Vikas Dubes Encounter, विकास दुबेचे इन्काउंटर

Vikas Dubes Encounter, विकास दुबेचे इन्काउंटर

      भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला बहिर्गत आणि अंतर्गत शत्रूपासून सदैव धोका असतो. बाहय आक्रमणाची भिती असल्याने राष्ट्रीय सुरक्षितता निर्माण करण्यासाठी सिमेवर सैनिकांची फौज सदैव कार्यरत असते. त्यामळे बहिर्गत शत्रूपासून होणारा धोका टाळण्यासाठी सैन्याची भक्कम फौज ही सिमेवर शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवून असते. भारताने आपल्या सैन्यामार्फत सिमेवर चांगल्या प्रकारे पकड निर्माण केलेली आहे. पाकिस्तान, चिनसारखे शत्रू राष्ट्रे वेळोवेळी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत असतात मात्र त्यांना वेळोवेळी भारतीय सैन्यांने चोख उत्तर दिले आहे. नुकतेच गलवान घाटीमध्ये झालेल्या झगडयात 20 भारतीय जवान शहिद झाले. परंतु सैन्याने माघार घेतली नाही. आणि सिमेवर मजबूतपणे उभे राहिले. आता चिनने नरमाईची भुमिका घेतली आहे. दोन्ही देशांचे सैन्य LAC वरून मागे सरकले आहे.

     सुरक्षेचा दुसरा प्रकार म्हणजे अंतर्गत सुरक्षा. या प्रकारामध्ये देशाला अंतर्गत शत्रूपासून धोका असतो असे नाही तर बाहय शत्रूची प्रेरणा, मदत चिथावणी देखील कारणीभूत असते. त्यामुळे बाहयआक्रमणापेक्षा अंतर्गत सुरक्षिततेला धोका जास्त घातक असतो. साधारणता: अतंर्गत सुरक्षिततेबाबत 1980 पासून धोरणात्मक दृष्टीने विचार करणे सुरू झाले. राष्ट्रीय एकात्मतेसाठी भारतात असणाऱ्या विदेशी भारतीय समाज घटकांना नेमकी कितपत स्वायत्तता दयायची याचाही विचार होणे आवश्यक आहे. भारत - चीन सिमेवर धुमचक्री सुरू असतांना काही महाभागांनी देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण केला आहे.  

    उत्तर प्रदेशमधील आठ पोलिसांची हत्त्या करणाऱ्या विकास दुबे प्रकरणामुळे देशाच्या अतर्गंत सुरक्षचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशाची अंतर्गत सुरक्षा करण्याचे काम हे पोलिसयंत्रणेवर असते. त्यांच पोलिस यंत्रणेला आव्हान दिल्या जात आहे. उत्तरप्रदेशमध्ये विकास दुबे नावाच्या आरोपीने तब्बल आठ पोलिसांना गोळया घातल्या. विकास दुबे सारखी माणसे ऐवढी मोठी कसी होतात की,
    जी अंतर्गत सुरक्षेला आव्हान देतात. त्यांना आडवण्याचा प्रयत्न केला तर ते देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करतात. राजकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय विकास दुबे सारखी माणसे मोठी होवू शकत नाहीत. दुबे हा गावचा सरपंच त्यानंतर पंचायत समिती सदश्य, नंतर त्याची बायको पंचायत समिती सदस्य. असा त्याचा राजकीय प्रवास होता. विकास दुबेला मोठे करण्यामागे, त्याने केलेले गुन्हे दाबून टाकण्यामध्ये ज्या पोलिस यंत्रणेने मदत केली असावी त्या यंत्रणेलाच त्याने आव्हान दिले आणि त्याला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसावर गोळीबार केला. त्यात आठ पोलिस शहीद झाले. नुकत्याच आलेल्या बातमीवरून उत्तर प्रदेश पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये विकास दुबे मारल्या गेला. विकास दुबेने भयंकर गुन्हा केलेला होता त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा व्हायला हवी होती. आणि न्यायालयामार्फत एक उदाहरण स्थापित व्हायला हवे होते की जर या देशाच्या बाहय सुरक्षा आणि अतंर्गंत सुरक्षिततेला कोणी धोका निर्माण करेल तर त्याची गय केली जाणार नाही. मात्र पोलिसांनी त्याचे एन्काउंटर केले आणि त्यात तो मारला गेला. विकास दुबेचे एन्काउंटर केल्याने तो ठार झाला मात्र त्याला मोठे होण्यासाठी वेळोवेळी मदत करणारे अनेक मोठे मासे गळातून निसटले. पोलिसांच्या एन्काउंटरवर वेळोवेळी प्रश्न चिन्ह निर्माण होतील. विकास दुबेसारखे अनेक लोक देशात आहेत त्यांनी स्वत:साठी समांतर यंत्रण निर्माण केली आहे त्यांचे काय?

