मन हलके होईल आणि चिंता कमी होईल. पण जर तुम्ही कोणासीच या विषयावर बोलले नाही, चर्चा केली नाही तर चिंता डोक्यात जशीच्या तशी राहिल आणि ती वाढतच जाईल. यासाठी मोकळेपणाने इतरांसोबत चर्चा करा. चर्चेतून अनेक प्रश्न सुटू शकतात. अनेक आत्महत्त्या करणाऱ्या व्यक्तीनी आपली चिंता कोणासोबत बोलून दाखविली नाही, चर्चा केली नाही. त्यामुळे मनातल्या मनात घुसमट होवून ते आत्महत्त्या करण्यास प्रवृत्त झाले.
4. चिंता केल्याने फायदा होईल का:
एखादी चिंता तुमच्या डोक्यामध्ये घर करून बसते आणि नंतर ती तुम्हाला वेळोवेळी सतावत असते. अशी चिंता केल्याने जर फायदा होत असेल तर चिंता करा अन्यथा ज्याचा काहीही फायदा होत नाही अशी चिंता करणे सोडून दया. मेंदूचे मॅपिंग करायला शिकले पाहिजे मेंदूमध्ये येणारा विचार जर फायदयाचा असेल तर त्याला प्रतिसाद दयायचा मात्र त्याचा काहीही फायदा नसेल तर तो विचार करणे सोडून देणे आवश्यक आहे. नाहीतर विनाकारण ü तुमची चिंता वाढेल.
5. जीवनशैली बदला:
आपल्या दैनदिन जीवनशैलीमुळे आपल्याला चिंता सतावत असेल तर जीवनशैली बदलने आवश्यक आहे. दररोज योग्य आहार घ्या, सहा तासाची पुरेसी झोप घ्या, दररोज व्यायाम करा आणि स्वत: ला एखादया चांगल्या कामामध्ये गुंतवून घ्या. स्वत: च ऐवढे बिझी रहा की, मेंदूला फालतू विचार करायला वेळच देवू नका म्हणजे तुमची चिंता वाढण्याचा प्रश्नच नाही. जर आताच्या जीवनशैलीमुळे
चिंता वाढत असेल तर जीवनशैली बदलून पहा चांगला फरक पडेल.
6. मोठयाने हसायला शिका:
अनेक जण नेहमी गंभिर मुद्रेमध्ये असतात. ते कधी हसत नाहीत. आणि चेहऱ्यावर कधी हसू नसते. सतत तणावग्रस्त परिस्थितीमध्ये
जीवन जगत असतात. अश्या व्यक्तींनी जीवनात हास्याचा वापर करावा. हास्य हा अनेक शारीरिक व मानसिक रोगावर रामबाण उपाय ठरला आहे. हास्यामुळे अनेक आजार बरे होण्यास मदत होत आहे. म्हणून अनेक शहरामध्ये हास्यक्लॅब निर्माण झाले आहेत. त्यापैकी जवळचा एखादा हास्यक्लब जाईंन करा किंवा एखादा कॉमेडी शो बघा किंवा एखादया कॉमेडी मित्राला फोन करा. त्यामुळे चिंता दुर होण्यास मदत होईल.
7. मेडीटेशनचा वापर करा:
चिंता ही विचारातून निर्माण होते. त्यामुळे मेंदूवर नियंत्रण प्रस्तापित करणे गरजेचे आहे. मेडीटेशनच्या माध्यमातून मेंदूवर निंयत्रण निर्माण करता येईल. मेडीटेशनने Concentration वाढत असल्याने डोक्यामध्ये निर्माण होणाऱ्या अनेक विचारावर नियंत्रण मिळविता येते. त्यामुळे मेंदूचे वर्तन कळण्यास मदत होते. मेंदूच्या वर्तनावर आपण नियंत्रण करू शकलो तर चिंता निर्माण होणार नाही. म्हणून चिंता सतावणाऱ्या व्यक्तींनी दररोज कमीत कमी 20 मिनिटे मेडीटेशन करावे.
8. शांत, आनंददायक गाणे ऐका:
गाण्यांनी अनेकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला आहे. अनेक लोक मनाला शांती मिळावी म्हणून गाणे ऐकतात. गाण्यामुळे मनावरचा ताणही कमी होतो. आणि चिंतेच्या विश्वातून व्यक्ती काल्पनिक विश्वात विहार करू लागतो. त्यामुळे ज्या ज्या वेळी चिंता सतावत आहे असे वाटते त्या त्या वेळी शांत, आनंददायक गाणे ऐका त्यामुळे चिंता नाहीसी होण्यास मदत होईल.
9. हिप्नोथेरपीचा वापर करा:
हिप्नोथेरपी ही एक चांगली थेरपी असून ती व्यक्तीला चिंतेकडून आनंदाकडे घेवून जाते. हिप्नोथेरपीमध्ये ॲटोसजेशनला महत्त्वाचे स्थान आहे. दररोज ॲटोसजेशन घेतल्याने चिंतेवर नियंत्रण मिळविता येईल. उदा. मी नेहमी सकारात्मक विचार करेन, मला फालतू विचार करायचा नाही. मी नेहमी आनंददायक विचार करणार आहे. अशा प्रकारच्या ॲटोसजेशनने चिंतेवर नियंत्रण निर्माण करता येईल.
10. साहचर्याचा नियम वापरा:
एखादया व्यक्तीची किंवा प्रसंगाची आठवण झाल्यास मनावरचा ताण वाढतो. आणि अनावश्यक भिती वाटायला लागते. अशावेळी साहचर्याचा नियम उपयोगी ठरू शकतो. ज्या व्यक्तीमुळे तुमचा ताण वाढतो त्या व्यक्तीचा विचार डोक्यात आल्यानंतर लगेच गुलाबाचे फुल आठवा. गुलाबाचे फुल आपल्याला प्रिय असल्याने आपले लक्ष डायव्हर्ट होण्यास मदत होईल. आणि त्या व्यक्तीबद्दल
निर्माण होणारी चिंता नष्ट होईल.
अशा प्रकारच्या अनेक बाबींचा वापर करून आपण चिंतेवर विजय मिळवू शकतो. कोणत्याही गोष्टीची चिंता (Anxiety) केल्यापेक्षा त्यावर चिंतन केल्यास प्रश्न सुटतात. त्यामुळे चिंता (Anxiety) करत बसल्यापेक्षा एकतर चिंतन करा अन्यथा फालतू विषयावर विचार करणे सोडून दया.
0 Comments