Sushamatai Andhare सुषमाताई अंधारेचा भरकटलेला प्रवास


Sushamatai Andhare

सुषमाताई अंधारेचा भरकटलेला प्रवास

     "भिमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते, तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते." या वामन दादांच्या गाण्याप्रमाणे आंबेडकरी चळवळ चालवणारे अनेक नेते आले आणि गेले पण त्यांच्यात स्वार्थापायी एकमत होवू शकले नाही. सुरूवातीला आक्रमकपणे फुले-शाहू-आंबेडकर सांगायचे. आणि एकदा प्रसिध्दी मिळाली की, कोणत्या एका पक्षाच्या (आंबेडकरी विचारांची फारकत असणाऱ्या) वळचणीला जावून बसायचे.
     असे अनेक नेत्यांनी केले याची जाणीव आंबेडकरी समाजाला होवू लागली आहे. प्रखर, आक्रमक डॉ. आंबेडकर सांगणाऱ्या सुषमा अंधारे आज कुठे दिसत नाहीत. त्यांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान विसरता येणार नाही. पण समाजाने प्रचंड विश्वास ठेवलेल्या व्यक्ती आपला मार्ग एकदम कसा बदलतात. त्याची कारणे काय? आणि ही परिस्थिती त्यांच्यावर का आली?

कोण आहेत सुषमा अंधारे?

     सुषमा दगडू अंधारे हया समाजशास्त्र, राज्यशास्त्र या विषयाच्या व्याख्याता, वकील, स्त्री अभ्यासक, विमुक्त भटक्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या, वक्त्या आणि लेखिका. सुषमा अंधारे यांचा जन्म उस्मानाबाद जिल्हयातील पाडोळी तालुक्यातील कळंब या गावी झाला. सुषमा अंधारे हया आपल्या नावासमोर आपल्या आजोबाचे नाव लावतात. आई कोल्हाटी समाजातील असल्याने दोनदा लग्न झालेल्या दत्ताराव गुत्ते या वंजारी समाजातील व्यक्तीसी लग्न केले. नंतर गुत्तेने सुषमाचा म्हणजे मुलीचा जन्म झाल्याने त्यांना नाकारले आणि तिसरा विवाह केला. तेंव्हा आजोबाने त्यांचा सांभाळ केला. शाळेत ॲडमिशन घेतांना पालक म्हणून आजोबांनी त्यांचे नाव सांगितले आणि त्यानुसार सुषमा दगडू अंधारे अशा नावाची कागदोपत्री नोंद झाली.

     सुषमा अंधारे यांचे शिक्षण पीएच. डी पर्यंत झालेले आहे. भटक्या विमुक्तांच्या हक्कांसाठी त्यांनी अनेक आंदोलने, मोर्चे काढलेले आहेत. 2 ऑक्टोबर 2006 ला भदंत नागार्जुन सुरई ससाई यांच्याकडून 42 भटक्या विमुक्त जातींच्या प्रतिनिधींना बरोबर घेवून बौध्द धम्माची दिक्षा घेतली.

सामाजिक योगदान:

     त्यांचे मुळ गाव परळी परंतु सामाजीक चळवळीमध्ये सक्रीय भाग घेता यावा म्हणून पुण्याला स्थाईक झाल्या. भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या त्या प्रदेश सरचिटणीस आहेत. त्या लक्ष्मण माने, बाळकृष्ण रेणके, यल्लप्पा वैदू यांच्या सोबत चळवळी करण्यात सक्रिय आहे. संपूर्ण भारत भर फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचा प्रचार प्रसार करीत असतात.

राजकीय कारकीर्द:

     2009 मध्ये त्यांनी परळी विधानसभा मतदार संघामधून अपक्ष उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाच्या पंकजा मुंडे यांना आव्हान दिले. या निवडणूकीत त्या पराभूत झाल्या.

     सुषमा अंधारे यांची राजकीय कारकीर्द वादग्रस्त ठरली. आंबेडकरी जनतेने त्यांना खुप प्रसिध्दी दिली. अक्षरशा: डोक्यावर घेतले. वाटले होते फुले-शाहू-आंबेडकरी चळवळ सांगणाऱ्या सुषमाताई महाराष्ट्रात राजकीय सामाजिक परिवर्तन घडवून आणतील पण आंबेडकरी चळवळीतील सामान्यांचे स्वप्न भंग झाले. अनेक वर्षापासून त्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर आक्रमकपणे टिका करीत आल्या आणि 2019 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी झाल्या.

