The Sabarimala Case


The Sabarimala Case

सबरीमला केस

     भारतीय समाज हा पुरूषसत्ताक असल्याने अनादी काळापासून इथे महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक देण्यात आली आहे. भारतीय माणसिकता निर्माण होण्यामागे अनेक धर्मग्रंथ आणि पुराणाचा समावेश होतो. त्यापैकी मनुस्मृति हा अमानवीय ग्रंथ असून त्यामध्ये स्त्री आणि शुद्र यांना अतिशय खालच्या दर्जाची वागणूक देण्याबाबत सांगण्यात आले आहे. आजही

कोणत्याही धर्मातील स्त्रीने जर मनुस्मृति वाचली तर ती जाळल्याशिवाय राहणार नाही. परंतु आजच्या स्त्रीचे अवांतर वाचन कमी आहे. (ज्या स्त्रीया वाचतात त्यांना अभिवादन) तीने आपल्याला आईवडील आणि समाजाकडून आलेल्या परंपरेत स्वत: ला ऐवढे गुंतवून घेतले आहे की, ती कोणत्याही परंपरा, रूढी यांची चिकित्सा करायला तयार नाही.
मनुस्मृति या अमानवीय ग्रंथातील स्त्रीयाबाबतीत काही श्लोक पुढीलप्रमाणे.

1. मुलगी, पत्नी, आई, युवती, म्हातारी स्त्री कोणत्याही स्वरूपात असो, स्त्री ही स्वतंत्र असता कामा नये. मुनस्मृति अध्याय-9 श्लोक - 2 पासून 6 पर्यंत.

2. पती पत्नीला सोडू शकतो, गहाण ठेवू शकतो, विकू शकतो, परंतु लग्न झाल्यानंतर स्त्रीला यापैकी कोणताही अधिकार नाही तीने केवळ पत्नी बनूनच रहावे. मुनस्मृति अध्याय-9 श्लोक -45

3. स्त्रीला संपत्तीमध्ये किवा तीने मिळविलेल्या मिळकतीत कोणताही अधिकार नाही. स्त्री ही दासी आहे. त्यामुळे तीला संपत्ती बाळगण्याचा अधिकार नाही. स्त्रीच्या संपत्तीचा मालक तीचा पती, पूत्र किंवा वडील आहे. मुनस्मृति अध्याय-9 श्लोक -416

4. ढोर, गवार, शुद्र, ये सब ताडन के अधिकारी म्हणजे महिला, शुद्र यांना ढोरासारखे मारू शकतो, मुनस्मृति अध्याय-8 श्लोक -299

5. असत्य ज्याप्रमाणे अपवित्र आहे. त्याचप्रमाणे स्त्रीया सूध्दा अपवित्र आहेत. स्त्रीयांना शिकण्याचा, शिकवण्याचा, वेदमंत्र बोलण्याचा उपनयन करण्याचा अधिकार नाही. मुनस्मृति अध्याय-9 श्लोक -18

6. स्त्री ही नरकाचे द्वार असल्याने ती यज्ञकार्य किंवा दैनदिन अग्निहोत्र करू शकत नाही. मुनस्मृति अध्याय-11 श्लोक -36,37

   यासारखे अनेक श्लोक आहेत याठीकाणी लिहायचे म्हटले तरी जागा पुरणार नाही. धर्मग्रंथ आणि पुरानांनी स्त्री आणि शुद्रांना ऐवढे अपवित्र, दरिद्री बनविले की, आजही पुरूषांच्या मनातील स्त्रीयांबद्दलचा द्वेष आणि अपवित्रता सतत दिसून येते. त्याचेच उदाहरण म्हणजे सबरीमला केस होय.

     केरळच्या घनदाट जंगलात वाघांसाठी अभयारण्य असून त्याच जंगलात लॉर्ड अयप्पाचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर फार जुने आहे. वर्षातील केवळ काहीच दिवसामध्ये या मंदिराला भेट देता येते. त्यामुळे हजारो भक्त लॉर्ड अयप्पाची पुजा करण्यासाठी रांगेत उभे राहतात. प्रत्येकाचा नंबर येण्यासाठी काही दिवस किंवा काही महिने लागू शकतात ऐवढी लंबी रांग असते. ज्या व्यक्तीला लॉर्ड अयप्पाची पुजा कृपादृष्टी प्राप्त करायची आहे त्याला एक व्रत करण्याची शपथ घ्यावी लागते. ते व्रत म्हणजे 41 दिवसाची तपश्चर्या त्याला ऋाथम असे म्हणतात. ऋाथम म्हणजे ब्रहम्‌चर्य या काळामध्ये व्यक्तीने केवळ दिवसातून एकदा जेवन करायचे आहे, ते शाकाहारी असावे. मासाहारी जेवण, दारू, शिगारेट आणि तामसी अन्न यांचा त्याग करावा. त्याने स्वत: चे अन्न स्वत: तयार करायचे आणि रोज मंदिराला भेट दयायची. याकाळामध्ये त्याने महिलेशी कोणतेही शारीरिक संबंध ठेवायचे नाही. आणि कोणत्याही महिलेसोबत सहवास करावयाचा नाही. येथील परंपरेनुसार मासिक पाळीच्या काळात (Menstruation period) व्यक्ती जर महिलेच्या सहवासात असेल तर त्याची ब्रहमचर्येची शपथ भंग होते. ब्रहम्‌चर्य भंग होवू नये म्हणून त्याने वेगळया खोलीमध्ये रहावे. त्याचप्रमाणे त्याने ड्रेस कोड बदलून काळी धोती नेसावी, डोक्यावर मुंडू आणि अनवाणी रहावे. याकाळामध्ये त्याने त्याचे केस आणि नखे कापायची नाही. 41 दिवसानंतर हे व्रत पूर्ण होते आणि त्याला मंदिरामध्ये प्रवेश मिळतो.

