Will RSS Convert India into Hindurashtra? आर.एस.एस. भारताला हिंदूराष्ट्र बनवेल?Will RSS Convert India into Hindurashtra?

आर.एस.एस. भारताला हिंदूराष्ट्र बनवेल?

   RSS ची स्थापना 1925 मध्ये विजयादशमीच्या दिवसी डॉ. केशव बळीराम हेडगेवारने केली. संघाने सुरूवातीपासून भारतीय राष्ट्रवादा ऐवजी हिंदूराष्ट्रवाद या संकल्पनेवर भर दिला. संघासाठी हिंदूत्वाचा मुद्या भारतीय स्वातंत्र्यापेक्षाही मोठा होता आणि त्यानुसारच संघ कार्य करीत राहिला.

1948 महात्मा गांधींची नथुराम गोडसेने हत्त्या केली. नथुराम गोडसे हा संघाचा सदस्य असल्याचे कळल्यावर सरदार पटेल ज्यांचा गुजरातमध्ये भाजपा आणि संघाने मोठा पुतळा उभारला आहे. त्यांनी संघावर बंदी आनली. त्याकाळी संघाचे प्रमुख गोळवळकर सह 20,000 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आले.
  मात्र संघाने नथुराम हा संघाचा सदस्य असल्याचे झटकून टाकले. त्यामुळे अनेकांना वाटले की संघावरील बंदी उठेल पण तसे झाले नाही. नथुराम गोडसेचा भाउ गोपाळ गोडसेने स्पष्ट केले की आम्ही तिघे भाउ संघाचे सदस्य होतो आणि संघाच्या तालमितच वाढलेलो आहे. त्यामुळे संघाच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आणि सुमारे 6 महिण्यापर्यंत सावरकर, गोळवळकरसह इतर कार्यकर्त्यांना कोठडीत ठेवण्यात आले. गोळवळकरांनी सरदार पटेलांना संघावरी बंदी काढून टाकण्यासंदर्भात निवेदन केल्यानंतर भारतीय संविधान तिरंगा झेंडयाचा सन्मान करू असे लिहून घेतल्यानंतर संघावरील बंदी हटवण्यात आली. त्यांनतर संघ काही दिवस शांतच होता मात्र संघाच्या छुप्या कारवाया सुरूच होत्या. त्याचाच एक भाग म्हणून हिंदू मुस्लिम संघर्ष सतत पेटत ठेवून मुस्लिमांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणे. आणि हिंदूची मानसिकता मुस्लिम विरोधी बनविणे हे कार्य संघ करीत आला आहे. 2025 मध्ये संघाला 100 वर्षे पूर्ण होणार असल्याने शताब्दी वर्ष म्हणून संघ भारताला हिंदूराष्ट्र बनवणार असल्याचे त्यांचे अनेक लोक बोलून दाखवत आहे.

    हिंदूराष्ट्र हे गोळवळकर यांच्या संकल्पनेतून साकारलेले आहे. त्यांच्या बंच ऑफ थॉट्मध्ये हिंदूराष्ट्र निर्माण करण्यासाठी स्वयंसेवकांना दिशानिर्देश दिलेले आहेत ते पुढीलप्रमाणे:

1. अशोक चक्र असलेला तिरंगा झेंडा स्विकारता भगवा झेंडा स्विकारावा:

    संघाने स्थापनेपासून भगवा झेंडा हाच प्रतिक मानले असून. भारताचा अधिकृत अशोकचक्र असलेला तिरंगा त्यांना मान्य नाही. त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळून 50 वर्षे झाली तरी त्यांनी आपल्या हेडक्वार्टरवर तिरंगा झेंडा फडकवला नाही. त्यांच्यावर आता टिका होवू लागल्यामुळे आता ते तिरंगा झेंडा फडकवतांना दिसतात. मात्र त्यांचा अशोकचक्र असलेल्या तिरंगा झेंडयाला विरोधच आहे.

