मुकेश अंबानीचे जगातील पाचवा श्रीमंत व्यक्ती बनण्यामागील रहस्य


मुकेश अंबानीचे जगातील पाचवा

श्रीमंत व्यक्ती बनण्यामागील रहस्य

    फोर्ब्स मासिकाने नुकतीच जगातील दहा श्रीमंत लोकांची यादी जाहिर केली त्यामध्ये रिलायंन्स जिओचे मुकेश अंबानी  (Mukesh Ambani) पाचव्या स्थानावर आहेत. मुकेश अंबानीची जगातील पाचवे श्रीमंत व्यक्ती म्हणून नोंद झाली. त्यानंतर रिलायन्स सेअरची किंमत लगेच वधारली असून ती रू. 2010 ऐवढी झाली आहे. त्यानुसार मुकेश अंबानीची एकुण संपत्ती 75 अरब डॉलर झाली आहे. फोर्ब्स मासिकाच्या यादीमध्ये पहिल्या चार व्यक्तीमध्ये ॲमेझानचे जेफ बेजोस पहिल्या क्रमांकावर असून त्यांची संपत्ती 185.8 अरब डॉलर आहे. दुसऱ्या स्थानावर मायक्रोसॉफटचे बिल गेट्स आहे त्यांची संपती 113.1 अरब डॉलर आहे. तिसऱ्या स्थानावर कॉग्लोमेरटचे बर्नाड अर्नोट परिवार असून त्यांची एकुण संपत्ती 112 अरब डॉलर आहे. आणि चौथ्या स्थानावर फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग आहे त्यांची संपत्ती 89 अरब डॉलर आहे.

मुकेश अंबानीने आशियातील नंबर एक आणि जगातील पाचवा श्रीमंत व्यक्ती म्हणून नंबर पटकावला आहे. कोरोना महामारीच्या काळातही मुकेश अंबानी ऐवढे श्रीमंत कसे झाले याबाबतीत त्यांनी एका कार्यक्रमात श्रीमंत होण्याचे रहस्य उलगडले. त्यांच्या अनुभवाचा फायदा घेवून अनेकांना श्रीमंत होण्याची प्रेरणा मिळू शकते. ते रहस्य पुढीलप्रमाणे:

 1. पैसा काही सर्व नाही मात्र गरजेचा आहे:

   मुकेश अंबानीची (Mukesh Ambani) कंपनी रिलायंन्स ही शुन्यातून निर्माण झालेली आहे. ही कंपनी मुकेश अंबानीचे वडील धिरूभाई अंबानी यांनी सुरू केली होती. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे ही कंपनी यशाच्या शिखरावर जावून पोचली. यापाठीमागे धिरूभाई अंबानीचा मोठा विचार आणि कृती होती. त्याच विचाराचे अनुकरण मुकेश अंबानी करीत आहेत. धिरूभाई जेंव्हा जिंवत होते तेंव्हा मुकेश अंबानी एक मुलगा म्हणून नव्हे तर एक विद्यार्थी म्हणून धिरूभाईकडून धडे घेत राहीले.  मुकेश अंबानी आपल्या वडीलांच्या प्रत्येक मिटींगला हजर रहायचे आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी जाणीवपूर्वक करायचे. धिरूभाई नेहमी म्हणत पैसा सर्वकाही नाही पण गरजेचा आहे. पैशाच्या पाठीमागे धावू नये मात्र आपण आपले काम करीत रहावे या सर्व गोष्टी मुकेश अंबानीने आपल्या वडीलांकडून शिकल्यामुळे ते ऐवढे मोठे रिलायंन्सचे विश्व निर्माण करू शकले.

