What to do after Corona? कोरोणानंतर काय ?What to do after Corona?

कोरोणानंतर काय बदल करावा लागेल.

    कोरोणाने संपूर्ण जगामध्ये उच्छाद मांडला आहे. अमेरीका, इंग्लड, फ्रास, इटली, स्पेन यासारखे देश हतबल झाले आहेत. कोरोणामुळे अनेक जणांचे बळी गेले आहेत. आज भारताची स्थिती काही फारसी चांगली नाही.  भारत हा वरील देशांच्या मानाने विकसनशिल देश आहे. भारतामध्ये गरीबीचे प्रमाण प्रचंड आहे आणि हेल्थ सेक्टर अतिशय कमजोर असल्याने रूग्णांची संख्या येत्या काही दिवसात प्रचंड वाढणार आहे. आज भारतात रूग्णांची संख्या 6,73,165 ऐवढी आहे. ती दररोज वाढत आहे. मुंबई, दिल्ली यासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या महानगरामध्ये कोव्हिड रूग्णांचे प्रमाण भयंकर वाढले आहे. कोव्हिड 19 हा आजार तसा जास्त घातक नाही. मृत्युचे प्रमाण कमी आहे. मात्र मेडीयाने त्याला जास्त कव्हरेज दिल्यामुळे सर्वांच्या मनामध्ये कोरोनाविषयी भिती निर्माण   झाली आहे. हा आजार जास्त मोठा नाही मात्र तो संसर्गजन्य असल्याने त्याचा जास्त प्रसार होत आहे. एकदा कोरोणावरील लस आणि औषधी बाजारात आली की त्यावर बरेच नियंत्रण आणता येईल.

मात्र कोरोनानंतर समस्त मानव जातीला आपल्या वर्तनामध्ये कमालीचा बदल करावा लागेल. डाविर्नच्या नियमाप्रमाणे जे प्राणी निसर्गनियमानुसा स्वत: मध्ये बदल करतील ते या जगात टिकून राहतील. आणि जे स्वत: मध्ये बदल करणार नाहीत ते काळाच्या पडदयाआड चालले जातील. त्यामुळे ज्यांना या जगात जीवंत राहायचे आहे त्यांनी आपल्या जीवनामध्ये बदल करायला हवा.

1. शहरांची लोकसंख्या नियंत्रीत करण्यासाठी कायदे करावे लागतील:

     आज मोठया शहरांची लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे. लोकांना राहण्यासाठी जागा नाही म्हणून रस्त्याच्या कडेला, रेल्वे ट्रॅकच्या बाजूने अनेक झोपडपटटयांची निर्मिती झालेली दिसते. मोठ मोठाल्या बिल्डींगस दाटीवाटीन उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे रहदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलांना खेळण्याची मैदाने, गार्डन आज बिल्डर लॉबीने बळकावले आहे. त्या जागेवर अवैध्य बिल्डींग उभ्या राहत आहेत. परिणामी लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे. ती कमी करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा भविष्यातही कोरोणासारखे आजार नियंत्रणात येवू शकणार नाही.

2. ऑफिसची कामे घरातून:

     आज असंख्य ऑफिसची कामे ऑनलाईन झालेली असून तीघरातून चांगल्या पध्दतीने हाताळता येतात. व्यक्तीला बाहेर जायचे काम पडत नाही. लॅपटॉप, कंम्पुटरवर ही कामे होत असल्याने पुढील काळात याचा जास्त वापर केला जाईल. दहा बाय दहा रूम मधून सर्व ऑनलाईन कामे होवू शकतील.

3. बँकिगचे सर्व व्यवहार हे ऑनलाईन:

     बँकिगचे शहरातील जवळपास सर्वच व्यवहार ऑनलाईन झालेले आहेत. ग्रामिण भागामध्ये त्यामध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. ग्रामिण भागातही येत्याकाळात ऑनलाईन बँकींगचा वापर मोठया प्रमाणात सुरू होईल. ऑनलाईन पैसे जमा करणे, ऑनलाईन ट्रांसफर करणे, फिज ऑनलाईन भरणे अशी अनेक कामे इथून पुढे सर्वच शहरी आणि ग्रामिण भागात ऑनलाईन होईल. त्यामुळे ऑनलाईन बँकेची कामे सामान्यांना शिकावी लागतील. कारण इथून पुढे तासनतास लाईनीत उभे राहणे कोणालाही परवडनार नाही.