2. जमीनदारी छोटी राज्ये समाप्त करने चुकीचे:

   त्यांना या देशामध्ये केवळ धनिकांची आणि उच्चवर्णीयांची सत्ता प्रस्तापित करणे हा हेतू असल्याने सरकारने त्या काळामध्ये जमीनदारी आणि छोटी राज्ये समाप्त करणे ही सरकारची चुक होती असे गोळवळकर म्हणतात. कारण त्यातून उच्चवर्णीयांच्या हातातील सत्ता आणि संपत्ती समाप्त होण्यास मदत झाली.

3. लोकशाही भारतासाठी उचित नाही:

    गोळवळकर हे हिटलरचे समर्थक असल्याने त्यांना जर्मनीमधी हिटलरच्या एकतंत्री कारभाराप्रमाणे भारतामध्ये एकतंत्री सत्ता प्रस्तापित करायची आहे. त्यासाठी लोकशाही ही भारतासाठी योग्य नाही असे तेबँच ऑफ थॉट्समध्ये” म्हणतात.

4. समाजवाद ही विदेशी विचारधारा:

     समाजवादामुळे देशातील प्रत्येक घटकाला समानवागणूक दयावी लागते. आणि कायदयापुढे सर्वजन समान आहे. त्यामुळे कोणासोबतही भेदभाव करण्यास संविधानाने बंदी घातली आहे. त्यामुळे समाजवादी विचारधारा ही गोळवळकरांना मान्य नव्हती. हिंदूराष्ट्रामध्ये ती मान्य असणार नाही कारण इथल्या अल्पसंख्यांक, एस.सी, एस.टी आणि ओबीसी यांना दुय्यम नागरिक म्हणून रहावे लागेल.

5. भारतीय संविधान एक विषारी बिज:

    बँच ऑफ थॉट्समध्ये गोळवळकरने म्हटले आहे की, भारतीय संविधान एक विषारी बिज आहे. कारण संविधानाने हिंदू सुप्रमसी नष्ट केली आहे. त्याचबरोबर भारतीय संविधानातीलRight to equality, Right to Freedom, Right against exploitation, Right to freedom of religion, Right to education and cultural right, Right to constitutional remedies.” या घटकांमुळे मनुस्मृतिचा कायदा धोक्यात आला त्यामुळे संघ त्यांचे लोक आजही संविधानाला विरोध करतात आणि संविधान बदलण्याची भाषा करतात.

6. सर्व राज्य सरकारे आणि विधीमंडळे समाप्त करायला हवी:

     मुळात लोकशाही मान्य नसलेल्या गोळवळकरांना लोकतांत्रिकपणे कार्य करणारे राज्य सरकारे आणि विधिमंडळेही मान्य नाहीत. त्यांच्या मते, राज्यांमुळे केंद्राला वेळोवेळी आव्हान दिल्या जाते आणि त्यांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला कोणीही आव्हान देता कामा नये म्हणून सर्व राज्य सरकारे आणि विधीमंडळे समाप्त करायला हवी असे गोळवळकर बँच ऑफ थॉट्समध्ये म्हणतात.

7. भारताचा कारभार एकतंत्रशाही असावा:

    भारताने स्विकारलेली लोकशाही व्यवस्था गोळवळकर आणि संघाला मान्य नाही. त्यांना या देशामध्ये प्रस्तापितांची एकतंत्रशाही आणायची आहे. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून 73 वर्षे पूर्ण झाली असून देशाची सत्ता उच्चवर्णीयांच्या हातामध्ये आहे. तरी त्यांना ते मान्य नाही. त्यांना लोकशाही नष्ट करायची आहे आणि हुकूमशाही आणायची आहे.