 2. स्वप्न बघा आणि त्यांना पूर्ण करा:

  मुकेश अंबानी म्हणतात की पैशाच्यापाठीमागे धावने चुकीचे आहे. स्वप्न पाहणे आणि ते पूर्ण करण्यासाठी धडपडणे आवश्यक आहे. काही लोक केवळ स्वप्न पाहतात मात्र ते पूर्ण करण्यासाठी कोणतीही स्ट्रटजी तयार करत नाहीत. त्यामुळे ते मागे पडतात. यासाठी कोणतेही ध्येय ठरविले तर ते पूर्ण करण्यासाठी स्ट्रटजी तयार करा. स्ट्रटजी तयार केल्यानंतर पुढील रस्ता आपोआपच दिसतो. त्यातून पैसा मिळाल्यास तो वाईट नाही. त्यामुळे स्वप्न बघा आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या. यशापासून तुम्हाला कोणीही रोकणार नाही.

 3. तुमचे काम बोलायला हव:

   मुकेश अंबानी नेहमी मेडीयापासून दुर राहतात. त्यांच्यामते जेंव्हा तुमचे काम बोलत, त्यानंतर बाकीच्या सर्व गोष्टी शांत होतात. आणि तुम्ही इतरांसाठी हिरो बनता. जेंव्हा कंपनीच्या विकासाचे आकडे मजबूत असतात तेंव्हा कोणाच्याही सहाऱ्याची गरज नसते. चांगल काम केल्यामुळे रिलायंस कंपनी ही देशभरामध्ये नावारूपाला आली आहे. त्यामुळे जे काही काम तुम्ही करता ते प्रामाणिकपणे करा. म्हणजे जग तुमची दखल घेईल.

 4. स्वत: वर विश्वास ठेवा:       

   ज्यावेळेस मुकेश अंबानीने एंटिलीया नावाचे बहुमजली घर बांधले, टी 20 क्रिकेट टिममध्ये गुंतवणूक केली तेंव्हा त्यांच्यावर प्रचंड टिका झाली. अशा अवस्थेमध्ये त्यांनी स्वत: वर विश्वास ठेवून आपले काम सुरूच ठेवले. आणि विरोधकांना प्रतिक्रिया दिली नाही. कोणतेही काम करतांना स्वत: वर विश्वास ठेवा आणि दर्जेदार काम कसे होईल याकडे लक्ष दया.

  5. विश्वास सगळयावर करा मात्र कोणावरही अवलंबून राहू नका:

     मुकेश अंबानी सांगतात की सगळयावर विश्वास ठेवा मात्र कोणावरही अवलंबून राहू नका. स्वत: ला ऐवढे तयार करा की कोणतीही समस्या आली की त्याला तोंड देण्याची आणि त्यावर सोलुशन काढण्याची क्षमता निर्माण व्हायला हवी. सुरूवातीच्या काळामध्ये अनेक समस्यांना सामोरे जात असतांना मुकेश अंबानीने आपल्या मेहनतीने सर्व बारीकसारीक गोष्टी शिकून घेतल्या. मुकेश आपल्या अधिकाऱ्यावर विश्वास तर ठेवतात मात्र अडचणीच्या काळात स्वत: तयार राहतात. त्यामुळे आज रिलायंन्स कंपनी यशाच्या शिखरावर आहे.

 6. रिस्क घ्यायला शिका:

    जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी रिस्क घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. जे लोक जीवनात रिस्क घेत नाहित ते यशस्वी होवू शकत नाहीत. मुकेश अंबानीने रिलायंस उद्योगसमुहाला शिखरावर पोहचवण्यासाठी मोठी रिस्क घेतली. त्यामध्ये अनेक वेळा अपयशही आले पण अपयशाने खचून जाता त्यांनी त्यातून मार्ग काढला. कोणत्याही धंदयामध्ये पडण्याचा केवळ विचार करणाऱ्या लोकांपेक्षा रिस्क घेणारा व्यक्ती कधीही चांगला. रिस्क घेवून काम सुरू केल्यानंतर त्याला अपयश जरी आले तरी त्यातून त्याला शिकायला मिळेल आणि मागे घडलेल्या चुका तो पुन्हा करणार नाही.