एन्काउंटर म्हणजे नेमके काय?

     एन्काउंटर चा सर्वसाधारण अर्थ एक प्रकारचा हिंसात्मक संघर्ष असून तो दोन बेकायदेशीर गटामध्ये, सेनेमध्ये, पोलिस आणि गुन्हेगारांमध्ये होतो. एन्काउंटरचा अर्थ पोलिसांद्वारा स्वत: च्या आत्मसंरक्षणासाठी गुन्हेगार, आतंकवादी यांना ठार करणे. एन्कांउंटर या शब्दाचा उपयोग भारतामध्ये 20 व्या शतकापासून होत आहे. 1990 ते 2000 मध्ये मुंबई पोलिसांनी नगरमधील भूमिगत गुन्हेगारांनाठार केले होते. उत्तर प्रदेशमधील आदित्यनाथ सरकार स्थापित झाल्यानंतर 10 महिण्यामध्ये जवळजवळ 1142 अपराध्यांचे एन्कांउंटर करण्यात आले आहे.

कोण आहे विकास दुबे?

    कानपुर जिल्हयातील चौबेपुर हे विकास दुबेचे गाव आहे. तरूण वयामध्ये विकासने आपल्या मित्रांच्या मदतीने शेजारील गावामध्ये जावून काही दलित लोकांना मारहान केली. विकास दुबे हा उच्चवर्णीय असल्याने दलितांना मारल्याने तो गावामध्ये आजूबाजूच्या गावामध्ये लवकर फेमस झाला. सुरूवातीला लहान-सहान अपराध करणे, लोकांना धमकावणे यातून पोलिस पकडून नेत आणि नंतर सोडून देत. यातून विकास दुबे मोठा होत गेला त्यानंतर त्याने चार-पाच लोकांना एकत्र करून गँग बनवली. त्या गँगचे नाव त्याने बुलेट गँग ठेवले. याद्वारे विकास दुबे अपराध करू लागला आणि त्यातूनच तो मोठा गुन्हेगार बनला. कानपुरच्या चौबेपुर पोलिस ठाण्यामध्ये विकास दुबेच्या विरोधात 60 गुन्हे दाखल असून त्यातील बहूतांश खुन आणि हत्तेचा कट यासारखे भयंकर गुन्हे दाखल झालेले आहेत. तो 2001 मध्ये झालेल्या राज्यमंत्री संतोष शुक्ला याच्या हत्त्याकांडाचा मुख्य आरोपी होता. 03/07/2020 ला विकास दुबेला अटक करण्यासाठी गेलेल्या आठ पोलिस जवानांना त्याने त्याच्या माणसांनी गोळया घातल्या. 2000 मध्ये कानपुर च्या शिवली पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या इंटरकॉलेज चे सहाय्यक प्रबंधक सिध्देश्वर पांडेच्या हत्तेमध्ये विकास दुबेचे नाव आलेले होते. 2000 मध्ये रामबाबु यादवच्या हत्तेचा कट रचन्यामध्ये त्याच्यावर गुन्हा होता. त्याचबरोबर 2004 मध्ये केबल व्यवसायीक दिनेश दुबेच्या खुनाचा आरोप त्यावर होता.

   आज सकाळी आलेल्या वृत्तानुसार विकास दुबेचे उत्तर प्रदेश पोलिसांकडून एन्कांउंटर करणात आले. मात्र प्रश्न असा निर्माण होतो की या देशामध्ये असे अनेक विकास दुबे निर्माण झालेले आहेत. प्रत्येक गावामध्ये एक तरी सापडेल तो एस.सी., एस.टी. इतर मागसावर्गीयांच्या लोकांना धमकावित असतो आणि मारझोड करीत असतो. जवळच्या पोलिस ठाण्यापासून ते आमदार, खासदार आणि मंत्र्यापर्यंत तो पोचलेला असतो. परिणामी आपले कोणी काही करू शकत नाही या आवेशात राहून अनेक गुन्हांना अंजाम देत असतो. त्यामुळे अंतर्गत सुरक्षेला आव्हान निर्माण होते. विकास दुबेसारखा, एखादा दुबे पुन्हा होणार नाही याची राजकीय मंडळी आणि पोलिस प्रशासनाने दखल घ्यावी आणि निस्पक्षपणे कायदयाची अंमलबजावणी करून न्यायाचे राज्य प्रस्तापित करावे. नाहीतर इतक्या दिवसकेवळ दलितच याचा बळी होता आणि आता तर पोलिसांवर सुध्दा हल्ले होवू लागले आहेत.

Post a Comment

4 Comments

  1. देश सिर्फ कानुन के हिसाब से चलना चाहिए.

    ReplyDelete
  2. obviously like your web-site but you need to test the spelling on several of your posts. Several of them are rife with spelling problems and I to find it very bothersome to tell the truth however I will certainly come again again. Divorce procedure in pakistan

    ReplyDelete