Time Management वेळेचे नियोजन

Time Management वेळेचे नियोजन

     जीवनामध्ये वेळेला खुप महत्त्व आहे. प्रत्येकासाठी प्रत्येक दिवस सारखाच वेळ घेवून येतो. मात्र त्यावळेचा सदुपयोग कोण कसा करतो यावर त्याचे यश आणि अपयश अवलंबून असते. वर्ल्ड बॅकेने माणसाचे सरासरी आयुष्य हे 78 वर्षे पकडून संशोधन केले तेंव्हा कळाले की प्रत्येक व्यक्तीकडे 9 वर्षे 6 महिने शिल्लक राहतात. कारण वयाची 29 वर्षे ही झोपण्यात जातात. 15 ते 20 वर्षे रोजगारामध्ये जातात. 8 ते 9 वर्षे हे मनोरंजनामध्ये जातात. 10 ते 12 वर्षे हे दैनदिन कामामध्ये जातात. जसे घर काम, जेवन, बाजार, फिरने इ. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीकडे उरतात जवळपास 9 ते 10 वर्षे. आणि या वर्षामध्ये व्यक्तीला स्वत: ला सिध्द करावे लागते. जे लोक याचा परिणामकारक वापर करतात ते यशस्वी होतात. आणि जे हा वेळ फालतू गोष्टीमध्ये खर्च करतात ते स्वत: ला सिध्द करू शकत नाही. आणि अपेक्षित ध्येय प्राप्त करू शकत नाही. त्यामुळे वेळेच महत्त्व समजून आपण पुढील गोष्टी केल्या तर कमी वेळेमध्ये अपेक्षित ध्येय गाठता येते.

1. सगळयात महत्त्वाचे काम सर्वप्रथम करा:

     सगळयात महत्त्वाचे काम कोणते हे व्यक्तीला कळणे गरजेचे आहे. जर तेच कळले नाही तर व्यक्ती भरकटत जातो. अनावश्यक कामाला वेळ दिल्यामुळे महत्त्वाचे काम पूर्ण करू शकत नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे वेळ हातातुन निघून जातो.

     यासाठी कोणते काम सर्वात महत्त्वाचे आहे. ते अगोदर ठरवा आणि आपला जास्तीत जास्त वेळ त्यामध्ये घालवा. ते काम संपल्यानंतर इतर कामे करा. नाहीतर वेळ निघून जाईल आणि एकही काम पूर्ण होणार नाही.

2. प्रवासाच्या वेळेचा सदुपयोग करा:

 बऱ्याच वेळा व्यक्तीला प्रवास करावा लागतो. प्रवास करताना खुप वेळ वाया जातो. अशा अवस्थेमध्ये प्रवासातील वेळ वाया घालवता एखादे चांगले पुस्तक वाचा. इंटरनेटवर अनेक ऑडीयोबुक उपलब्ध आहेत. ते ऐका. म्हणजे पुस्तकातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. आणि वेळेचा सदुपयोग होईल.

3. दुसऱ्यावर काम सोपवायला शिका:

   अनेक व्यक्ती सगळी कामे स्वत: करीत राहतात. त्यामुळे ते त्या कामामध्येच गुंतून पडतात. त्यांना नवीन काम सुरू करता येत नाही. वेळेच्या अभावामुळे एकच व्यक्ती सगळी कामे पुर्ण करू शकनार नाही. त्यासाठी दुसऱ्यावर काम सोपवायला शिका. श्रीमंत लोक कोणत्याही एकाच कामात अडकून पडत नाही. एखादे काम मिळाले की त्यावर थोडा वेळ खर्च करतात आणि नंतर ते दुसऱ्यावर सोपवून नवीन काम हाती घेतात. त्यामुळे त्यांना कमी वेळेत जास्त काम करता येते.

4. पॅरेटोच्या सिध्दांताचा वापर करा:

     पॅरेटोने त्याच्या 80% / 20% रूल या पुस्तकात काही नियम सांगितले आहेत. आपल 80% यश हे आपण केलेल्या 20% कामापासून मिळत असते.  आपण जर त्या 20% कामावर लक्ष केंद्रित केल तर कमी काम करून आपण जास्त परतावा मिळवू शकतो. उदा. आपल्या सर्व मित्रापैकी फक्त 20% मित्र आपल्याला 80% आनंद देतात. या सिध्दांतानुसार सर्व जागी जास्त मेहनत करण्यापेक्षा असे क्षेत्र निवडा जिथे कमी काम करून जास्त परिणाम मिळवू शकता. म्हणजे तुमच्या वेळेची बचत होईल.

5. आपला प्राईम टाईम ओळखुन काम करा:

 आपण टी.व्ही वर बघतो संध्याकाळी 9 वाजता अनेक टी.व्ही वर प्राईन टाईम असतो. या कार्यक्रमादरम्यान ज्या Adverties दिल्या जातात त्यांची किंमत लाखो रूपये असते. ऐवढे महत्त्व टी.व्ही. वरील 9 च्या प्राईम टाईमला आहे. तेंव्हा स्वत: चा प्राईम टाईम ओळखा आणि त्यासाठी काम करा.

6. कोणालाही बिना Appointment चे भेटू नका:

     प्रत्येक जण, प्रत्येक वेळी फ्रि असतोच असे नाही. त्यामुळे कोणालाही भेटायला जातांना त्याची Appointment घेवून भेटायला जा. जर तसे केले नाही तर तुम्ही ज्या व्यक्तीला विचारता भेटायला गेले एक तर तो कामात गुंतलेला असेल नाहीतर तो बाहेर असेल. ज्यावेळेस तुम्ही त्याला भेटायला जाल आणि तो भेटला नाही तर तुमचा वेळ फुकटचा वाया जाईल.

7. आजारामुळे वेळ बर्बाद होतो:

     वेळ वाया जाण्याचे सगळयात मोठे कारण म्हणजे आजार होय. जर तुम्ही आजारी पडले तर तुमचा जास्त वेळ वाया जातो. कारण कोणत्याही आजारातून बरे होण्यासाठी साधारणता: 2 ते 3 दिवस तरी लागतात. काहींना जास्त लागतात. त्यामुळे आपण आजारी पडणार नाही यासाठी रोज आवश्यकतेनुसार व्यायाम करा.

8. मुड कसाही असो योजना आणि लक्ष यांच्या सोबत चाला:

     अनेक जण म्हणतात आज मुड ठिक नाही. हे काम करतांना मुड लागत नाही. मुडनुसार वागाल तर कधीच यशस्वी होवू शकणार नाही. यशस्वी होण्यासाठी मुड कसाही असो आपले लक्ष आणि ते मिळवण्यासाठी तयार केलेली योजना यांच्या सोबत चाला.

     वरील सर्व तंत्रांचा वापर जीवनात केला तर तुमची क्रयशक्ती वाढू शकते. आणि तुम्हाला वेळेचे नियोजन करने सोपे जावू शकते.

Read also: Failure to Success अपयशाकडून - यशाकडे

Post a Comment

0 Comments