8. मुस्लिम, ख्रिश्चन कम्युनिष्टांसोबत दुष्मणासारखा व्यवहार करावा:

     हिटलर हा त्यांचा आदर्श आहे. त्यामुळे गोळवळकर आणि संघ यांना एकतंत्रशाही प्रिय आहे. मुस्लिमाबाबत पराकोटीचा द्वेष त्यांच्या मनामध्ये आहे. ज्याप्रमाणे हिटलरने ज्युचा वंशोच्छेद केला होता तसा मुस्लिमांचा करावा हे स्वप्न ते उराशी बाळगून आहे. गोळवळकर आपल्या बँच ऑफ थॉट्समध्ये म्हणतात, मुस्लिम, ख्रिश्चन, कम्युनिष्ट या देशासाठी धोका असल्याने ते जोपर्यंत हिंदुत्व स्विकारीत नाही तोपर्यंत त्यांच्यासोबत दुष्मणासारखा व्यवहार करावा. या देशामध्ये त्यांना दुय्यम नागरिक म्हणून रहावे लागेल.

9. आरक्षण विरोधी प्रचार करणे:

     आरक्षणामुळे मागासलोकांना नौकऱ्या मिळाल्या आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत झाली आहे. त्यामुळे ते आता इतरांचे ऐकत नाही. म्हणून मागासलेले लोक नोकरीत येवू नये म्हणून आरक्षण विरोधी प्रचार करावा असे गोळवळकर म्हणतात. आणि तोच अजेंडा आज सत्तेत असलेली भाजप सरकार गिरवित आहे. सरकारी उद्योगांचे खाजगीकरण करून आरक्षण समाप्त करणे. याचा अर्थ त्यांना गोळवळकर प्रणीत हिंदूराष्ट्र प्रस्तापित करायचे आहे. त्यासाठी छुप्यापध्दतीने त्यांचे कार्यक्रम सुरू आहे.

10. देशात मंदिरांचे निर्माण करा:

     मंदिरांच्या माध्यमातून लोकांना दैववादी बनविने सोपे जाते. त्याचबरोबर त्यांच्या लोकांची दुकारणदारी सुरू होते. विज्ञान शिक्षणापेक्षा लोक देवावर जास्त विश्वास ठेवतात त्यामुळे त्यांच्यावर संघाचे विचार थोपवणे सोपे जात देशात अनेक ठिकाणी मंदिरांचे निर्माण करण्याचे गोळवळकरांनी सांगितले आहे. म्हणून तर मोदी सरकारने धर्मनिरपेक्ष असलेल्या देशाचे प्रमुख असतांना मंदिर निर्माण करण्याचेकार्य हाती घेतले आहे. आणि जगाला दाखवून दिले आहे की, आम्ही किती कटटर आणि दैववादी आहोत. देशातील लोक कोरोनाने मरायचे ते मरतील पण आम्ही दवाखाने उभारणार नाही तर मंदिरे बांधू हा सगळा विचार गोळवळकरांचा आहे आणि मोदी सरकार तो अंमलात आणत आहे.

11. शिक्षणाचे भगविकरण:

     गोळवळकरांच्या सांगण्यावरून शिक्षणाचे भगविकरण करण्याचे धोरण अनेक वर्षापासून सुरू आहे. शिक्षणामध्ये विषारी, द्वेषाची विचारसरणी असलेल्या लोकांचे विचार अभ्यासक्रमामध्ये घुसाडण्याचा प्रयत्न सर्रासपणे केला जातो. ज्या संघाचा देशाच्या स्वातंत्र्यामध्ये कवडीचाही सहभाग नव्हता त्यांचा अभ्यासक्रमात समावेश करून स्वातंत्र्यासाठी संघाने केलेले कार्य नविन पिढीच्या डोक्यात कोंबण्यात येत आहे.

  यासारखे अनेक विषारी विचार बँच ऑफ थॉट्समध्ये गोळवळकरांनी मांडलेले आहेत. आणि त्या विचारांची अंमलबजावणी मोदी सरकार तंतोतंत करीत आहे. त्यांना कोणत्याही हालतीत हिंदूत्वाच्या नावावर इथल्या लोकांना मुर्ख बनवून हिंदूराष्ट्र निर्माण करायचे आहे.