4. किराणा माल, भाजीपाला यासाठी ऑनलाईन ऑर्डर:

     आज मोठया शहरामध्ये किराणा माल, भाजीपाला ऑनलाईन ऑर्डर केल्या जातो. त्यामुळे सदर ग्रोसरी भाजीपाला पुरवणारा दुकानदार त्या वस्तू घरपोच आनुन देतो. ग्रामिण भागामध्ये जर अशी व्यवस्था झाली तर लोकांचा एकमेकांना होणारा संपर्क टाळता येईल. व्यवसायही चांगले चालतील.

5. ऑनलाईन शिक्षणावर भर:

     शाळा, महाविद्यालयातून इथून पुढे ऑनलाईन शिक्षणावर भर दयावा लागेल. जी शाळा, महाविद्यालये, ऑनलाईन शिक्षण देतील अशाच शाळा महाविद्यालयात विद्यार्थी ॲडमिशन घेतील. त्यासाठी स्वस्त ऑनलाईन शिक्षण देण्याची यंत्रणा उभारण्यासाठी सरकार संस्थांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थीसंख्या कमी करण्यासाठी 50% मुलांना शाळा अणि 50% ऑनलाईन असे आलटून पालटून शिक्षणाची व्यवस्था करावी लागेल.

6. प्रवास केवळ Personal Vehicle मार्फत करावा लागेल:

     इथुन पुढील काळात सार्वजनिक प्रवास करणे धोक्याचे असेल. वेळोवेळी अनेक संसर्गजन्य आजारांचे संक्रमण मानव जातीला संकटात ढकलत आहे. बस, ट्रायव्हल यामधून प्रवास करतांना धोका वाढू शकतो म्हणून इथून पुढे सार्वजनिक वाहनातून प्रवास टाळावा लागेल. आणि प्रवासासाठी Personal Vehicle चा वापर करावा लागेल.

7. मोठाले समारंभ, कार्यक्रम बंद करणे:

     कोरोणा विषाणूमुळे भूतलावरील समस्त मानव जात संकटात आली आहे. जर कोरोणावर नियंत्रण प्रस्तापित करायचे असेल तर फिजीकल डिस्टंसिग पाळणे गरजेचे आहे. मोठे समारंभ, लग्नाचे कार्यक्रम यामध्ये Physical Distancing पाळल्या जात नसल्याने असे कार्यक्रम समारंभ बंद करावे लागतील.

8. सर्वत्र Wifi सुविधा सुरू कराव्या लागतील:

     इथून पुढचे सर्वच व्यवहार हे ऑनलाईन करण्यासाठी इंटरनेटची मोठया प्रमाणात गरज भासणार आहे. आणि ते सामान्यांना परवडण्या जोगे असावे. त्यासाठी सर्वत्र Wifi चे टॉवर सरकारला उभे करावे लागतील आणि इंटरनेट फ्रि किंवा अल्प दरात उपलब्ध करून दयावे लागेल. तरच सर्व लोक ऑनलाईन व्यवहार करण्याकडे वळतील.

9. धार्मिक स्थळांना भेटी देणे बंद होतील:

     ऑनलाईन प्रार्थना, ऑनलाईन देणग्या, ऑनलाईन पुजा इंटरनेटच्या माध्यमातून होवू शकतात. पुढील काळात कोणत्याही मंदिरात जाता त्या मंदिराच्या वेबसाईटवरून मंदिराला भेट देता येईल आणि पुजा करता येईल. त्यातुन मंदिरातील गर्दी कमी होईल किंवा बंद होईल.

10. राजकीय सभा बंद कराव्या लागतील:

     राजकीय सभेसाठी लोकांची गर्दी असणे सर्वच राजकीय पक्षांना महत्त्वाचे वाटते. पण यापुढील काळात राजकीय सभांना लोक जमा होवू शकणार नाही. आणि कोरोणासारख्या संसर्गजन्य आजाराच्या भितीमुळे राजकीय मंडळींना सभा बंद कराव्या लागतील.

11. मास्क, सॅनिटायझर हँडवॉश हया दैनदिन गरजा:

     कोरोणा व्हायरस रोकण्यात मास्क, सॅनिटायझर हँडवाशची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे भविष्यात मास्क, सॅनिटायझर, हँडवाश शिवाय घरातून बाहेरच पडता येणार नाही. या साधनांशिवाय घराबाहेर पडल्यास पोलिस कार्यवाहिला सामोरे जावे लागू शकते.

12. Medical Invention वर भर:

     संसर्गजन्य आजार नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्यावर वैद्यकिंय संशोधन होणे गरजेचे आहे. संशोधनातून लस आणि औषधांचे शोध लागल्यास संसर्गजन्य आजारावर नियंत्रण प्रस्तापित करता येईल. यासाठी जास्तीत जास्त वैद्यकिय संशोधनावर भर दयावा लागेल.

Post a Comment

0 Comments