Transgender The truth not accepted by Indian Society भारतीय समाजाने न स्विकारलेल सत्य
The truth not accepted by Indian Society

भारतीय समाजाने स्विकारलेल सत्य

        भारतीय समाज ऐवढा पारंपारीक आहे की 21 व्या शतकातही तो बदलायला तयार नाही. देशात अनेक वंचित, शोषित, पिडीत घटक आहे मात्र आजही त्यांना सामावून घ्यायला हा समाज प्रगल्भ झालेला नाही.

आम्ही स्वत: ला कितीही आधुनिक समजत असलो तरीही आम्ही कोल्हाटी, वेश्या, हिजडे (Transgender) याना अजूनही माणसे म्हणून स्विकारायला तयार नाही. समाजाचा ते एक भाग आहेत आणि समाजाने त्यांना जसे आहे तस स्विकाराव ही भाबडी आशा या वंचित वर्गाची असते मात्र त्यांना आम्ही स्विकारण्यास मानसिकदृष्या सक्षम झालो नाही.
     असाच एक वंचित घटक  ज्याच्यावर हजारो वर्षापासून अन्याय झाला आणि त्यांना समाजाने नेहमीच दुर लोटले तो म्हणजे लेस्बियन यालाच हिजडा, गे, ट्रॉन्सजेंडर (Gay,Transgender) म्हणून ओखळले जाते. युरोपियन लोकांनी त्यांना स्विकारून प्रगल्भतेच उदाहरण प्रस्तुत केले. मात्र भारतीय धर्म, सामाजिक रूढी, परंपरा अजूनही समलैंगिक संबंधाना पाप मानतात आणि त्यातून लेस्बियन व्यक्तीसोबत भेदभाव करतात, त्याना गुन्हेगार ठरवून त्यांचा छळ करतात.

     युरोपियन देशामध्ये समलैंगिकता (Transgender) जिवनाचा भाग मानल्या जातो आणि लेस्बियन हे सुध्दा सन्मानाचे हकदार आहेत आणि त्यांचा सन्मान केल्या पाहिजे असे युरोपियन लोक मानतात. जगातील जवळपास 60% देशामध्ये समलैंगिकतेला (Transgender) कायदेशिर मान्यता मिळाली आहे. उत्तर आणि दक्षिण अमेरिका, युरोप, दक्षिण आफ्रिका आणि न्युजीलँड यासारख्या देशामध्ये विषमलैंगिक जोडयाप्रमाणेच समलैंगिक लोक सुध्दा विवाह करू शकतात. मात्र काही देशामध्ये समलैंगिकता हा गुन्हा मानला जातो आणि त्याबद्दल तुरूंगामध्ये सुध्दा जावे लागते.

भारतातील कायदा कलम - 377:

    समलैंगिक संबंध (Transgender) हा कायदयाने गुन्हा ठरवणार IPC मधील कलम 377 हे सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविले. लॉर्ड मॅकालेने इंडियन पिनल कोड (IPC) 1861 मध्ये तयार केला. आणि 1862 मध्ये से. 377 चा समावेश करण्यात आला. या कलमांनुसार अनैसर्गिक संबंधांना गुन्हा म्हणून ठरविण्यात आले. स्त्री किंवा पुरूषाने परस्पराच्या संमतीने समलैंगिक सबंध ठेवणे हा गुन्हा ठरविण्यात आला आणि त्यानुसार त्यासाठी 10 वर्षाचा कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतुद करण्यात आली. प्राण्यांसोबत ठेवलेल्या लैंगिक संबंधाबद्दल जन्मठेप किंवा 10 वर्षाची शिक्षा होवू शकते. दोन पुरूष आणि दोन महिला यांच्यामधील लैंगिक संबंध कायदयाने गन्हा ठरविलेला आहे. या कायदयानुसार गुन्हेगाराला वारंटाशिवाय अटक करण्याची तरतुद आहे. संशयाच्या आधारे पोलिस आरोपिला अटक करू शकतात. से. 377 हा अजामिनपात्र गुन्हा आहे.

     या कायदयाच्या विरोधात 2004 पासून ते 2017 पर्यंत अनेक उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या मात्र न्यायालयाने त्या फेटाळल्या. त्यानंतर 2018 मधील याचिकेवर पनर्रविचार करून 6 सप्टेंबर 2018 ला सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक (Transgender) लोकांबाबत निर्णय दिला की IPC मधिल से. 377 हे बेकायदेशिर असून समवैयस्कांसोबत समलैंगिक यौन संबंध ठेवणे यापुढे कोणताही अपराध मानल्या जाणार नाही असे स्पट केले. त्यामुळे विषमतेने भरलेले आणि समाजातील एका घटकावर अन्याय करणारे से. 377 अखेरीस रद्द करण्यात आले. भारतामध्ये याअगोदर समलैंगिकांच्या (Transgender) सुरक्षेसाठी कोणताही कायदा अस्तित्वात नव्हता. आणि अन्याय झाल्यास पोलिसांकडे गेल तर पोलिस गन्हा नोंदवून घेता हाकलून दयायचे.

     जगातील अनेक देशामध्ये समलैंगिक लोक (Transgender) आहेत. त्याला भारत अपवाद नव्हता. भारतामध्ये खुप मोठा समुदाय हा समलैंगिक आहे. मात्र प्रस्तापित व्यवस्थेने हा भारतीय संस्कृतीचा भाग नाही असे म्हणून त्यांना दुर लोटले. वास्तविक अनेक भारतीय ग्रंथामध्ये समलैंगिकतेचा संदर्भ आलेला दिसतो. त्यामध्ये कामसुत्रामधील संपूर्ण अध्याय हा ओरल सेक्सवर आधारीत आहे. त्यामध्ये दोन पुरूषांमध्ये ओरल सेक्स चा उल्लेख आहे. त्याचबरोबर दोन महिलांमध्येही समलैंगिक संबंधाचे वर्णन करण्यात आले आहे.

     खजुराहो लेण्या आणि हिंदू मदिंरातील चित्रे बोलकी आहेत. या चित्रामध्ये महिला - महिला सोबत ओरल सेक्स करतांना आणि पुरूष - पुरूषांसोबत सेक्स करतांना दर्शविण्यात आले आहे. त्यामुळे प्राचीन सभ्यता आणि संस्कृतीचा तो भाग होता. मात्र नंतरच्या काळात संस्कृती बदलली आणि लोकांनी समलैंगिक (Transgender) संबंध हे बेकायदेशिर ठरवले. लोक संस्कृती निर्माण करतात आणि लोकच ती बदलतात. त्यामुळे कायदयाची कडक अंमलबजावणी करून समलैंगिक लोकावर होणारे हल्ले आता थांबवता येतील. आणि समाजामध्ये त्याना मिळणारी विषमतामुलक वागणूक नष्ट होईल. इथून पुढे समाजामध्ये त्यांचा मानसन्मान होईल अशी अपेक्षा करूया.

Please share, you also like:

1. Unlimited midnight struggle

Post a Comment

1 Comments