लॉड अयप्पा कोण आहे?

    प्राचीन रूढी, परंपरेनुसार लॉर्ड अयप्पा एक  ब्रहम्‌चारी देवता असून शिवा आणि विष्णू याच्या मोहिनी नावाच्या स्त्री कडून जन्माला आल्याचे म्हटले जाते. पंपा नदीच्या काठी राजा पंडालम याना एक छोटा अनाथ मुलगा मिळाला. त्याच्या गळयामध्ये मनी बांधलेला होता. राजाने त्याला दत्तक घेतले आणि त्याचे नाव मनिकंदन ठेवले. मनिकंदन मोठा झाल्यानंतर त्याच्या सांगण्यावरून राजाने केरळच्या जंगलात मोठे मंदिर उभारले. मनिकंदनने 41 दिवसाचा ऋाथम पूर्ण करून तो त्या मंदिरात राहू लागला आणि अशाप्रकारे तो लॉड अयप्पा म्हणून ओळखल्या जावू लागला.

   अयप्पा हा ब्रहमचारी होता आणि वय 10 ते 50 या वयोगटातील महिलांच्या संपर्कात आल्यास त्याचे ब्रहमचर्य नष्ट होईल. वय 10 ते 50 वर्षे वयोगटातील महिला या काळात Menstruation period मध्ये असतात. हा काळ अपवित्रतेचा असल्याचे अयप्पाच्या ट्रस्ट आणि भक्तांचे म्हणणे आहे. यामुळे महिलांना अयप्पाच्या मंदिरात प्रवेश निषिध्द करण्यात आला होता.

सुप्रिम कोर्टात केस दाखल:

    2006 मध्ये यंग इंडियन लॉयर असोसियशन आणि काही विरूध्द केरळा राज्य आणि काही. यंग इंडिया असोसियशनच्या काही महिला वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. की 10 ते 50 वर्षे वयोगटातील महिलांना मासिक पाळीमुळे (Menstruation Period) प्रवेश नाकारणे म्हणजे अनुच्छेद 14- समानतेचा मुलभूत हक्क 25(1) - धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क 25(2) - सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारणे या मुलभूत अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचे याचिकेत म्हटले होते. या केसची टप्प्या टप्प्याने सुनावणी होवून सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये महिलांच्या बाजूने ऐतिहासिक निर्णय दिला.

   या जजमेंटमध्ये पाच न्यायाधिशांचे पीठ होते त्यामध्ये जस्टीस दिपक मिश्रा, जस्टीस खानविलकर, जस्टीस नरीमन, जस्टीस चंद्रचुड यांनी पिटीशनरच्या बाजूने म्हणजे महिलांना मंदिरात प्रवेश देण्यात यावा या बाजूने निर्णय दिला तर जस्टीस इंदू मलहोत्रा यांनी विरोधी भूमिका घेतली.

  या निर्णयामध्ये म्हटले होते की, सर्व वयोगटातील महिला मंदिरात प्रवेश करू शकतात. महिलांना मंदिर प्रवेश नाकारणे म्हणजे लैंगिक भेदभाव आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल की केरला हिंदू प्लेसेज ऑफ पब्लिक वर्शिप रूल्स 1965 मधील कलमान्वये हिंदू महिलांचे धार्मिक अधिकार मर्यादित केले होते.

  मंदिरात प्रवेश नाकारल्याने हिंदू महिलांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन झाले आहे. लिंग शारीरिक घटकाच्या आधारावर कोणालाही भेदभाव करता येणार नाही. जस्टीस चंद्रचुड यानी Constitutional morality स्पष्ट करतांना म्हटले की, समता, स्वातंत्र्य आणि न्याय हा Constitutional morality चा भाग असून त्याचे कोणालाही उल्लंघन करता येणार नाही. पवित्रता आणि अपवित्रता हा Untouchability चा भाग असून तो अनुच्छेद 17 चे उल्लंघन करतो. त्यामुळे महिलांना मंदिर प्रवेशापासून कोणीही रोकू शकत नाही.

   2006 पासून सुरू झालेली केस 2018 मध्ये संपली. या केस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. या निकालाने पुन्हा एकदा मनुस्मृतिला चपराक मिळाली. महिलांवर मनुस्मृतिने जी बंधने लादली होती त्यापासून महिलांची सुटका झाली. जात, धर्म, पंथ, लिंग, जन्माचे ठिकाण यावरून कोणालाही भेदभाव करता येणार नाही. असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

संदर्भ: फ्रॉम ट्रेंनचेस - ॲङ अभिशेख सिंघवी.

Also read: Keshwanand Bharti case

Post a Comment

1 Comments