Unlimited Midnight Struggle अमर्याद मध्यरात्रीचा संघर्ष


Unlimited Midnight Struggle

अमर्याद मध्यरात्रीचा संघर्ष

     कोरोणा लॉकडाउनने अनेकांचा रोजगार हिरावून घेतला, अनेक उद्योगधंदे बंद पडले, शहरात खायचे काय आणि राहायचे कुठे हा मोठा प्रश्न निर्माण झाला. भाडयाने राहणाऱ्या लोकांना घरमालकांनी भाडे दया नाही तर घर खाली करा असे आदेश दिले. त्यामुळे शहरात राहण्याची पंचायत निर्माण झाली. मायग्रँट वर्कर आपआपल्या गावाकडे पायी निघाले त्यांची स्टोरी ब्रेकिंग न्युज झाली. सरकारला त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची सोय करावी लागली आणि पोहोचून देण्यासाठी गाडया, ट्रेनची व्यवस्था करावी लागली. मात्र या काळात समाजातील एक घटक दुर्लक्षीत राहिला त्याकडे कोणाचे लक्ष नव्हते. आणि कोणाला लक्ष देण्याची गरज पण वाटली नाही. मेडीया पासून कोसो दुर राहिलेला तो वर्ग म्हणजे सेक्स वर्कर.

     मुंबईतील कामाठीपुरा हा आशिया खंडातील सर्वात मोठा रेड लाईट एरिया आहे. कामाठीपुरामध्ये सुमारे 200 वर्षापासून वेश्याव्यवसाय चालतो. कामाठीपुरा मध्ये वेश्या, पुरूष सेक्स वर्कर आणि ट्रान्सजेंडर्स सर्व मिळून संख्या 15000 पेक्षा जास्त आहे. कामाठीपुरा येथील जवळपास 90% सेक्स वर्करांना Sexually transmitted infection ची लागण झालेली आहे. तेथील 70% पेक्षा जास्त जणांना एच. आय. व्ही ची लागण झालेली आहे. कामाठीपुरा येथील एक सेक्स वर्करची मुलाखत ऐकत होतो. कोरोनाच्या अगोदर दररोज संध्याकाळी गजबज असलेला परिसर आता मात्र निर्मनुष्य आहे. लॉकडाउन नंतर काम पूर्णपणे बंद झाल. आज आमच्याकडे लोक अस्पृश्यासारखे पाहतात. कोणीही गिऱ्हाईक नाही आणि आम्हालाही भिती वाटते कोणी एखादा भेटला आणि त्याला जर लागण झालेली असेल तर सगळयांना ती लागण होईल. कारण आम्ही सगळे जण दिवसभर रस्त्यावरच असतो. अशा शब्दात तीने आपल्या वेदना व्यक्त केल्या. या धंदयातून आम्हाला फार काही मिळत नाही. केवळ एक ते दोन दिवस घर चालेल ऐव्हडच मिळते. सन्मानाच काम मिळाल असत तर कशाला केला असता हा व्यवसाय. मुलबाळ ही गावाकडे असतात. खायाला काय नाही म्हणून पैसे मागतात. कोरोणामुळे इथे काम बंद झालय. काही सामाजिक संस्थांचे लोक खाण्यापिण्याची मदत करतात. मात्र रूमभाडे देण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे रूममालक रूम खाली करण्याची धमकी देतात. त्यामुळे आमच्यातील बऱ्याच जणी गाकाकडे निघून गेल्या. काहींना पर्याय नाही म्हणून त्या बिचाऱ्या इथे लटकून पडल्या आहेत.

     अनेक शहरातील झोपडपटटयातून हा व्यवसाय चाललेला असतो त्या एरियाला रेड लाईट असे म्हणतात. अनेक वर्षापासून हा व्यवसाय सुरू आहे. स्वातंत्र्याची 73 वर्षे पूर्ण झाली पण कोणत्याही सरकारला हा व्यवसाय बंद करून या व्यवसायातील वर्करला दुसरा एखादा पोटभरण्याचा धंदा उपलब्ध करून दयावा असे कधी वाटलेच नाही. निवडनूका आल्या की रेड लाईट एरियामध्ये राजकीय मंडळी जातात. महिलांना आणि त्यांच्या एजंन्टला अमिश दाखवून मते पदरात पाडून घेतात. त्यांनतर कोणीही त्या एरियाकडे फिरकत सुध्दा नाही.