     सुषमा अंधारेचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यामागे अनेक कारणे सांगितली जातात त्यापैकी काहींच्या मते, संघप्रणीत भाजप सरकार आल्यापासून भारतीय संविधानाला धोका निर्माण झाला आहे. भाजपा सांसद अनंत हेगडेने संविधान बदलण्यासाठी आम्ही सत्तेत आलो असे म्हटले, भाजपा सांसद साक्षी महाराज म्हणाले ही शेवटची निवडणूक असेल या नंतर निवडणूक होणार नाही. यामुळे अनेक लोक भयभित झाले त्यापैकी सुषमा अंधारे एक असाव्या. अनेक समविचारी चळवळी, पक्ष एकत्र येवून संघप्रणीत भाजप सरकारला रोखता येईल असे त्यांना वाटत असावे. म्हणून त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला असावा असे अनेक तज्ज्ञांना वाटते.

     सुषमा अंधारेनी राष्ट्रवादीच्या प्रचार सभेतून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्यामते, प्रस्तापित व्यवस्थेविरूध्द बोलले तर निखिल वागळेला अनेक टि.व्ही चॅनलवरून काढून टाकले, नरेंद्र दाभोळकरांनी व्यवस्थेविरूध्द आपले काम सुरू ठेवले म्हणून त्यांना गोळया घालण्यात आल्या, पानसरेंचे तेच झाले आणि गौरी लंकेशचा गोळया घालून खुन करण्यात आला. सतत सोशल मेडीयामधून ट्रोलींग आणि धमक्या यामुळे त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याचे म्हटले आहे.

     प्रश्न पडतो की, फुले-शाहू-आंबेडकरांची चळवळ सांगणाऱ्या सुषमा अंधारेंनी महात्मा फुलेचा संघर्ष तर वाचला असेलच फुलेंना प्रस्तापितांचा विरोध केल्यामुळे सामाजिक बहिस्कृत केल्या गेले. त्यांच्यावर प्राणघातक हल्ले केल्या गेले. परंतु म. फुल्यांनी प्रस्तापित व्यवस्थेविरूध्द काम थांबवले नाही. त्यांना त्यांचा लढा शेवटपर्यंत लढला. त्याच प्रकारे शाहू महाराजांना राजा असून शुद्रासारखी वागणूक दिल्या गेली. टिळकांसारख्या कट्टर व्यक्तीने केसरीतुन त्यांच्या विरोधात रकानेच्या रकाने लिहिले तरी त्यांनी त्यांचे कार्य थांबवले नाही. आपल्या संस्थानात मागासवर्गांना 50% आरक्षण दिले. डॉ. आबेंडकर त्यांच्या काळात तर समस्त व्यवस्थेविरूध्द एकटे लढले. अनेक धमक्या आणि जिवघेणे हल्ले त्यांच्यावर झाले परंतु बाबासाहेब कोणालाही घाबरले नाही आणि प्रस्तापित व्यवस्थेविरूध्द उभे राहिले. धरसोड वृत्ती ठेवता कायदयाने देशातील प्रस्तापितांना आव्हान दिले आणि संविधानाच्या माध्यमातून देशाचे सामाजिक स्ट्रक्चरच बदलून टाकले.

     आज तर पुरोगामी विचारांचे अनेक लोक आहेत. अनेक संघटना आणि कार्यकर्ते भारतातील कोणत्याही मागास जातीतील लोकांच्या पाठीमागे विचार करता उभे राहतात आणि त्यांना न्याय मिळवून देतात.

     ज्या लोकांचे सुषमाताई सध्या समर्थन करीत आहेत. त्यांनीच या देशातील समस्त मुळनिवासी लोकांवर ही परिस्थिती आणून ठेवली आहे. आजही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारमध्ये असतांना अनु. जाती/अनु. जमातीवरील अन्याय अत्याचार थांबले का?  अरविदं बनसोड आणि विराज जगताप यांच्यावरील अत्याचार ही ताजी उदाहरणे आहेत. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात आजही अशा अनेक घटणा घडतात पण आपल्यापर्यंत पोचत नाही. सुषमाताईच्या रूपाने वाघाची शेळू करून पांढऱ्या कपडयात हिंडवू नये म्हणजे झाले. 

Post a Comment

1 Comments