 7. काम करण्याची प्रचंड इच्छा असावी:

     कोणत्याही उद्योगामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर व्यक्तीला काम करण्याची प्रचंड इच्छा असायला हवी. काम करण्याची भूक असावी आणि ती कायम असावी. जे लोक मधातून रस्ता सोडून माघार घेतात त्यांच्यासाठी यश नक्कीच नाही. स्विकारलेला मार्ग कितीही खडतर असला तरी त्यावरून चालत जावून आपल्या ध्येयापर्यंत पोचने आवश्यक आहे. जे लोक यामधून माघार घेतील ते यशस्वी होणार नाहीत. व्यक्तीने कामातील आपली उर्जा कायम ठेवली पाहिजे. कोणत्याही स्पर्धेमध्ये उतरल्यानंतर मधून पळ काढणे बरोबर नाही. ज्या ज्या वेळेस तुमच्या धंदयासाठी अनुकूलता मिळेल त्यावेळी आराम करा. मात्र संकट काळामध्ये जास्त मेहनत घ्या असे मुकेश अंबानी सांगतात.

 8. काळ आणि वेळेचा विचार नकरता काम सुरू करा:

    कोणताही धंदा, उद्योग सुरू करतांना आपले वय झाले, आपल्याकडे वेळ नाही असा विचार करत बसू नका. जर उद्योग सुरू करायचा असेल तर तो कोणत्याही वयामध्ये आणि कोणत्याही काळामध्ये सुरू करता येवू शकतो. ही शिकण्याची वेळ नाही असा विचार कधीच करू नका. एकदा काही काम सुरू केले की त्यातून फायदा कसा मिळेल यावर प्रत्येक क्षण खर्च करा. म्हणजे तोटा होण्याला वाव मिळणार नाही.

 9. गुणवत्तापूर्ण उत्पादनाची निर्मिती करा:

    कोणतेही काम करतांना त्यामध्ये क्वॉलिटी असायला हवी असे मुकेश अंबानी सांगतात. आजचा ग्राहक हा अतिशय हुशार असून तो दोन उत्पादनामध्ये तुलना करूनच खरेदी करीत असतो. त्यामुळे जर तुमच्या कामामध्ये, उत्पादनामध्ये गुणवत्ता असेल तर ग्राहक वस्तू विकत घेईल. आणि जर गुणवत्ता नसेल तर तुमच्या उत्पादनाकडे ग्राहक लक्ष देणार नाही. म्हणून जे काही करता त्यामध्ये गुणवत्ता निर्माण करा. कोणतेही काम करता केवळ खुर्चीत बसून रहाल तर अपयश निश्चित येणार.

10. नेहमी सतर्क रहा:

     मार्केटच्या चढउतारावर लक्ष असू दया. तुमच्या उत्पादनापेक्षा अनेक उत्पादने मार्केटमध्ये याअगोदर आलेली असतात. त्यामुळे त्यांच्या सोबत स्पर्धा करण्यासाठी उत्पादने चांगल्या पध्दतीने निर्माण करा. त्यासाठी स्वत: मध्ये कौशल्य विकसित करा. बाजाराचा मुड पाहून उत्पादने बाजारात विक्रीसाठी आणा. हे सर्व करतांना उत्पादने ही गुणवत्तापूर्ण असावी तरच ग्राहक तो स्विकारेल यावर विश्वास ठेवा. नेहमी ग्राहकाला आपण चांगल्यात चांगल कसे देवू याचा विचार करा. म्हणजे स्पर्धेमध्येही तुमचे उत्पादन टिकून राहिल.

     अशाप्रकारे वरील सर्व तंत्राचा वापर आपल्यालाही आपल्या कामामध्ये, उद्योगधंदयामध्ये वापरता येईल. आणि अपेक्षित असलेले ध्येय साध्य करता येईल. हे करतांना कोणत्याही कामामध्ये गुणवत्ता असणे गरजेचे आहे. मुकेश अंबानीने (Mukesh Ambani) आपल्या उद्योगधंदयातून लोकांना गुणवत्ता आणि विश्वास हया गोष्टी दाखवून दिल्यामुळे आज रिलायंन्स उद्योगसमूह शिखरावर पोहचलेला आहे.

Post a Comment

0 Comments