वेश्याव्यवसाय आणि कायदा:

     आजपर्यंतच्या नोंदणीवरून भारतात सरासरी वीस लाख व्यक्ती वेश्या व्यवसाय करतात. मात्र ही संख्या नक्कीच त्याहून जास्त असू शकते. तरूण मुली या कामात लहानपणीच ओढल्या जातात. भारतात ब्रिटिशांचा अंमल होता तेंव्हा इंग्लडमध्ये वेश्या व्यवसायासाठी जो कायदा होता तोच कायदा वापरल्या जात होता. वेशा व्यवसाय हा चोरून अंधारात केला जाणारा व्यवसाय होता त्याला गुन्हा समजले जात असे. इंग्रजांनी ठरवून दिलेल्या अनेक नियमावली जशाच्या तश्या भारतीय कायदयात घेण्यात आल्या आहेत. Immoral Trafficking Prevention Act (ITPA) हया कायदयाचाही त्यामध्ये समावेश होतो. या कायदयातील 377 व्या कलमामध्ये म्हटले होते की, वेश्या व्यवसाय समलिंगी असणे हा गुन्हा आहे. परंतु जुन 2009 कायदयामध्ये बदल करण्यात आला आणि त्यास मान्यता मिळाली.

     भारतामध्ये 1986 पासून वेश्या व्यवसायास कायद्याने मान्यता देण्यात आली आहे. Immoral Trafficking Prevention Act (ITPA) या कायदयाच्या आधारे वेशा व्यवसायात होणारे गुन्हे आणि गैरव्यवहार रोखले जातात. या कायदयानुसार एक स्त्री या व्यवसायातून पैसे कमवू शकते मात्र तो व्यवसाय उघडयावर होवू नये असा नियम आहे. या व्यवसायात तिसऱ्या व्यक्तीने सामिल होवू नये. हा कायदा वेश्या व्यवसायास मान्यता देतो मात्र त्यामुळे होणाऱ्या अनेक बेकायदेशीर बाबीवर नियंत्रण ठेवावे लागते. एखादा चालू व्यवसाय बंद करणे हा सुध्दा कायदयाने गुन्हा आहे.

     सेक्स वर्करचा संघर्ष हा आजचा किंवा कालचा नाही. अमर्याद मध्यरात्रीपर्यंतचा संघर्ष अनेक दिवसापासून सतत सुरू होता. कोणाकडून कोणतीही अपेक्षा नाही. लोक येतात शरीराचे लचके तोडतात, हातावर मोजके पैसे टेकवतात आणि निघून जातात. कोणताही स्वाभिमान नाही, अभिमान नाही, कोणी चांगल म्हणा कोणी वाईट म्हणा काहीही फरक पडत नाही. कारण या एरियातील वेदना बोथट झालेल्या असतात. मान सन्मान आणि भावनाशुन्य व्यवहार सतत सुरू असतो. मात्र कोरोनामुळे जसे सामान्याना झळ पोचली. त्यापेक्षा अनेक पटीने सेक्स वर्करच जीवन उध्वस्त झाल. आता कोणतही काम नाही. दुसर काम मागायला गेल तर कोणी कामही देत नाही. करायच काय आणि जीवन कस जगायच? असे अनेक प्रश्न वेशा व्यवसायासमोर आहेत. त्यांनाही सरकारने इतरांप्रमाणे समाजाचा एक घटक म्हणून रॅशनिंगची व्यवस्था करावी ही अपेक्षा।

संदर्भ: www.aidssupportaarogya.com

Post a Comment

1 Comments

  1. ऐसे महीला पर हम लोग बोलना पसंत नहीं करते लेकीन इन महीला ओ की परेशानी हम से कही गुणा जादा है,इन महीला ओ की तरफ सरकार,हम लोगो को ध्यान देना चाहिए...

    ReplyDelete