UGC FINAL YEAR EXAMINATION DECISION 2020 युजिसीचा परीक्षेबाबतचा निर्णय


UGC FINAL YEAR EXAMINATION

DECISION 2020 युजिसीचा परीक्षेबाबतचा निर्णय

       विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) विद्यापीठ परीक्षा आणि ॲकडमिक सत्राबाबत रिवाईज मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. UGC च्या या निर्णयाची माहिती केंद्रिय मानव संसाधन मंत्री डॉ. रमेश पोखरीयाल यांनी काल दि. 06/07/2020 ला सायंकाळी दिली. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये पुन्हा गोंधळाची स्थिती निर्माण झाली. परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाला नुकतीच गृहमंत्रालयाने परवानगी दिली.

     UGC च्या नवीन गाईडलाईननुसार सर्व विद्यापीठांना ग्रॅज्युएशन आणि पोस्टग्रॅज्युएशनच्या सेवटच्या सत्राच्या परीक्षा हया सप्टेंबर 2020 च्या शेवटपर्यंत घेणे आवश्यक आहे. मात्र कोरोणा पासून वाचण्यासाठी स्वास्थ्य मंत्रालयाने सूचित केलेल्या गाईडलाईन्सचे पालन करणे गरजेचे आहे.
केंद्रिय मानव संसाधन मंत्री डॉ. रमेश पोखरीयाल ने म्हटले की UGC ने याअगोदर दिलेल्या परीक्षेबाबतच्या गाईडलॉईंन्स परत रिवाईज केल्या आहेत. UGC ने नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीचा सल्ला घेवून विद्यार्थ्यांची सुरक्षा, प्लेसमेंट आणि करीयर यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. UGC ने प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की, एप्रिल 2020 चे कोरोणा संकट पाहून अंतिम परीक्षा ॲकडेमिक वर्ष निश्चित करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने 29 एप्रिल 2020 मध्ये सुचवलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार विद्यापीठाच्या परीक्षा आणि ॲकडेमिक कॅलेंडर निश्चित करण्यात आले आहे.  UGC मार्फत या समितीला त्यांनी एप्रिलमध्ये सूचविलेल्या मार्गदर्शक सूचनांचा पुन्हा आढावा घेवून पुनर्रविलोकन करण्यास सांगितले होते. या समितीने आपल्या मागील अहवालाचे पुनर्रपरीक्षण करून 6 जूलैला आपतकालीन बैठकीमध्ये आपला अहवाल मांडला आणि तो UGC ने स्विकारला.

 या रिवाईज रिपोर्टमधील महत्त्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे:

1. शेवटच्या सत्रांच्या परीक्षा घेण्याची पध्दती:

     सर्व विद्यापीठांनी सप्टेंबर 2020 च्या शेवटपर्यंत अंतिम संत्राच्या परीक्षा घ्याव्या. परीक्षा हया परिस्थितीनुसार ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही प्रकारे घेता येतील. परीक्षा घेतांना कोव्हीड 19 बाबत सांगीतलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे.

2. विशेष संधीची तरतुद:

     एखादा विद्यार्थी शेवटच्या सत्राची परीक्षा देण्यासाठी हजर राहू शकला नाही तर विद्यापीठाने अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष संधी देवून त्यांची परीक्षा घ्यावी. पण ही परीक्षा विद्यापीठाला उचित वाटेल तेंव्हा घेण्यात यावी. ही व्यवस्था केवळ 2019 - 20 या ॲकडमिक वर्षासाठीच लागू राहिल.

3. बॅकलॉक पेपरसाठी सूचना:

     शेवटच्या सत्राच्या बॅकलॉक पेपर राहिलेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन किंवा आफलाईन पध्दतीने परीक्षा घेवूनच मुल्यांकन करण्यात यावे.

4. 29 एप्रिल 2020 च्या नोटीफिकेशनमध्ये सूचविल्या प्रमाणे वार्षिक परीक्षेबाबत कोणताही बदल करण्यात आला नाही.

     अशा प्रकारे UGC ने विद्यापीठांना शेवटच्या सत्राच्या परीक्षा घेण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना केल्या आहे. मात्र अनेक राज्यांनी कोरोणा व्हायरसचा उद्रेक लक्षात घेता अंतिम सत्राच्या परीक्षा शिखर संस्थांची मान्यता मिळण्या अगोदरच रद्द केल्या आहे. त्यामध्ये महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे. त्यामुळे शेवटच्या सत्राचे विद्यार्थी पुरते गोंधळून गेले आहेत. यावर आता महाराष्ट्र सरकार काय भूमिका घेईल हे पाहावे लागणार आहे. कारण महाराष्ट्रातील कोरोणाचे प्रमाण हे इतर राज्यांपेक्षा जास्त वाढलेले आहे. अशा अवस्थेमध्ये परीक्षा घेणे योग्य होईल की नाही हे येत्या काही दिवसात कळेलच मात्र तोपर्यंत विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास सुरू ठेवणे आवश्यक आहे.

Post a Comment

0 Comments