   रामजन्मभूमी आंदोलनाच्या सहाय्याने 2014 मध्ये केंद्रात भाजपचे सरकार स्थापन होवून नरेंद्र मोदीला प्रधानमंत्री बनवण्यात आले. हिंदूराष्ट्र हे संविधानाच्या आधारे निर्माण करणे सध्यातरी शक्य नाही म्हणून सामाजिक आर्थिक राजकीय स्तरावर हे कार्य सुरू आहे.

    भारतीय संविधाच्या पहिल्या अनुच्छेदामध्ये म्हटले आहे, India that is Bharat. कोणीही या देशाच नाव बदलू नये किंवा त्याबाबत कोणाच्याही मनामध्ये संदिग्धता राहू नये म्हणून हे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र संविधानातील याबाबीचा थोडाही विचार नकरता अनेक जन या देशाच नावच बदलायला निघालेत. म्हणतात की इंडिया म्हटले की गुलामीची आठवण होते. त्यामुळे देशाला गुलाम म्हणून दिलेल नाव आम्हाला मान्य नाही. त्यामुळे देशाच नाव बदलण्यासाठी अगदी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ती याचीका फेटाळली. काही जण देश हिंदूराष्ट्र बनवायला निघाले आहे. त्यापैकी आर.एस.एस. या संघटनेच्या अजेंडयावर भारताला हिंदूराष्ट्र बनवणे आहे. आणि त्यासाठी त्यांना अनुकूल वातावरणही निर्माण झाले आहे. सध्या देशात त्यांचेच सरकार आहे. आणि हिंदूराष्ट्र बनवण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. मात्र हिंदूराष्ट्र बनवण्यात त्यांना कोणता अडथळा येत आहे. देशाच्या राष्ट्रपती पासून ते गावच्या सरपंचा पर्यंत संघीय लोक सत्तेमध्ये आहेत. त्याचबरोबर प्रशासकीय व्यवस्थेमध्येही प्रत्येक उच्च पदावर त्यांचे लोक आहेत. त्यामुळे हिंदूराष्ट्र बनवणे त्यांना तेवढे अवघड नाही. तरीपण ते शांत कसे.

 RSS भारताला हिंदूराष्ट्र का करू शकत नाही?

     भारतीय संविधानाचा संपूर्ण गाभा हा धर्मनिरपेक्षतेचा आहे. संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये धर्मनिरपेक्ष या शब्दाचा वापर 42 व्या घटनादुरूस्तीने करण्यात आला आहे. कोणतीही संदिग्धता राहू नये म्हणून स्पष्ट करण्यात आले आहे की, हा देश धर्मनिरपेक्ष आहे. म्हणजे या देशाचा कोणताही अधिकृत धर्म नाही. सर्व धर्मांना इथे समान वागणूक दिल्या जाईल. त्यामुळे सरकारचा अधिकृत धर्म नसेल. या तरतुदीमुळे संघ भाजप यांना भारताला हिंदूराष्ट्र घोषित करता येत नाही. ते करणे म्हणजे भारतीय संविधानाच्या विरोधात भूमिका घेण्यासारखे आहे. त्यामुळे भारतीय संविधानच बदलण्याचे षडयंत्र त्यांनी सुरू केले आहे. त्यासाठी बहुमताच्या जोरावर CAA, NPR लागू करून संविधानाच्या समर्थकांची तोंडे बंद करण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकदा का CAA, NPR पूर्णपणे लागू झाले की, माइनॉरीटीझ, बॅकवर्ड क्लॉसचे लोक देशाचे नागरिक म्हणून स्वत:ला सिध्द करण्यासाठी गुंतले जातील त्यावेळी संविधान बदलून किंवा धर्मनिरपेक्षता शब्द काढून टाकणे देशाला हिंदूराष्ट्र बनवणे सोपे जाईल. त्यामुळे सर्व बहुजनांनी त्यांचे षडयंत्र हाणून पाडायला हवे, तरच लोकशाही जिवंत राहिल आणि इंडिया हा भारत राहिल.

Read Also:

Read Also:

Post a Comment

0 Comments